PPF Account: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड(PPF) 1968 मध्ये गुंतवणुकीच्या स्वरूपात लहान बचत एकत्रित करून त्यावर परतावा मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला. याला बचतीसह कर बचतीचे किंवा गुंतवणुकीचे साधन म्हणून सुद्धा ओळखले जाते. वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांपैकी पब्लिक प्रोव्हिडेंट फंड(PPF) हा एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. यामध्येही नॉमिनेशनची सुविधा देण्यात आलेली असते. पीपीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनी पैशांसाठी दावा कसा करू शकतो? याविषयी आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.
PPF खातेधारकाच्या मृत्यूनंतर, नॉमिनी हा बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेला फॉर्म सबमिट करून रकमेवर दावा करू शकतो. 1 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कोणत्याही उत्तराधिकार प्रमाणपत्राशिवाय हा दावा केला जाऊ शकतो.मात्र त्यासाठी काही प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
Table of contents [Show]
फॉर्म 'G' भरणे आवश्यक
पीपीएफ खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या रकमेवर नॉमिनीकडून दावा केला जाऊ शकतो. क्रेडिट ट्रान्सफर होण्यापूर्वी खातेदाराद्वारे परतफेड केलेल्या कर्जाची रक्कम कापली जाते. क्लेमसाठी जी(G) हा फॉर्म भरावा लागतो.
फॉर्म G हा बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येऊ शकतो. या फॉर्ममध्ये खाते क्रमांक, नॉमिनीचे डिटेल्स, मोबाईल नंबर इत्यादी आवश्यक माहिती भरणे गरजेचे असते.
PPF डेथ क्लेम कसा मिळवायचा?
तीन स्थितींमध्ये खातेधारकाच्या मृत्यूवर क्लेम जनरेट करता येतो. क्लेम करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ती कोणती हे आपण जाणून घेऊयात.
नोंदणी(Registration) करताना-
- नॉमिनीद्वारे भरलेला फॉर्म
- डेथ सर्टिफिकेट
- खातेदाराचे पासबुक
नॉमिनी नसताना दावा कायदेशीर वारसाने करण्यासाठी ही कागदपत्रे लागतात
- कायदेशीर वारसाने भरलेला फॉर्म
- मृत्यु प्रमाणपत्र
- उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा मृत्युपत्राची अटेस्टेड कॉपी
- खातेदाराचे पासबुक
PPF च्या इतर आवश्य गोष्टी
- PPF खात्यात पैशांचा क्लेम करेपर्यंत जमा पैशांवर व्याज मिळत राहते
- खातेदाराच्या मृत्यूनंतर PPF अकाउंट सुरु राहत नाही
- खातेदाराच्या मृत्यूनंतर PPF खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत नाही
- सक्सेशन सर्टिफिकेटशिवाय 1 लाख रुपयांपर्यंतच्या रक्कमेसाठी दावा केला जाऊ शकतो