Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ChatGPT च्या मदतीने घरबसल्या करता येईल लाखो रुपयांची कमाई, जाणून घ्या कसे?

ChatGPT

Image Source : https://www.freepik.com/

ChatGPT, Bard सारखे एआय चॅटबॉट सध्या चर्चेत आहे. या चॅटबॉटच्या मदतीने तुम्ही घरबसल्या हजारो-लाखो रुपयांची कमाई करू शकता. लेख लिहिण्यापासून ते लोगो बनविण्यापर्यंत अनेक कामे एआयच्या मदतीने शक्य आहेत.

गेल्याकाही महिन्यात ChatGPT, एआयवर आधारित चॅटबॉट विशेष चर्चेत आहे. ओपनएआयने ChatGPT हे Large Language Model (LLM) लाँच केल्यापासून टेक क्षेत्रात विशेष मोठे बदल पाहायला मिळत आहेत. या एआय चॅटबॉटच्या मदतीने अनेक कामे सहज करणे शक्य आहे. 

या चॅटबॉटद्वारे अगदी लेख लिहिण्यापासून ते गणितं सोडविण्यापर्यंत सर्व क्रिया एका क्लिक करू शकता. मात्र, ChatGPT सारख्या आर्टिफिशियल इंटेलिजेस मॉडेलच्या मदतीने कमाई देखील करणे शक्य आहे. तुम्ही या चॅटबॉटच्या मदतीने घरबसल्या हजारो-लाखो रुपयांची कमाई करू शकता. ChatGPT च्या मदतीने कोणते काम करून कमाई करू शकता, याविषयी जाणून घेऊयात.

ब्लॉगिंग केवळ चॅटजीपीटीच नाही तर कोणत्याही एआय चॅटबॉटच्या मदतीने अगदी सोप्या व सहजरित्या पैसे कमविण्याची पद्धत म्हणजे ब्लॉगिंग. तुम्हाला कोणत्याही व्यक्ती, घटना, जागेबद्दल माहिती हवी असल्यास चॅटजीपीटी तुमच्या उपयोगी येईल. तुम्ही याच्या मदतीने लेख लिहून तुमच्या वेबसाइटवर पब्लिश करू शकता. याशिवाय, इतरांना देखील लेख लिहून देऊ शकता. चॅटबॉटच्या मदतीने सोशल मीडिया पोस्ट तयार करू शकता. 
अ‍ॅप/वेबसाइट तयार करणेअ‍ॅप बनविण्यासाठी तुम्हाला कोडिंगचे ज्ञान असण्याची गरज नाही. तुम्ही चॅटजीपीटीच्या मदतीने सहज अ‍ॅप अथवा वेबसाइट तयार करू बनवू शकता. चॅटजीपीटी तुम्ही दिलेल्या सुचनांच्या आधारावर प्रोग्रामिंग लँग्वेजच्या मदतीने अ‍ॅप बनविण्यासाठी मदत करेल. तुम्ही स्वतःसाठी अथवा इतरांसाठी देखील अ‍ॅप तयार करू शकता. अनेकजण या माध्यमातून मोठी कमाई करत आहेत. चॅटजीपीटीच्या माध्यमातून क्रोम एक्सटेंशन देखील तयार करणे शक्य आहे.
ई-बुक्सChatGPT सारख्या एआय चॅटबॉटचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये हे स्टोरीटेलिंग हे आहे. तुमच्या सुचनेवर हे एआय मॉडेल अवघ्या काही सेकंदात रंजक कथा तयार करून देऊ शकते. याच्या मदतीने तुम्ही लेख, कथा, कविता लिहू शकता. ChatGPT च्या मदतीने स्वतःचे पुस्तक लिहू शकता. ChatGPT आल्यापासून ई-बुक्स प्रमाण देखील वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ChatGPT चा उपयोग करून लिहिलेले पुस्तक नक्कीच कमाई करून देऊ शकते.
लोगो बनवा पैसे कमवाव्यवसायाची ओळख निर्माण करेल यासाठी अनेकांना लोगोची आवश्यकता असते. तुम्ही चॅटजीपीटीच्या मदतीने इतरांना आकर्षक लोगो बनवून देऊ शकतो व यातून तुमची भरघोस कमाई होऊ शकते. ओपनएआयने आता चॅटजीपीटीमध्ये Dall -E3 चा देखील सपोर्ट दिला आहे. याच्या मदतीने तुम्ही दिलेल्या सुचनांच्या आधारावर हटके फोटो तयार करणे सहज शक्य आहे. Fotor, Starryai, Midjourney सारख्या जनरेटिव्ह एआयच्या मदतीने देखील लोगो अथवा फोटो तयार करून कमाई करता येईल.
व्हीडिओ क्रिएशन युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर व्हीडिओ अपलोड करून मोठी कमाई करता येते. तुम्ही अशा व्हीडिओंची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी चॅटजीपीटीची मदत घेऊ शकता. चॅटजीपीटीच्या मदतीने लिहिलेली स्क्रिप्ट Pictory.ai, invideo.io सारख्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करून व्हीडिओ तयार करू शकता. असे व्हीडिओ बनविण्यासाठी एडिटिंग शिकण्याची देखील गरज नाही.

घरबसल्या करता येईल लाखो रुपयांची कमाई

तुम्ही चॅटजीपीटी सारख्या एआय टूल्सच्या माध्यमातून सोशल मीडिया मॅनेजमेंट, ऑनलाइन कोर्सेस, फ्रीलान्सिंग प्रोजेक्टची कामे सहज पूर्ण करू शकता. अनेक एआय प्लॅटफॉर्म डेटा विश्लेषणाची देखील सुविधा देतात. या कामांच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या अवघ्या काही तासांमध्ये भरघोस कमाई करू शकता.