Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ठेवीदारांसाठी खूशखबर, ICICI बँकेने ठेवींवरील व्याजदर वाढवला

ICICI Bank Hike Deposit rate

ICICI Bank Hike Deposit Rate: रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवल्यानंतर बँकांनी कर्जदरात आणि ठेवीदरांत वाढ केली आहे. या आठवड्यात RBI पतधोरण समितीची बैठक होणार आहे. त्यापूर्वीच बँकांकडून व्याजदरात वाढ केली जात आहे.

खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेने ठेवीदारांना खूशखबर दिली.बँकेने 2 कोटींहून कमी रकमेच्या ठेवींवरील व्याजदर 0.25% वाढवला आहे. ICICI Bank Hike FD Rates) 26 सप्टेंबर 2022 पासून सुधारित व्याजदर लागू झाल्याचे बँकेने म्हटलं आहे.  

ICICI बँकेकडून 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या विविध कालावधीतील मुदत ठेवींवर आता यापुढे 2.75% ते 6.10% व्याज दिले जाईल. 91 दिवस ते 120 दिवस, 121 दिवस ते 150 दिवस, 151 दिवस ते 184 दिवसांच्या मुदत ठेवींवरील व्याज 0.25% ने वाढवण्यात आले आहे. यापूर्वी 3.75% व्याज दिले जात होते. आता ते 4.00% करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) ठेवींवर 0.50% जादा व्याज दिले जाणार आहे.  

1 वर्ष ते 389 दिवसांसाठी ठेवींवर आता 5% व्याज दिले जाणार आहे. ज्येष्ठांना 6% व्याज मिळणार आहे. 18 महिने ते 2 वर्षांसाठीचा व्याजदर 5.50% असेल तर ज्येष्ठांसाठी तो 6% इतका वाढवण्यात आला आहे.यापूर्वी तो 5.50% इतका होता.2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवींवर सामान्य ठेवीदारांना तो 5.60% व्याज तर ज्येष्ठांना  6.10% व्याज मिळणार आहे. 3 वर्ष 1 दिवस ते 5 वर्षांपर्यंतच्या डिपॉझिटवर सामान्यांना 5.90% व्याज मिळेल. याच कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 6.60% व्याज दिले जाणार असल्याचे ICICI बँकेने म्हटलं आहे. 

 आठवडाअखेरिस बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत रिझर्व्ह बँक रेपो दरात किमान 0.50% वाढ करेल, अशी दाट शक्यता आहे. सध्या आरबीआयचा रेपो दर 5.40% आहे. पुढील महिन्यात दसरा-दिवाळी हे महत्वाचे उत्सव आहेत. या काळात सर्वसाधारणपणे भारतीयांकडून वस्तूंची खरेदी केली जाते. यात नवे घर, गाडी, इलेक्ट्रनिक उपकरणे, सोने, चांदी, फर्निचर याला पसंती दिली जाते. रिझर्व्ह बँकेने यापूर्वी केलेल्या व्याजदर वाढीचा परिणाम बँकांवर दिसून आला होता.

महिन्याच्या सुरुवातीला कर्जदर वाढवला

ICICI बँकेने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला MCLR दरात 0.10% वाढ केली होती. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज अशी बँकेची सर्वच प्रकारची कर्जे महाग झाली आहेत.1 सप्टेंबर 2022 पासून नवीन व्याजदर लागू झाले आहेत. (ICIC Bank Hike MCLR Rate by 10 bps)मागील चार महिन्यांत सलग चौथ्यांदा बँकेने कर्जाचा दर वाढवला आहे. यामुळे नव्याने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आता जादा व्याजदराने कर्ज घ्यावे लागेल. त्याशिवाय विद्यमान कर्जदाराना आता मासिक हप्त्यासाठी जादा तरतूद करावी लागेल. यापूर्वी बँकेने जून, जुलै आणि ऑगस्ट असे सलग तीन महिने कर्जदरात वाढ केली होती. ऑगस्टमध्ये बँकेने कर्जाचा दर 0.15% वाढवला होता. बँकेच्या वेबसाईटनुसार एक रात्र आणि एक महिने या मुदतीसाठीचा मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट (MCLR) 7.75% इतका वाढला आहे. याआधी तो 7.65% इतका होता. तीन महिन्यांसाठी तो 7.80%, सहा महिन्यांसाठी 7.95% आणि एक वर्षासाठी तो 8.00%  इतका झाला आहे.