सहारा समूहाच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांन त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 18 जुलै रोजी सहकार मंत्री अमित शहा यांनी 'CRCS-Shara Refund Portal' लाँच केले आहे.गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे पारदर्शी पद्धतीने मिळावेत यासाठी सरकारने हे पोर्टल सुरु केले आहे.आता पर्यंत या पोर्टलवर सात लाखांहून अधिक गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या गुंतवणूकदारांच्या क्लेमचा निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने काही नोडल अधिकाऱ्यांची देखील नेमणूक केली आहे. आतापर्यंत सुमारे 150 कोटी रुपयांचे क्लेम केले गेले आहेत. पुढील 45 दिवसांत या क्लेमचा निपटारा केले जाणार असून, गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत.
‘हा’ तपशील देणे आवश्यक!
ज्या गुतंवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी क्लेम करायचा आहे अशांनी तपशीलवार माहिती सादर करणे आवश्यक आहे असे 'CRCS-Shara Refund Portal' वर म्हटले आहे. ज्या दाव्यांची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा अधिक असेल अशा प्रकरणात पॅन कार्ड तपशील देणे बंधनकारक असणार आहे. ज्यांना हे तपशील देता येणार नाहीत त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच ठेवीदाराकडे सभासद नंबर, ठेवीसंदर्भातील तपशील जसे की डिपॉझिट सर्टिफिकेट आणि पासबुक यासारखी कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच ठेवीदाराचे बँक खाते आणि आधार कार्ड त्याच्या मोबाईलशी लिंक असणे आवश्यक आहे.
Union Minister @AmitShah launches the CRCS - Sahara Refund Portal https://t.co/FeCRfEyDAx in New Delhi today
— PIB India (@PIB_India) July 18, 2023
This portal has been developed for submission of claims by genuine depositors of Cooperative Societies of Sahara Group - Sahara Credit Cooperative Society Limited,… pic.twitter.com/JeaAA8paou
मोबाईल क्रमांक महत्वाचा…
ज्या ठेवीदारांनी पैसे परत मिळवण्यासाठी क्लेम केला असेल त्यांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठवण्यात येत आहेत. या क्लेमचा निपटारा केल्यानंतर काय कारवाई केली जाणार आहे याचे देखील मोबाईल क्रमांकावर अपडेट दिले जात आहेत. सोबतच पैसे गुंतवणूकदारांच्या खात्यावर जमा झाल्यानंतरही त्यांना मेसेजद्वारे कळवण्यात येणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यांचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आधार आणि बँक खात्याशी लिंक आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यायची आहे.