Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

E-Peek Pahani App वर नोंदणी कशी करावी? त्यातून शेतकऱ्यांना कोणता फायदा मिळतो? जाणून घ्या

E-Peek Pahani App

E-Peek Pahani App : राज्य सरकारने ई-पीक पाहणी मोबाईल App लाँच केले आहे. हे App टाटा ट्रस्टने विकसित केले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या कमी व्हाव्यात, त्यांच्या उत्पादनांना योग्य किंमत आणि चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने हे App लाँच केले आहे.

E-Peek Pahani App : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारसुद्धा काम करत आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तंत्राचा आधार उपलब्ध करून देत आहे. महाराष्ट्र सरकारने असे एक मोबाइल App लॉन्च केले आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या अनेक समस्यांवर उपाय मिळतात. राज्य सरकारने ई-पीक पाहणी मोबाईल App लाँच केले आहे. हे App टाटा ट्रस्टने विकसित केले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी त्यांच्या उत्पादनांना योग्य किंमत आणि चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने हे App लाँच केले आहे.

शेतकऱ्यांच्या पिकाची नोंदणी अचूक व्हावी यासाठी महसूल ‘ई-पीक पाहणी’ ही सर्विस सुरू केली आहे. शेतकऱ्यांची शेतजमीन ही पडीक आहे की लागवडी स्वरूपाची आहे. शेतकऱ्यांनी कोणते पिक किती क्षेत्रामध्ये घेतले आहे. या सर्व बाबींची माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जलद, वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात येत आहे. तसेच, आता मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या पिकांची माहिती अक्षांश-रेखांश दर्शवणाऱ्या पिकांच्या फोटोसह पाहता येणार आहे.

ई- पीक पाहणी App

पीक पाहणी करण्यासाठी ई- पीक पाहणी App शेतकऱ्यांना आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करावे लागेल. यावर्षी 2.0.11 हा नवीन व्हर्जन इन्स्टॉल करावा लागेल. ई-पीक पाहणी न केल्यास तुम्हाला नवीन हंगामातील सातबारा उपलब्ध होणार नाही. तसेच पीकविमा योजनेचा देखील लाभ मिळणार नाही.

‘ई-पीक’ नोंदणी व पाहणी कशी करावी?

  • सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये ‘ई-पिक पाहणी’ व्हर्जन-2 हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरच्या माध्यमातून डाऊनलोड करावे. 
  • ‘ई-पिक पाहणी’ ॲप डाउनलोड झाल्यानंतर ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून तुमच्या मोबाईल नंबरची नोंद करून घ्यावी.
  • इतर नोंदणी करणाऱ्या व्यक्तीस स्वतःचा जिल्हा, तालुका व गावाची निवड करून गट क्रमांक टाकून नाव नोंदणी करावी.
  • यानंतर, पुन्हा होम पेजवर येऊन स्वतःच्या शेतामधील पिकाची माहिती भरून खाते क्रमांक निवडावा.
  • पुढे गट क्रमांक निवडून जमिनीचे एकूण क्षेत्र किती आहे. याची माहिती भरून घ्यावी.
  • कोणत्या हंगामातील पीक आहे, कोणते पीक घेतलेले आहे आणि पिकाचा वर्ग कोणता आहे निवडावे. 
  • तसेच, एका पेक्षा जास्त पीक असेल तर बहुपीक पर्याय निवडावा.
  • यानंतर सिंचन पद्धत, लागवड केलेली दिनांक आणि स्वतःच्या जमिनीमध्ये उभे राहून…
  • आपल्या मोबाईल मध्ये असलेले जीपीएस ऑन करून शेतीचा फोटो काढून अपलोड करावा.