Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

योग्य आरोग्य विमा योजनेची (health insurance) निवड कशी करावी?

योग्य आरोग्य विमा योजनेची (health insurance) निवड कशी करावी?

आर्युविम्याबरोबरच (life insurance) आरोग्य विम्याचीही प्रत्येकाला नितांत गरज असते. आयुष्याला जसे ऐनवेळी संकटाच्या रूपात अर्थकवच लाभतं तसं आरोग्यातही हक्काचं वित्तीयछत्र (cover) आवश्यक असतं. कोरोना (covid) कालावधीत तर त्याचा प्रत्यय अधिक जाणवला. स्वतःचे आणि कुटुंबियांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यात आरोग्य विमा पॉलिसीची महत्त्वाची भूमिका असते.

पावसाळा हा अत्यंत आल्हाददायक ऋतू असतो आणि तो कडक उन्हाळ्यापासून सुटका करतो. मात्र यावर्षीचा उन्हाळा खूपच तीव्र आहे. कोरोना-लॅकडाऊननंतर उष्णतेच्या लहरींनी सध्या सा-यांनाच बेजार केलं आहे. अशा स्थितीत आरोग्याची थोडीशी अधिकच काळजी घेणं आवश्यक आहे. तर पावसाळ्यात सर्दी, ताप आणि इतर आजारांचा फैलाव होण्याची शक्यता अधिक असते. मात्र उन्हाळ्यातही ते होऊ शकतात, याची प्रचिती आपल्याला गेल्या उन्हाळ्यात आली होती. मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, आमांश, कावीळ इत्यादी आजार नेहमीचे असतात. या आजारांमुळे रुग्णाच्या शरीरातील व्हाईट प्लेटलेट्स कमी होतात आणि आजाराशी लढा देण्याची त्याची प्रतिकारशक्ती कमी होते. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे कोव्हिड-19 सारख्या आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढते.

अधिक रकमेचे विमा संरक्षण देणारी सर्वसमावेशक पॉलिसी निवडा

वाढणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा विचार करून पुरेशा रकमेची विमा पॉलिसी निवडणं महत्त्वाचं आहे. तुमचे वय, कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि कुटुंबामध्ये आधीपासून असलेले आजार यावरून विमा पॉलिसीची तुमच्यासाठी आवश्यक किंवा पुरेशी रक्कम ठरत असते. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आरोग्य विमा घेणाऱ्यांनी किमान 3 लाखांची विमा पॉलिसी (sum amount) घ्यावी. भारतातील बहुतेक कुटुंबं ही सर्वसाधारणपणे 7 ते 9 लाखापर्यंतच्या विमा पॉलिसी घेतात. किमान 10 लाख रुपयांच्या पॉलिसी असणं केव्हाही उत्तम. तसंच, फॅमिली फ्लोटर पॉलिसी असेल तर विमा पॉलिसी अधिक रकमेची असावी. कारण यात संपूर्ण कुटुंबासाठी विमा संरक्षण घेतलेलं असतं.

कोणतीही विमा पॉलिसी निश्चित करण्याआधी त्या उत्पादनाची/योजनेची वैशिष्ट्ये जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही मूळ पॉलिसीमध्ये पुढील संरक्षण मिळणे आवश्यक आहे.

1. हॉस्पिटलायझेशनचा खर्च 

2. कोणत्याही वैद्यकीय गुंतागुंतीवर उपचार करण्यासाठी करावा लागणाऱ्या शस्त्रक्रियेचा खर्च  

3. उपचार आणि औषधांचा खर्च. 

तुमच्या विशिष्ट गरजा आणि कौटुंबिक पार्श्वभूमीनुसार विम्याची रक्कम कस्टमाइझ (तुमच्या आवश्यकतांनुसार) करण्याची लवचिकता उत्पादनात असणे गरजेचं आहे. बाजारात अशीही काही उत्पादनं आहेत जी विमा रकमेच्या कमाल 100 टक्क्यापर्यंत संकलित बोनस (bonus) देतात.

विस्तृत संरक्षण, किमान प्रतीक्षा कालावधी असलेल्या पॉलिसीची निवड करावी

बहुतेक विमा पॉलिसींमध्ये प्रतीक्षा कालावधी अंतर्भूत असतो. प्रतीक्षा कालावधीची तुलना करून त्यानुसार योजनेची निवड करणे आवश्यक असतं आणि केव्हाही किमान प्रतीक्षा कालावधी असलेल्या पॉलिसीची निवड करणं उत्तम मानलं जातं. विमा कंपनीने कितीही रकमेचे संरक्षण दिलं, पॉलिसीची रक्कम कितीही असली तरी विशिष्ट आजाराच्या उपचारासाठी विशिष्ट मर्यादेपलीकडे संरक्षण दिलं जात नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये अधिक प्रीमिअम (premium) असेल तर उप-मर्यादा नसतात. कमी प्रीमियम असेल तर उप-मर्यादा असतात. आरोग्य विमा पॉलिसी ही आपलं एकूण बजेट लक्षात घेऊनच निवडावी. पण उप-मर्यादा असलेल्या योजना मर्यादित संरक्षण देतात, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू नये.

उच्च भरपाई दावा देणाऱ्या विमाकर्त्याची निवड करावी

कमाल भरपाई प्रमाण (सेटलमेंट रेश्यो) असलेल्या आरोग्य विमा पॉलिसीची निवड करणं हितावह असतं. उच्च दावा भरपाई (claim settlement) प्रमाण असलेली आरोग्य विमा पॉलिसी योग्य मानली जाते.

सध्याच्या कालावधीत विशिष्ट आजारांसाठी विमा संरक्षण देणाऱ्या कंपन्यांच्या अनेक आरोग्य विमा पॉलिसी बाजारात उपलब्ध आहेत. त्यानुसार व्हेक्टर सॅशे (sachet) प्रोडक्टची निवड करता येऊ शकते. या अंतर्गत, अगदी पावसाळ्यात डासांमुळे उद्भवणाऱ्या आजारांपासून विमा संरक्षणदेखील मिळू शकतं. या पॉलिसींचा प्रीमिअमही अगदी वाजवी असतो. तुमच्याकडे नियमित विमा पॉलिसी असेल तरी अतिरिक्त संरक्षण म्हणून अशा विशेष योजनेचा विचार नक्की करता येईल.