Hyundai Increase Production Capacity: Hyundai Motor India कंपनीने येत्या 10 वर्षांत भारतात 20 हजार कोटींची (2.45 अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनी तामिळनाडूमधील प्लांटमधून उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. त्याचबरोबर कंपनी नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते.
100 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणार
दक्षिण कोरियामधील ह्युंदाई कंपनीने तिची भारतीय उपकंपनी Hyundai Motor India सोबत भारतामधील तामिळनाडू येथे 1,78,000 युनिट्सची वार्षिक क्षमता असलेले बॅटरी पॅक असेंब्ली युनिट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय Hyundai Motor India 100 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन (ईव्ही चार्जिंग स्टेशन) उभारणार असल्याची चर्चा सुरु आहे.
भारतातील EV Market मध्ये वाढ
जर आपण भारतातील इलेक्ट्रिक व्हेईकल (EV Market) मार्केट बाबत विचार केला, तर ते खूप झपाट्याने वाढत आहे. अनेक कंपन्या आपली वाहने इलेक्ट्रिक बाजारात उतरवत आहेत. देशांतर्गत असलेल्या कंपन्यांबद्दल सांगायचे झाल्यास, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि टाटा मोटर्स या कंपन्या खूप वेगाने पुढे जात आहेत. दुसरीकडे एमजी मोटर्स आणि बीवायडी या कंपन्यांच्या प्रवेशामुळे भारतातील ईव्ही कारच्या बाजारपेठेतील स्पर्धा झपाट्याने वाढू लागली आहे.
मार्केटमध्ये ह्युंदाईची चांगली पकड
Hyundai Motor India कंपनीने येत्या काही काळात उत्पादनाची टक्केवारी वाढवणार असल्याचे सांगितले आहे. कंपनी दरवर्षी 8 लाख 50 हजार गाड्यांची निर्मिती करू शकेल, यावर सध्या काम करत आहे. पॅसेंजर व्हेइकल्स कार सेगमेंटमध्ये पाहिले तर, भारतात एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार मारुती सुझुकीनंतर ह्युंदाईने चांगली पकड निर्माण केली आहे.