भारतात IPL फायनलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जगभरातील क्रिकेटप्रेमी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची आतुरतेने वाट पाहत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये इंग्लंडमध्ये फायनल खेळवली जाणार आहे.क्रिकेटमधील या मेगा इव्हेंटसाठी अवघे दोन आठवडे शिल्लक आहे. आयसीसीने या फायनलची बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनणाऱ्या संघाला 13.22 कोटींचे बक्षीस दिले जाणार आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी भारतीय संघाचा कोच आणि काही निवडक खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. येत्या 7 ते 11 जून या दरम्यान ओव्हल ग्राऊंडवर फायनल टेस्ट होणार आहे.
आयसीसीने शुक्रवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील बक्षिसांची घोषणा केला. त्यानुसार टेस्ट चॅम्पियन संघाला 13.00 कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. उपविजेत्या संघाला 6.61 कोटी रुपयांचे बक्षिस मिळेल, असे आयसीसीने म्हटले आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी आयसीसीकडून एकूण 29.75 कोटींची खैरात केली जाणार आहे. वर्ष 2019-2021 या वर्षापासून आयसीसीकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप ही स्पर्धा खेळवली जाते. त्यावेळी आयसीसीने एकूण 29.75 कोटींची बक्षिसे दिली होती.
यंदाच्या हंगामात अंतिम सामन्यात जागा घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात प्रचंड चुरस होती. अखेर ऑस्ट्रेलिया आणि भारत अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. दक्षिण आफ्रिकेचा संघ या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर राहिला.
आयसीसीच्या माहितीनुसार तिसऱ्या स्थानावरील संघाला 3.71 कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. इंग्लंड या क्रमवारीत चौथ्या स्थानी राहिला. इंग्लंडला 2.89 कोटी रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला फुल ना फुलाची पाकळी बक्षीस स्वरुपात मिळणार आहे. गुणतालिकेत पाचव्या स्थावर असलेल्या श्रीलंकेला 1.65 कोटी रुपये मिळतील.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा गतविजेता संघ न्यूझिलंड यंदा क्रमवारीत सहाव्या स्थानावर राहिला. सातव्या स्थानावर पाकिस्तान, आठव्या स्थानावर वेस्ट इंडिज आणि नवव्या स्थानावर असलेल्या बांग्लादेश या सर्व क्रिकेट संघांना आयसीसीकडून प्रत्येकी 84 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            