विमा एजंटच्या आग्रहकाखातर आरोग्य विमा पॉलिसी (Health Insurance) काढल्याचे अनेकदा आपल्याला दिसून येते. सुरुवातीला वर्ष दोन वर्ष पॉलिसी चांगली वाटते मात्र त्यानंतर त्यातील त्रोटक फायदे आपल्याला अस्वस्थ करतात.अनेकदा कंपनीकडून देखील तत्पर सेवा देण्यास कुचराई केली जाते,अशा वेळी विमा कंपनी बदलण्याचा पर्याय (Insurance Portability)ग्राहकाकडे असतो. अगदी मोबाईलच्या सिमकार्ड प्रमाणे आपण हेल्थ इन्शरन्स पॉलिसी पोर्ट करु शकतो. अर्थात विमा कंपनी बदलण्याचा अधिकारच ग्राहकाला मिळाला आहे. मात्र हेल्थ इन्शुरन्स पोर्ट करण्यासाठी काही ठळक मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
Table of contents [Show]
अर्जाचा कालावधी लक्षात घ्या (Time for Apply for Portability)
सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यमान विमा कंपनी बदलण्यासाठी दुसरी कंपनीची निवड करणे आवश्यक आहे. नव्या कंपनीविषयी आणि तिच्या उत्पादनांविषयी तुम्ही योग्य माहिती घ्यायला हवी. जेणेकरुन पोर्ट करण्याची प्रक्रिया सुकर होईल. तुमची पॉलिसी एक्सपायर झाल्यानंतर 45 ते 60 दिवसांमध्ये तुम्ही कंपनी बदलण्यासाठी (port) अर्ज करु शकता. इन्शुरन्स पोर्टेबिलीटीची प्रक्रिया ऑनलाईन करता येते.
अर्जात योग्य माहितीचा तपशील द्या (Give Proper Information)
पोर्ट करण्यासाठी नवीन कंपनीची निवड करायला हवी. नवीन कंपनी तुम्हाला पोर्टेबिलीटीचा अर्ज आणि प्रस्ताव पाठवेल. या दोन्ही अर्जांमध्ये तपशील सादर करा.ज्यात तुमची जी पॉलिसी सुरु होती , तिचा तपशील द्यावा, 30 दिवसांचा वेटिंग पिरिएड, विशिष्ट आजारासंदर्भातील नोंदी आणि त्यांचा वेटिंग पिरिएड तसेच नो क्लेम बोनस असा सविस्तर तपशील सादर करावा लागेल.
आवश्यक कागदपत्रे (Important Document's Required)
विमा पॉलिसी पोर्ट करत असताना पॉलिसीधारकाला काही महत्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील. यात हेल्थ इन्शुरन्सचे नुतनीकरण करण्याची नोटीस, मागील वर्षाचे पॉलिसी शेड्युल, नो क्लेम बोनससंबधी घोषणापत्र, वर्षभरात दावा केल्यास असल्यास क्लेम संबधीचे कागदपत्रे, फॉलोअप रिपोर्ट, मेडिकल हिस्ट्री आदी कागदपत्रे सादर करावी लागतील.
पोर्ट करण्यापूर्वी ही गोष्टी लक्षात ठेवा (Important Thing to Remember)
पॉलिसी पोर्ट करण्यापूर्वी एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे कि तुमची जी पॉलिसी रेग्युलर सुरु आहे तीच पॉलिसी पोर्ट करता येते. जर एखादी पॉलिसी काही कारणास्तव बंद आहे किंवा थांबवलेली असेल तर अशा पॉलिसीला पोर्ट करता येत नाही.