Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hyundai Exter SUV: 10 जुलैला लाँच होणार Hyundai Exter SUV, 11000 रुपयांपासून बुकिंग सुरु

Hyundai Exter SUV

Image Source : www.zigwheels.com

Hyundai Exter SUV: Hyundai Motor India कंपनी येत्या 10 जुलैला Hyundai Exter SUV लाँच करणार आहे. Hyundai च्या Exter SUV मॉडेलचे बुकिंग 11000 हजार रुपयांपासून सुरु करण्यात आले आहे. Hyundai Exter SUV लाँच होणार असल्याने आता Tata Punch, Citroën C3, Magnite आणि Maruti Franks मॉडेल बाजारात आणणाऱ्या कंपन्यांची स्पर्धा वाढली आहे.

Hyundai Motor India: Hyundai Exter भारतात 10 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. शक्तिशाली इंजिन तसेच डॅशिंग लुकने परिपूर्ण असलेल्या या गाडीच्या एक्स्टरमध्ये अनेक सेगमेंट फर्स्ट फीचर्स आहेत. ही  सब-4 मीटर एसयूव्ही Tata Punch, Citroën C3, Magnite आणि Maruti Franks सारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करेल.

वैशिष्ट्ये काय आहेत?

Hyundai Motor India Limited (HMIL) आपली नवीन SUV Exter लाँच करण्यासाठी सज्ज आहे. Hyundai Xtor ही भारतातील पहिली सब-4-मीटर SUV असेल जी सर्व ट्रिम्समध्ये 6 एअरबॅग्जने सुसज्ज असेल. यासोबतच, एक्सेटरला व्हॉइस कमांडसह स्मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ आणि डॅशकॅमसह ड्युअल कॅमेरे देखील दिले आहेत. डॅशकॅमचे पुढील आणि मागील कॅमेरे 2.31-इंच LCD डिस्प्ले, स्मार्टफोन अ‍ॅप-आधारित कनेक्टिव्हिटी आणि एकाधिक रेकॉर्डिंग मोडसह उपलब्ध आहेत.

गाडीचे इंटीरियर डिझाइन

Hyundai Xtor च्या इंटिरियरची वैशिष्ट्ये पाहता कंपनीने एक मोठी टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिली आहे. याशिवाय डिजिटल लाइफ ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जिंग, पॉवर विंडो, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल असे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने यामध्ये इलेक्ट्रिक सनरूफची सुविधाही दिली आहे.

ह्युंदाई कंपनीने एक्सेटर मॉडेलमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून सहा मानक एअर बॅगची सुविधा दिली आहे. ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, फ्रंट पार्किंग कॅमेरा दिलेला आहे.

उच्च क्षमतेचे इंजिन

Hyundai Xtor SUV मॉडेलच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने 1.2-लीटर नैचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे. या इंजिनमध्ये सुमारे 83 हॉर्स पॉवर आणि 113.8 एमएम टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. इंजिनसोबत पाच स्पीड एएमटी देण्यात आली आहे.

विविध रंगांमध्ये उपलब्ध होणार

Hyundai Exter SUV मॉडेलबद्दल सांगायचे तर, त्याची एकूण लांबी 3595 मिमी, उंची 1575 मिमी आणि रुंदी 1595 मिमी आहे. कंपनीने या मॉडेलसाठी अनेक रंगांचे पर्यायही दिले आहेत. ज्यामध्ये अ‍ॅटलस व्हाइट प्लस अ‍ॅबिस ब्लॅक, कॉस्मिक ब्लू, अ‍ॅटलस व्हाइट, टॉमबॉय खाकी, टायटन ग्रे, फायरी रेड, स्टाररी नाइट, मोनोटोन आणि ड्युअल टोन, टॉमबॉय खाकी प्लस अ‍ॅबिस ब्लॅक, कॉस्मिक ब्लू प्लस अ‍ॅबिस ब्लॅक यांचा समावेश आहे.