Carom Seeds Farming : ओवा म्हणजेच मुखवास म्हणून वापरला जाणारा पदार्थ. त्याचबरोबर ओवा काही निवडक अन्न पदार्थांमध्ये सुद्धा वापरला जातो. अनेकांना ओव्याबद्दल असा समज आहे की, ओवा बनवला जात असेल पण त्याची शेती केली जाते. त्याची लागवड कशी केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया ओव्याची शेती कशी केली जाते? त्यातून किती नग मिळू शकतो?
ओवा प्रत्येक गृहिणीच्या नेहमीच्या वापरातील पदार्थ आहे. ओव्यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात. त्याच्या मदतीने पचन आणि पोटाशी संबंधित सर्व समस्यांवर आयुर्वेदात उपचार केले जातात. ओव्यामध्ये औषधी असण्यामागे थायमॉल, पार्सलेन, लिमोनेन, अल्फा-पाइनेन आणि बीटा-पाइनेन हे घटक काम करतात.
Table of contents [Show]
ओव्याचे पीक कधी घेतले जाते?
ओव्याच्या शेतीबद्दल बोलायचे झाल्यास, उष्णकटिबंधीय आणि कोरड्या हवामानात ओव्याचे चांगले पीक घेतले जाऊ शकते. ओवा ही उष्ण हंगामातील आवडती वनस्पती आहे कारण या हंगामात ते भरपूर उत्पादन देते. भारतात मार्च ते एप्रिल दरम्यान ओव्याची पेरणी केली जाते. ओव्याचे पीक देशाच्या प्रत्येक भागात घेतले जाते. ओवा हे कोरड्या हवामानात येणारे पीक असल्याने यासाठी चांगल्या निचऱ्याची जमीन फायदेशीर असते.
ओवा किती रुपये दराने विकला जातो?
भारतात तसे हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे त्याची लागवड केली जाते. पण, कोरडे हवामान, हलकी-मध्यम जमीन व कमी पाण्याची गरज असल्यामुळे ओवा पीक राजस्थान व गुजरात राज्यात अधिक प्रमाणात घेतले जाते. त्याची किंमत पारंपारिक पिकांपेक्षा जास्त आहे. दरवर्षी बाजारात 15 ते 20 हजार रुपये क्विंटल दराने ओवा सहज विकला जातो.
ओव्याच्या पेरणीसाठी शेत कसे तयार करावे?
ओव्याच्या चांगल्या उत्पादनासाठी शेताची योग्य नांगरणी करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम, माती फिरवणाऱ्या नांगराने शेताची चांगली नांगरणी करावी. यानंतर 2-3 नांगरणी करून माती मोकळी करावी. ओवा एक वनस्पती आहे, त्यामुळे माती मऊ आणि भुसभुशीत असणे फार महत्वाचे आहे.
ओव्याच्या लागवडीसाठी सिंचन
पेरणीच्या वेळी पहिले सिंचन करा, सिंचन हलके असायला पाहिजे जेणेकरून बिया वाहून जाणार नाहीत आणि एका ठिकाणी जमा होतील. भाजीपाल्याच्या चांगल्या उत्पादनासाठी हवामान व जमिनीनुसार 15 ते 25 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. चांगल्या उत्पादनासाठी ओव्याच्या पिकाला 4 ते 5 पाणी द्यावे.
ओव्याची पेरणी कशी करावी? त्यातून नफा किती मिळू शकतो?
हे पीक ओळींमध्ये पेरले जाते. ओळीमधील अंतर 45 सेमी आणि रोपांमधील अंतर 15 ते 20 सेमी असावे. शिंपडण्याच्या पद्धतीत प्रथम वाफे तयार करून बिया पेराव्या, त्यानंतर बिया हाताने मातीत मिसळा. ओव्याच्या पेरणीला इतर पिकांप्रमानेच खर्च येतो. शिवाय त्याची काळजी सुद्धा खूप घ्यावी लागते. या पिकाच्या लागवडीसाठी 8 ते 10 हजार रुपये एकरी खर्च येऊ शकतो. 15 ते 20 हजार रुपये क्विंटल पर्यंत जर दर मिळाला तर ओव्याचे पीक हे नगदी पिकांपेक्षाही फायदेशीर आहेत.