आता शाॅपिंग बऱ्यापैकी ऑनलाईन रिव्ह्यू वाचूनच केली जाते. त्यातही सर्वांत जास्त खरेदी Amazon आणि Flipkart सारख्या अॅपवरून केली जाते. एखादा प्राॅडक्ट पाहताना त्याचा रिव्ह्यू तुम्हाला आवडल्यास, तुम्ही लगेच ते प्रोडक्ट घ्यायचा निर्णय घेता. त्यामुळे यातही स्पर्धा तयार झाली आहे. तुम्हाला प्लॅटफाॅर्मवर खेचण्यासाठी फेक रिव्ह्यू पद्धतीचा वापर होऊ शकतो. कारण, सध्याच्या परिस्थितीत खरेदीसाठी रिव्ह्यू ही महत्त्वाची बाब बनली आहे. त्यामुळे खरेदी करायच्या आधी या गोष्टी जाणून घेतल्या तर तुम्हाला फेक रिव्ह्यू ओळखता येईल.
Table of contents [Show]
रिव्ह्यू पोस्टची वेळ पाहा
तुम्हाला खूप चांगल्या रिव्ह्यूचा भरणा एकाच दिवशी केलेला दिसल्यास, ते फेक असण्याची शक्यता असू शकते. काही विक्रेते त्यांच्या प्रोडक्टचा पाॅझिटिव्ह रिव्ह्यू पोस्ट करण्यासाठी काही लोकांना नियुक्त करू शकतात. त्यामुळे त्यांनी रिव्ह्यू लिहल्यास ते एकाच दिवशी बॅचेसने पोस्ट करतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी तुम्ही प्राोडक्टच्या वेळेची आणि रिव्ह्यूची बारकाईने तपासणी करणे गरजेचे आहे.
रिव्ह्यू करा साॅर्ट
प्रोडक्ट खरेदी करायच्या आधी तुम्ही त्याचे रिव्ह्यू साॅर्ट करू शकता. म्हणजेच नवीन रिव्ह्यू पाहण्याचे फिल्टर लावू शकता. त्यामुळे तुम्हाला प्रोडक्टचे नवीन आणि जुने रिव्ह्यू पाहून प्रोडक्टच्या गुणवत्तेत काही फरक पडला का हे पाहता येते. तसेच, या ट्रीकचा वापर केल्यास तुम्हाला प्रोडक्टचा अपडेटेड रिव्ह्यू वाचायला मिळेल.
रिव्ह्यूमध्ये या गोष्टी पाहाच
एखाद्याने प्रोडक्टविषयी रिव्ह्यू लिहिल्यास तो डिटेलमध्ये सांगेल. जसे की, प्रोडक्टची विशेषता काय आहे? त्यात त्याला काय आवडलं? काय नाही आवडलं? या दोन्ही गोष्टी तो मांडेल. पण, तोच फेक रिव्ह्यू असला तर प्रोडक्टची स्तुती केलेली असले. जसे की, काय भारी प्रोडक्ट आहे. मला हे खूपच आवडले. त्यामुळे अशा प्रकारचे रिव्ह्यू दिसल्यास थोडा विचार करूनच निर्णय घ्या.
पॅटर्न घ्या समजून
फेक रिव्ह्यू ओळखण्यासाठी खूप मेहनत करावी लागत नाही. त्यांचा पॅटर्न एकच असल्यास, तुम्हाला तो लगेच ओळखू येईल. कारण, ते एखाद्या टेम्पलेट किंवा स्क्रीप्टवरून काॅपी केलेले असू शकतात. तुम्ही काही प्रोडक्टवर नक्कीच वाचले असेल की, या प्रोडक्टने माझे आयुष्य बदलून गेले. अशा पद्धतीचे रिव्ह्यू खरे असू शकत नाही. त्यामुळे त्यांचा पॅटर्न समजून घेणे ही आवश्यक आहे.
दुसऱ्या वेबसाईटचा करा वापर
तुम्हाला एखाद्या प्रोडक्टविषयी सर्व काही जाणून घ्यायचं असल्यास, तुम्ही प्रतिष्ठित वेबसाईट किंवा युट्यूबवर त्याचा रिव्ह्यू पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला आवश्यक असेलेली सर्व माहिती या ठिकाणावरून मिळू शकते. मात्र, तेच तुम्ही अॅप किंवा वेबसाईटवरून खरेदी करत असल्यास, तुम्हाला ते फक्त इमेजच्या स्वरूपातच पाहता येते. त्यामुळे तुम्ही या ट्रीकचा ही वापर करू शकता.
Amazon वर व्हेरिफाय बॅजेस पाहा
तुम्ही रिव्ह्यूवरची प्रोफाईल तपासू शकता, त्यावरून तुम्हाला अंदाजा येऊ शकतो. कारण, तुम्ही त्याने कुठे आणि कसे रिव्ह्यू केले हे पाहू शकता. तसेच, तुम्ही रिव्ह्यूवरने प्रोडक्ट Amazon वरून खरेदी केले की नाही हे व्हेरिफाय करू शकता. ते तुम्हाला Amazon बॅजेसवरून समजू शकते. तुम्ही ते बॅजेस असलेलेच प्रोडक्ट फिल्टर्स लावून पाहू शकता. या पद्धतींचा वापर केल्यास, तुम्ही फेक रिव्ह्यूच्या गुंत्यात अडकण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना वरील गोष्टींचा नक्की वापर करा.