Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जॉनी डेप-एम्बर हर्ड प्रकरणात हर्ड दोषी; 15 मिलियन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे आदेश

ohnny Depp v. Amber Heard

अभिनेता जॉनी ख्रिस्तोफर डेप (Johnny Christopher Depp) आणि अभिनेत्री एम्बर लॉरा हर्ड (Amber Laura Heard) यांच्यातील मानहानी खटल्याचा निकाल लागला असून कोर्टाने एम्बर हर्डला दोषी ठरवत 15 मिलियन डॉलर (15 million dollars) नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

Johnny Depp and Amber Heard Court Case Result : माजी पती आणि अभिनेता जॉनी ख्रिस्तोफर डेप (Johnny Christopher Depp) याची बदनामी केल्याबद्दल अभिनेत्री एम्बर लॉरा हर्ड (Amber Laura Heard) हिला दोषी ठरवणाऱ्या ज्युरीने एम्बर हर्डला 15 मिलियन डॉलर (15 million dollars) नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. जॉनी डेपने यापूर्वी नुकसान भरपाईची रक्कम म्हणून 50 मिलियन डॉलर्सची मागणी केली होती.

अभिनेता जॉनी ख्रिस्तोफर डेप (Johnny Christopher Depp) आणि अभिनेत्री एम्बर लॉरा हर्ड (Amber Laura Heard) यांच्या दरम्यान कित्येक दिवसांपासून सुरू असलेला मानहानी खटल्याचा निकाल नुकताच लागला. हा निकाल जॉनी डेप याच्या बाजूने (johnny depp verdict results) लागला असून ज्युरीने 36 वर्षीय एम्बर हर्डला दोषी ठरवले आहे आणि तिला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. जॉनी डेपवर त्याची पत्नी एम्बरने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. या खोट्या आरोपांच्या विरोधात जॉनी डेपने एम्बरच्या विरोधात मानहानीचा खटला (defamation case) दाखल केला होता. 2018 पासून या खटल्यावर दावे-प्रतिदावे सुरू होते. त्यावर ज्युरीने एम्बर हर्डच्या विरोधात निकाल दिला. या निकालानंतर हर्डने आपली नाराजी ट्विटरवर व्यक्त केली.

मानहानीचा/अब्रुनुकसानीचा खटला म्हणजे काय?

भारतीय दंड संहितेतील (IPC) कलम 499 हे अब्रुनुकसानीविषयी संबंधित आहे. या कलमानुसार, एखादी व्यक्ती शब्दाद्वारे, खुणांद्वारे किंवा चित्रांद्वारे, एखाद्या व्यक्तीच्या लौकिकाला बाधा आणणाच्या उद्देशाने जाणीवपूर्वक आरोप करत असेल तर त्यास अब्रुनुकसान किंवा मानहानी समजले जाते. अशा चुकीच्या आरोपांविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला मानहानी / अब्रुनुकसानीचा खटला म्हटले जाते.

अभिनेत्री एम्बर हर्ड हिने अभिनेता जॉनी डेपवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत त्याच्या विरोधात 100 मिलियन डॉलर्सचा मानहानीचा दावा दाखल केला होता. तर जॉनी डेपने एम्बर हर्डने केलेलेच्या चुकीच्या आरोपांच्या विरोधात 50 मिलियन डॉलर्सचा मानहानीचा दावा दाखल केला होता. ज्युरीने या दाव्यावर निकाल देत जॉनी डेपच्या बाजूने निकाल (johnny depp verdict results) देत एम्बर हर्डला 15 मिलियन डॉलर्स (15 million dollars) नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

जॉनी डेप हा पायरेट्स ऑफ कॅरेबियन या सिनेमातील अभिनेता आहे. तर एम्बर हर्ड हिने, नेव्हर बॅक डाऊन (2008), ड्राईव्ह अँग्री (2011), द रम डायरी (2011), अक्वामॅन (2018) या चित्रपटांमध्ये काम केले आहे. जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांनी 2015 मध्ये एकमेकांशी लग्न केलं होतं. पण अवघ्या 15 महिन्यानंतर लगेच घटकस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले होते.

image source- https://bit.ly/3GHlI5L