Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New Insurance Scheme: 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल'ने लॉन्च केला नवा प्लान, प्रिमियमच्या 100 पट विमा संरक्षण?

New Insurance Scheme: 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल'ने लॉन्च केला नवा प्लान, प्रिमियमच्या 100 पट विमा संरक्षण?

New Insurance Scheme: प्रिमियमच्या 100 पट विमा संरक्षण हवं असेल तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीनं एक नवा प्लान लॉन्च केला आहे. या नव्या प्लानच्या माध्यमातून अपघाती मृत्यू, जीवन विमा संरक्षण यासह विविध फायदे मिळू शकतात.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियलने (ICICI Prudential Life Insurance) आयसीआयसीआय प्रू प्रोटेक्ट एन गेन प्लान (Protect N Gain Plan) लॉन्च केला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या माध्यमातून विविध फायदे ग्राहकांना दिले जाणार आहे. त्यात महत्त्वाचं म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह लाइफ इन्शूरन्स कव्हर (Comprehensive life insurance cover), अ‍ॅक्सिडेंटल डेथ (Accidental death) तसंच परमनंट डिसेबिलिटी (Permanent Disability) म्हणजेच कायमचं अपंगत्व आणि दीर्घकालीन संपत्ती मिळवण्यासाठी एक चांगला रिटर्न देत असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

किती विमा संरक्षण?

आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या प्रोटेक्ट एन गेन प्लानद्वारे वार्षिक प्रिमियमच्या तब्बल 100 टक्क्यांपर्यंत विमा संरक्षण मिळतं. हा फायदा तर आहेच. मात्र यासोबत आपल्या ग्राहकांना इक्विटी आणि डेब्टमध्ये असलेले जवळपास 18 फंड ऑफर केले जातात. या माध्यमातून अधिकाधिक परताव्याचा फायदादेखील ग्राहकांना मिळतो.

कंपनीनं काय म्हटलं?

आपल्या नव्या प्लानबद्दल आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शूरन्सचे चीफ डिस्ट्रीब्यूशन ऑफिसर अमित पल्टा यांनी सांगितलं, की सध्याच्या धावपळीत आपण विविध समस्यांना तोंड देत असतो. मुलांच्या भविष्याची चिंता, रिटायरमेंट आणि त्यानंतरचं आर्थिक गणित अशा विविध पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. यात कोणतीही तडजोड करता येत नाही. बाजारातली सध्याची परिस्थिती पाहता, इक्विटी आणि डेब्टमध्ये एक्सपोजर निवडायचं असेल तर फ्लेक्सिबिलिटी त्याचबरोबर दीर्घकाळातली गुंतवणूक गरजेची असते.

ग्राहकांच्या मूलभूत गरजा होतात पूर्ण

अमित पल्टा पुढे म्हणाले, की आमचा हा नवा प्लान संपत्तीसह (Wealth) सुरक्षादेखील (Security) ग्राहकांना देते. ग्राहकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास या योजनेच्या माध्यमातून प्राधान्य दिलं जातं. या मूलभूत गरजा कोणत्या तर सुरक्षा ही एक आणि दुसरी म्हणजे दीर्घकालीन बचत होय, असं त्यांनी सांगितलं.

प्रक्रिया काय?

कंपनीनं लॉन्च केलेला हा प्लान घेणं सोपी प्रक्रिया आहे. घोषित उत्पन्नाच्या आधारावर या प्लानमध्ये सहभागी होता येईल. ज्यांचं वय 45 वर्षांपेक्षा कमी आहे, अशांना कोणतीही वैद्यकीय चाचणी करून घेण्याची गरज नाही. एखाद्या अपघातात पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला अथवा कायमचं अपंगत्व आलं, तर विशेष लाभ आहेत. म्हणजेच अशा प्रकरणांमध्ये नॉमिनीला जीवन संरक्षण किंवा क्लेम केलेली अमाउंट देण्यात येईल.