ह्युदांई कंपनीने आपल्या Aura कारमध्ये बदल करून नवीन डिझाइन ग्राहकांच्या भेटीला आणले आहे. अधिक आकर्षक डिझाइन आणि लूक गाडीला देण्यात आला असून या गाडीचे बुकींगही सुरू झाले आहे. कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन 11 हजार रुपये भरुन ऑनलाइन पद्धतीने कार बुक करू शकता. तसेच ह्युंदाई शोरुमला जाऊनही बुकींग करू शकता. या गाडीमध्ये कंपनीने नवीन फिचर्स अॅड केली आहे.
गाडीच्या पुढच्या बाजूला असलेल्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे. गाडीच्या पुढे असलेल्या ग्रीलची साइझ मोठी करण्यात आली आहे. तर दोन्ही बाजूला उलट्या L शेपमध्ये DRL लाइट्स देण्यात आल्या आहेत. गाडीच्या बाजूचे आणि मागील डिझाइन तसेच ठेवण्यात आले आहे. एअरबॅग्जची संख्याही वाढवण्यात आली आहे. TPMS आणि गाडीमध्ये 8 इंची टचस्क्रीन इंन्फोटेनमेंट सेट देण्यात आला आहे.
एकंदर Aura चे हे नवे मॉडेल Grand i10 Nios सारखेच आहे. यात 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून त्यातून 82 bhp आणि 113 Nm पीक टॉर्क तयार होतो. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 5-स्पीड AMT शी जोडलेले आहे. Aura मध्ये CNG सह 1.2-लिटर बाय फ्युअल पेट्रोल इंजिन देखील आहे. जे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 68 bhp आणि 95 Nm चे पॉवर देते.
नवीन Hyundai Aura ची किंमत ऑटो एक्स्पो 2023 मध्ये जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्री-बुकिंगही सुरू करण्यात आली आहे. हे अपडेटेड मॉडेल मारुती सुझुकी डिझायर, टाटा टिगॉर या गाड्यांशी स्पर्धा करेल.