Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC New Pension Plus Plan: LIC च्या नवीन पेन्शन प्लस योजने अंतर्गत कशी करणार कर बचत?

New Pension Plus Plan

LIC New Pension Plus Plan: नवीन आणि तरुण गुंतवणूकदारांसाठी बाजारात अनेक योजना उपलब्ध आहेत. मात्र गुंतवणूक करताना कर बचत कशी होणार? याचा विचार आजची युवा पिढी करते. एलआयसीची न्यू पेन्शन प्लस योजना तरुण व्यक्तींसाठी निवृत्तीनंतरची तरतूद करण्यासाठी योग्य आहे. यात कर बचत कशी होणार ते जाणून घेऊया.

आजची तरुण पिढी वर्तमानाबरोबरच भविष्याचा देखील विचार करते. निवृत्ती नंतरचा काळ सुखकर जावा, यासाठी आजचे तरुण खाजगी किंवा सरकारी गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करीत असते. भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी आयुर्विमा कंपनी आहे. ही कंपनी भारतातील प्रत्येक वर्गासाठी अनेक गोष्टींचा विचार करुन नवनवीन योजना बाजारात आणते.  ग्राहकांच्या निवृत्तीनंतरचे काय नियोजन असू शकते? त्यावेळी त्यांच्या गरजा काय असू शकते? या गोष्टींचा विचार करुन एलआयसीने नवीन पेन्शन प्लस योजना सादर केली आहे.

नवीन पेन्शन प्लस योजनेमध्ये केवळ एकदाच गुंतवणूक करुन गुंतवणूकदाराला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळू शकतो. ग्राहकाला एकाच वेळी प्रिमीयम भरणे शक्य नसेल तर तो हप्त्यांमध्ये  प्रीमीयम भरण्याचा पर्याय निवडू शकतो. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे (LIC) ने गुंतवणूकदार वृद्धपणी कोणत्याही त्रासाशिवाय, टेन्शनमुक्त जीवन जगू शकेल, अशी या पॉलिसीची रचना केली आहे. ही पॉलिसी ग्राहक ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे खरेदी करु शकतात.

गुंतवणुकीचे पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य

एलआयसीची नवीन पेन्शन प्लस योजना ही नॉन-पार्टीसिपेटिंग, युनिट-लिंक्ड, वैयक्तिक पेन्शन योजना आहे. या योजनेद्वारे तुम्ही नियमितपणे गुंतवणूक करून स्वत:साठी म्हातारपणात उपयोगात येईल असा मोठा निधी तयार करू शकता. यानंतर, तुम्ही हे पैसे अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवू शकता आणि वयाच्या ६० वर्षांनंतर दर महिन्याला नियमित पेन्शन मिळवू शकता. यामध्ये गुंतवणूकदाराला गुंतवणुकीचे पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्यही मिळते. तुम्ही सिंगल प्रीमियम किंवा रेग्युलर प्रीमियम यापैकी एक निवडू शकता.

या योजनेद्वारे, पॉलिसीधारक चार वेगवेगळ्या फंडांपैकी कोणत्याही फंडात गुंतवणूक करू शकतात आणि त्यांच्या सोयीनुसार निधी बदलू शकतात. चार फंडामध्ये वाढ निधी (Growth fund), शिल्लक निधी (Balance Fund), सुरक्षित निधी (Safe funds) आणि बाँड फंड (Bond Fund) यांचा समावेश आहे. ही एक ULIP (Unit Linked Insurance Plan) योजना आहे, जी गॅरंटीड अ‍ॅडिशनच्या (Guaranteed Addition Benefits) फायद्यांसह नफा देते. या LIC न्यू पेन्शन प्लस योजनेअंतर्गत,पॉलिसी धारक त्यांच्या निधी मूल्याच्या 10% किंवा 25% पैसे काढू शकतात.

या योजनेचे फायदे काय

  • या योजनेमध्ये, पॉलिसी धारकांना प्रथम 60% एकरकमी रक्कम मॅच्युरिटी रक्कम म्हणून दिली जाते आणि त्यानंतर उर्वरित 40% रक्कम दरवर्षी दिली जाते.
  • या योजनेअंतर्गत, पॉलिसी धारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, युनिट फंड मूल्यापेक्षा जास्त आणि भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 105% रक्कम दिली जाते.
  • या योजनेअंतर्गत, कोणताही पॉलिसी धारक पॉलिसीची मुदत सुरू झाल्यापासून 5 वर्षांनी आपली पॉलिसी सरेंडर करू शकतो.
  • या योजनेसाठी पॉलिसी धारकांना हमी जोड (Guaranteed Addition) देखील दिली जाते. जे दरवर्षी काही टक्क्यांनी वाढते. 
  • पॉलिसी धारकांना 80C आणि  D अंतर्गत 10% कर सूट मिळते.

नवीन पेन्शन प्लस योजने अंतर्गत पॉलिसी धारकांना 80C आणि  D अंतर्गत 10% कर सूट दिली जाते. त्यामुळे कर भरतांना, एकूण रकमेवर 10 टक्के कर सूट दिली जात असल्याने, ग्राहकाचा प्रत्येक वर्षाला आर्थिक फायदा होतो. त्यामुळे नवीन पेन्शन प्लस योजने मुळे ग्राहकाला निवृत्त झाल्यानंतर पेन्शन ही  ते आणि कर लाभही होतो.