Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Card Reward Points: क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट्सचा स्मार्ट पद्धतीनं वापर करा; बजेट शॉपिंग करायला शिका

Credit Card Reward Points

अनेक बँकांची क्रेडिट कार्ड्स 100 रुपये खर्च केल्यावर 1 रिवॉर्ड पॉइंट देतात. जेवढी जास्त शॉपिंग तेवढे जास्त रिवॉर्ड पॉइंट मिळू शकतात. 2022 साली सण उत्सवाच्या काळात क्रेडिट कार्डद्वारे नागरिकांनी 1.22 लाख कोटी रुपयांची शॉपिंग केली. स्मार्ट पद्धतीने शॉपिंग करण्यासाठी नक्कीच काही वेळ जाईल. मात्र, एकदा तुम्हाला क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्स कसे वापरायचे हे समजले तर शॉपिंग नक्कीच बजेट फ्रेडंली होईल.

Credit card reward point: भारतामध्ये क्रेडिट कार्डचा वापर मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शॉपिंगसाठी तर तरुणाईकडून क्रेडिट कार्ड सर्सास वापरले जाते. बदलत्या लाइफ स्टाइलमुळे प्लास्टिक मनीचा वापर फ्लाइट, हॉटेल बुकिंग, मॉलमधील शॉपिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. प्रत्येकवेळी क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर युझर्सला काही रिवॉर्ड पॉइंट मिळतात. मात्र, या रिवॉर्ड पॉइंटचा वापर नक्की कसा करायचा हे अनेकांना माहिती नसते. या लेखात पाहूया क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉइंटचा वापर स्मार्ट पद्धतीने कसा करावा.

2022 साली सणउत्सवाच्या काळात क्रेडिट कार्डद्वारे नागरिकांनी 1.22 लाख कोटी एवढी मोठी रक्कम खर्च केली. त्यामुळे बँकाकडून कायम नवनवीन ऑफर्स ग्राहकांसाठी आणल्या जातात. काही बँकांनी को-ब्रँडेड कार्ड बाजारात आणले आहेत. एखाद्या ठराविक ब्रँडसोबत पार्टनरशिप करून आणलेल्या कार्डवर स्पेशल ऑफर्सही दिल्या जातात. म्हणजे फ्लिपकार्ट सोबत एखाद्या बँकेने पार्टनरशिप करुन क्रेडिट कार्ड आणले तर त्याद्वारे शॉपिंगवर इतर कार्डपेक्षा जास्त डिस्काउंट मिळतो. यातून मिळणारे रिवॉर्ड पॉइंट्सही जास्त असू शकतात.

अनेक बँका, फिनटेक कंपन्या, ब्रँड्सने असे कार्ड बाजारात आणले आहेत. ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पुढे ठेवून ही कार्ड आणली असल्याने यावर जास्त डिस्काऊंट मिळतो. त्यामुळे सर्सास एकच क्रेडिट कार्ड वापरण्यापेक्षा तुम्ही खास कार्ड वापरल्यावर जास्त डिस्काऊंट आणि रिवॉर्ड पॉइंट मिळू शकतात. उदाहरणार्थ, फ्लाइट बुकिंगसाठीचे क्रेडिट कार्डवर इतर कार्डपेक्षा जास्त डिस्काऊंट आणि रिवॉर्ड पॉइंट मिळून देईल.

मेक माय ट्रिप आणि आयसीआयसीआय बँकेने आणलेले क्रेडिट कार्ड तुम्हाला फ्लाइट बुकिंग आणि हॉटेल बुकिंगवर जास्त डिस्काऊंट आणि रिवॉर्ड पॉइंट्स देऊ शकते. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे खास क्रेडिट कार्ड वापरल्यास जास्त रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.

रिवॉर्ड पॉइंट्सचा स्मार्ट पद्धतीने वापर असा करा? (How to use Credit Card reward points in smart way)

अनेक बँकांची कार्ड्स 100 रुपये खर्च केल्यावर 1 रिवॉर्ड पॉइंट देतात. जेवढी जास्त मोठी शॉपिंग तेवढे जास्त रिवॉर्ड पॉइंट मिळू शकतात.

काही बँकांद्वारे क्रेडिट कार्ड इश्यू केल्यानंतर पहिल्या 90 दिवसांतील शॉपिंगवर जास्त रिवॉर्ड पॉइंट्स दिले जातात. जसे की, बँकेसोबत पार्टनर असलेले शॉपिंग ब्रँड्स, फ्लाइट बुकिंग, हॉटेल्सवर जास्त रिवॉर्ड पॉइंट्स मिळू शकतात. त्यामुळे कार्ड घेतल्यानंतर अशी काही ऑफर आहे का? हे चेक करायला विसरु नका.

क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्सचा वापर गिफ्ट कार्ड व्हाउचर्स खरेदी करण्यासाठी वापरा. त्याद्वारे तुम्ही समोरच्या व्यक्तीला कोणतेही गिफ्ट्स न देता, त्याच्या आवडीचे गिफ्ट्स खरेदी करण्याचे फ्रिडम देता. त्यामुळे गिफ्ट निवडण्याचे टेंशन तुम्हाला घ्यावे लागणार नाही. काही बँका डोनेशन देण्यासाठीही रिवॉर्ड पॉइंट्स वापरण्याची संधी देतात.

रिवॉर्ड पॉइंट एक्सपायर होण्याआधीच वापरा. (how to use reward points) अनेक बँकांनी रिवॉर्ड पाँइट्स मॅनेज करण्यासाठी वेगळी वेबसाइट्स तयार केलेली असते. या साइट्सवर तुम्ही जाऊन रिवॉर्ड पॉइंट चेक करत जा. ठराविक रक्कम खर्च केल्यावर काही बँका अतिरिक्त रिवॉर्ड पॉइंट्सही देतात. ते वेळेत वापरत जा.

प्रत्येकाच्या गरजा आणि लाइफस्टाइल वेगवेगळी असते. तुम्हाला ज्या गोष्टींची गरज जास्त असते त्यानुसार योग्य बँकेचे क्रेडिट कार्ड निवडा. (how to use credit card reward points) तुम्ही जर सतत प्रवास करत असाल तर फ्लाइट बुकिंगवर कोणती बँक जास्त रिवॉर्ड पॉइंट्स देते त्या बँकेचे कार्ड निवडा.

तुमचे आर्थिक निर्णय आणि शॉपिंग स्मार्ट पद्धतीने करण्यासाठी नक्कीच थोडा वेळ जाईल. मात्र, एकदा तुम्हाला क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्स कसे वापरायचे हे समजेल तेव्हा सर्वकाही सोपे होईल. याप्रकारे दरमहिन्याला तुम्ही काही रुपये वाचवू शकता.