Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र कसे मिळवावे? प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे? Identity Card for Senior Citizens

ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र कसे मिळवावे? प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे? Identity Card for Senior Citizens

घरबसल्या सहजपणे ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने ओळखपत्र कसा मिळणार व आवश्यक कागदपत्रे कुठले लागणार हे जाणून घ्या

ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र (Senior Citizen Card) आवश्यक असते. म्हणजेच त्या व्यक्तीची 60 वर्षे पूर्ण झाली आहेत याचा पुरावा म्हणून सरकारतर्फे हे कार्ड दिले जाते. पण या कार्डसाठी नागरिकांना सरकारी कार्यालयात सतत हेलपाटे मारावे लागत होते. आता मात्र, या त्रासापासून ज्येष्ठ नागरिकांचा सुटका झाली आहे. आपले सरकार या वेबपोर्टलवर नोंदणी करून ज्येष्ठ नागरिक कार्ड सहज काढता येते.

ज्येष्ठ नागरिक ओळखपत्रासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

ओळख पत्र : पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, रोजगार हमीचे ओळखपत्र यापैकी एक.

पत्त्याचा पुरावा : पासपोर्ट, रेशन कार्ड, लाईट बिल, टेलिफोन बिल, साताबारा उतारा, नाव असलेल्या मतदान यादीतील पान, खरेदी खत, घरभाड्याची पावती यापैकी कोणतेही एक.

वयाचा पुरावा : जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, प्राथमिक शाळेतील नोंद आणि सरकारी किंवा खासगी नोकरीतील सेवा पुस्तकातील नोंद यापैकी कोणतेही एक.

या प्रत्येक पुराव्याच्या कागदपत्रावर स्वत: सही करून ते सत्यप्रत करावे लागते. आता आपले सरकारच्या पोर्टलवर जाऊन New user? Register here इथे क्लिक करून नोंदणीची सर्व प्रक्रिया पूर्ण करा. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र अर्जावर क्लिक करा. येथे सर्व आवश्यक माहिती भरून, कागदपत्रे अपलोड करून आणि शुल्क भरून अर्ज सबमिट करा. दिलेली सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 7 दिवसांत ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आपले सरकारच्या अकाऊंटवर उपलब्ध होते.