Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Netweb Tech IPO ला गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद; अवघ्या काही तासात 85 टक्के सब्स्क्राईब

Netweb Tech IPO Open for subscription

Netweb Technologies India कंपनीचा आयपीओ आज (दि. 17 जुलै) सब्स्क्रिप्शनसाठी ओपन झाला. या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून काही तासात हा 85 टक्के सब्स्क्राईब झाला आहे. कंपनीने याची प्रति शेअर 474-500 रुपये किंमत निश्चित केली आहे.

Netweb Technologies India कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आजच्या पहिल्याच दिवशी आयपीओ ओपन झाल्यानतंर सुरुवातीच्या काही तासांतच गुंतवणूकदारांनी याला जोरदार प्रतिसाद दिला. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदार, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार आणि कर्मचारी गुंतवणूकदार आघाडीवर होते.

IPO म्हणजे काय  (Initial Public Offering)

निधी उभारण्यासाठी आयपीओ प्रक्रिया कंपन्यांना फायदेशीर असतं. शिवाय यात पारदर्शकताही अधिक असते. शेअर बाजारात नोंदणी नसलेली म्हणजेच असूचीबद्ध कंपनी जेव्हा ती प्रथमच लोकांसाठी सिक्युरिटीज किंवा शेअरच्या विक्रीद्वारे निधी उभारण्याचा निर्णय घेते तेव्हा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (Initial Public Offering  - IPO) जाहीर करते. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यानंतर, कंपनी सार्वजनिकरित्या व्यापार करणारी कंपनी बनते आणि कंपनीचे शेअर्स खुल्या बाजारात मुक्तपणे व्यवहार करता येतात.

नेटवेब टेक्नॉलॉजी कंपनी आयपीओच्या माध्यमातून अंदाजे  कोटी रुपये उभारणार आहे. -कंपनीने याच्या प्रति शेअरची किंमत 475-500 रुपये ठेवली आहे. याच्या एका लॉटमध्ये 30 इक्विटी शेअर्स असणार आहेत. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये बुधवारपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. बीएसईवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 12.35 वाजता उपलब्ध असलेल्या 88,58,630 शेअर्सपैकी 74,96,400 शेअर्स सब्स्क्राईब झाले होते. या गुंतवणूकदारांमध्ये किरकोळ विक्रेते आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात होते.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या कोट्यापैकी तो जवळपास 1.25 पटीने अधिक सब्स्क्राईब झाला. तर कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेला कोटा 3.45 पटीने सब्स्क्राईब झाला. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी यामध्ये 95 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक केली आणि पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून फक्त 1 टक्के गुंतवणूक झाली. अँकर गुंतवणूकदारांसाठीही एक कोटा राखीव ठेवलेला असतो.

नेटवेब टेक्नॉलॉजी कंपनी ही 1999 पासून कार्यरत असून, कंपनीद्वारे उच्च दर्जाची सेवा पुरवली जाते. यामध्ये प्रायव्हेट क्लाऊड, चांगल्या प्रतिचे संगणकीय इन्फ्रास्ट्रक्चर, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, वर्कस्टेशन्स, स्टोरेज सॉल्युशन्स, डेटा सेंटर सर्व्हर, सॉफ्टवेअर आणि इतर प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात.

2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीला एकूण 445.65 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यातून कंपनीला 46.94 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये 19 जुलैपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. कंपनी एकूण 206 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करणार आहे. तर कंपनीचे प्रवर्तक आणि भागधारक 85 लाख इक्विटी शेअर्स विकणार आहेत. याच्या एका लॉटसाठी किमान 15,000 रुपये गुंतवावे लागणार आहेत. या शेअर्सचे अलॉटमेंट 24 जुलै रोजी केले जाणार आहे.