Car Insurance: मोटार वाहन कायदा 1988 नुसार, भारतीय रस्त्यावर कायदेशीररित्या वाहन चालवण्यासाठी किमान तृतीय पक्ष (Third Party) मोटर विमा पॉलिसी असणे आवश्यक आहे. योग्य मोटार विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी, आपल्याला कोणत्या प्रकारची पॉलिसी हवी आहे? कोणत्या कंपनीकडून खरेदी करायची? इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे.
कुठली कार पॉलिसी योग्य आहे आणि कुठली नाही? हे तपासण्यासाठी आपण गूगल वर शोधू शकतो. ऑनलाईन उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांची स्वत: तुलना करुन, संपूर्णपणे माहिती काढून तुमच्या गरजेनुसार योग्य पॉलिसी निवडणे कधीही चांगले. परंतु, अनेकदा असे होते की, सगळ्या गोष्टी तपासून घेतलेल्या पॉलिसीमध्ये देखील बऱ्याचदा तुम्ही समाधानी नसता. त्यावेळी तुम्ही तुमची पॉलिसी मुदतीमध्ये असतांना दुसऱ्या विमा कंपनीकडे पोर्ट करु शकता.
Table of contents [Show]
पोर्टेबिलिटी निवडण्याची गरज का भासते?
पॉलिसी धारक मोटार विमा पॉलिसी आणि त्याच्या फायद्यांबाबत समाधानी नसल्यास मोटार इन्शुरन्स पोर्टेबिलिटी उपयोगी पडते. पॉलिसीधारकास स्वस्त दरात सर्वसमावेशक कव्हरेज मिळत असल्यास, किंवा मोटार विमा पॉलिसी विकतांना विमाधारक किंवा एजंटने तुमची दिशाभूल केली असल्यास,किंवा सध्याच्या विमाकर्त्याचा दावा निकाली काढण्याची प्रक्रिया अवघड असल्यास, तसेच तुमच्या पॉलिसीमध्ये नेटवर्क गॅरेज नसल्यास, समजा अशी अनेक कारणे असल्यास तुम्ही पोर्टेबिलिटी निवडण्याचा विचार करु शकता.
पोर्टेबिलिटी करण्याचे फायदे
- जेव्हा तुम्ही पॉलिसीच्या मुदतीदरम्यान कोणताही दावा करत नाही,तेव्हा तुमची विमा कंपनी तुम्हाला NCB च्या स्वरूपात सूट प्रदान करते. तुम्ही सलग पाच वर्षे दावा दाखल न केल्यास ही सूट 50 % पर्यंत जाऊ शकते. नवीन विमा कंपनीकडे जाताना,तुम्ही NCB लाभ नवीन पॉलिसीमध्ये हस्तांतरित केला आहे की नाही याची खात्री करा.
- मागील पॉलिसीची मुदत संपल्यास किंवा कारची मालकी बदलल्यास, वाहनाची स्थिती तपासण्यासाठी कारची तपासणी करणे आवश्यक आहे. परंतु, नवीन विमा कंपनीत जाताना वाहन तपासणी अनिवार्य नाही.
विमा पॉलिसी कधी पोर्ट करायची?
कार विमा पॉलिसी पोर्ट करण्यासाठी वेळेचे बंधन नाही,परंतु तुमची विद्यमान पॉलिसी कालबाह्य झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत स्विच करण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्यास पॉलिसीधारक विद्यमान पॉलिसीमधून नो-क्लेम बोनस, वाहन तपासणी, इत्यादी फायदे मिळवू शकतील. तुमच्या जुन्या विमा पॉलिसीची संपूर्ण माहिती दिल्यानंतर, पोर्टेबिलिटीची प्रक्रिया सहज पूर्ण केली जाऊ शकते.
पोर्टिंग करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी
- तुमची पॉलिसी पोर्ट करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, तुम्ही कारचे वर्तमान बाजार मूल्य तपासले पाहिजे,जे तुमच्या कारचे विमा घोषित मूल्य (IDV) म्हणूनही ओळखले जाते. IDV (Insured's Declared Value) सध्याच्या पॉलिसीचा प्रीमियम बदलू शकतो,परंतु चोरी किंवा संपूर्ण नुकसान झाल्यास योग्य कार मूल्य मिळविण्यासाठी योग्य IDV सुनिश्चित करावा लागतो.
- पॉलिसीची मुदत संपण्याच्या 45 दिवस आधी पोर्टेबिलिटी प्रक्रिया सुरू केल्यास अधिक फायदे मिळतील.
आवश्यक कागदपत्रे
- पॅन कार्ड
- आधारकार्ड
- वाहन नोंदणीची प्रत
- आधीच्या पॉलिसीची प्रत