Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ICICI Festive Bonanza: आयसीआयसीआय बँकेचा फेस्टिव्ह बोनान्झा; जाणून घ्या डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर

ICICI Festive Bonanza

Image Source : www.twitter.com/www.np.linkedin.com

ICICI Bank Festive Bonanza: आयसीआयसीआय बँकेने ऑक्टोबर महिन्यातील वेगवेगळ्या ई-कॉमर्स कंपन्यांचे सेल ऑफर्स लक्षात घेऊन गुरूवारी (दि. 5 ऑक्टोबर) फेस्टिव्ह बोनान्झा (Festive Bonanza) लॉन्च केला आहे. या फेस्टिव्ह बोनान्झा अंतर्गत ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स, डिस्काउंट्स आणि जवळपास 26 हजारापर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.

ICICI Bank Festive Bonanza: ऑक्टोबर महिन्यात खरेदी करणाऱ्या ग्राहकांची यंदा चांगलीच चंगळ आहे. कारण 8 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टचा बिग बिलिअन डे सेल सुरू होणार आहे आणि तो 15 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्याचबरोबर मिन्त्राचा बिग फॅशन फेस्टिव्हल 6 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या दरम्यान असणार आहे. तर अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल ऑक्टोबरअखेर सुरु होणार आहे.

ICICI Bank Festive Bonanza: आयसीआयसीआय बँकेने ऑक्टोबर महिन्यातील वेगवेगळ्या ई-कॉमर्स कंपन्यांचे सेल ऑफर्स लक्षात घेऊन गुरूवारी (दि. 5 ऑक्टोबर) फेस्टिव्ह बोनान्झा (Festive Bonanza) लॉन्च केला आहे. या फेस्टिव्ह बोनान्झा अंतर्गत ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स, डिस्काउंट्स आणि जवळपास 26 हजारापर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.

आयसीआयसीआय बँक ग्राहकांसाठी खास ऑफर

आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रॅण्ड्सच्या खरेदीवर क्रेडिट/डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, युपीआय किंवा कार्डलेस ईएमआयने पेमेंट केल्यानंतर वरील सवलत मिळणार आहे. या सवलतीला बँकेने फेस्टिव्ह बोनान्झा म्हणून घोषित केले आहे. जे ग्राहक आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट/डेबिट कार्डच्या मदतीने No-Cost EMI चा वापर करतील. त्यांनादेखील ही सुविधा मिळणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.

विविध ब्रॅण्ड मिळणार भरपूर डिस्काउंट

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील सण पाहता अनेक ई-कॉमर्स वेबसाईटनी ऑफर्स आणि डिस्काउंट्स आणले आहेत. त्यालाच जोडून आयसीआयसीआय बँकेनेही ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फेस्टिव्ह बोनान्झाद्वारे काही ऑफर्स आणल्या आहेत. ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंपासून मोबाईल, फर्निचर, फॅशन, किचन अप्लायन्सेस, ट्रॅव्हल, डायनिंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदीसाठी सूट दिली जाणार आहे. यामध्ये आयफोनपासून, मेकमाय ट्रिप, टाटा न्यू, वनप्लस, एचपी, मायक्रोसॉफ्ट, क्रोमा, रिलायन्स डिजिटल, एलजी, सोनी, सॅमसंग ते झोमॅटो आणि स्वीगीवरदेखील डिस्काउंट दिला जाणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात भरमसाठ ऑफर्स

8 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान फ्लिपकार्टचा बिग बिलिअन डे सेल सुरू होणार आहे. आयसीआयसीआय बँक या ऑफर सेलची अधिकृत भागीदार आहे. त्याचबरोबर मिन्त्राचा बिग फॅशन फेस्टिव्हल 6 ते 19 ऑक्टोबर असणार आहे आणि ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल असणार आहे.

आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने वेगवेगळे ब्रॅण्ड्स आणि ई-कॉमर्स कंपन्यांसोबत पार्टनरशीप केली. याशिवाय बँक आपल्या ग्राहकांना सणानिमित्त होमलोन, कारलोन आणि टू-व्हिलर लोनसाठी स्पेशल ऑफर देणार आहे. फ्लिपकार्ट, मिन्त्रा, अ‍ॅमेझॉन, टाटा क्लिक यासारख्या नामांकित ई-कॉमर्स साईटवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ऑनलाईन खरेदीवर 15 टक्क्यापर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे.

मार्केटमधील फेमस एलजी, सॅमसंग, सोनी, युरेका फोर्ब्स, व्हर्लपूल आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्डवर जवळपास 26 हजारापर्यंत कॅशबॅक दिली जाणार आहे. याशिवाय जेबीएल, बॉस या स्पीकर्सची रिलायन्स डिजिटल, क्रोमा आणि विजय सेलमधून खरेदी केल्यावर त्यावर 25 टक्क्यापर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे. अ‍ॅपलचा नवीन आलेला iPhone 15 हा किमान 2,497 रुपयांच्या ईएमआयवर दिला जाणार आहे. त्याचबरोबर ट्रॅव्हल कंपन्या, फूड डिलेव्हर करणाऱ्या कंपन्यांवरही ग्राहकांना डिस्काउंट दिला जाणार आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रॅण्ड्सचे प्रोडक्ट या ऑफर्स सेलमधून भरघोस डिस्काउंटसह खरेदी तर कराच. पण आयसीआयसीआय बँकेच्या मदतीने या ऑफर्समधील प्रोडक्टची खरेदी करून त्यात आणखी सवलत कॅशबॅक ऑफर मिळवा.