प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा रुग्णाला दिली जाते. उपचारादरम्यान औषधोपचार, वैद्यकीय तसंच त्यासंबंधीचा खर्च सरकार उचलतं. या योजनेसाठी जे पात्र आहेत, त्यांना आयुष्मान कार्ड दिलं जातं. याच माध्यमातून त्यांना संबंधित रुग्णालयात मोफत उपचाराची सुविधा मिळवता येते. मात्र आयुष्मान योजनेच्या अंतर्गत (Ayushman Bharat Yojana) तुमच्या शहरातली कोणकोणती रुग्णालय जोडली गेली आहेत, त्याची लिस्ट कशी शोधायची, हेदेखील माहीत असायला हवं.
अॅप डाउनलोड करावं लागणार
- केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेविषयीचं एक मोबाइल अॅपही आहे. या अॅपच्या मदतीनं तुम्ही योजनेअंतर्गत सूचीबद्ध रुग्णालयांची यादी पाहू शकता. यासाठी सर्वात आधी गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) तुम्हाला जावं लागेल.
- आपल्या मोबाइल फोनमध्ये आयुष्मान भारत PM-JAY अॅप इन्स्टॉल करावं.
- अॅप ओपन केल्यावर आयुष्मान योजना अॅपवर विविध सेवा दिसतील. त्यावरून तुम्ही फाइंड एम्पॅनल्ड हॉस्पिटल्सवर (Find Empaneled Hospitals) क्लिक करावं.
- यानंतर राज्याचं नाव, शहराचं नाव आणि ज्याच्यासाठी तुम्ही उपचार घेणार आहात त्या आजाराचा विभाग निवडावा. जसं की, फुफ्फुसाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी, फुफ्फुसाची निवड करावी लागते.
- त्यानंतर सर्च (Search) ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्ही सर्च केलेल्या आजाराशी संबंधित राज्य, शहर आणि रुग्णालयांची यादी गुगल मॅपवर तुम्हाला दिसू लागेल.
- ही रुग्णालयं लाल खुणा म्हणून तुम्हाला दिसतील. तुम्ही क्लिक केलेल्या हॉस्पिटलचं नाव आणि पत्ता तुमच्या समोर येईल.
- याशिवाय, कॉल करण्यासाठी खाली बटणदेखील उपलब्ध करून देण्यात आलंय. त्यावर टॅप करून तुम्ही थेट हॉस्पिटलशी संपर्क साधू शकता.
योजनेसाठीची पात्रता तपासण्याची प्रक्रिया
- सर्वात आधी पीएमजेएवायच्या (PMJAY) अधिकृत वेबसाइट https://pmjay.gov.in/ वर जावं. होमपेजवर 'Am I Eligible' हा पर्याय तपासावा. तुम्हाला हे फक्त वरच्या मेनूमध्ये दिसेल. त्याच्या आधी प्रश्नचिन्हचं (?) चिन्ह असेल. त्यावर क्लिक करावं.
- क्लिक केल्यानंतर, तुमच्या समोर लॉगिन पेज उघडेल. यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. जवळपास लिहिलेला कॅप्चा कोड टाकून OTP जनरेट करावा.
- तुमच्या मोबाइलवर आलेला OTP पाहून तो संबंधित फील्डमध्ये टाकावा. मोबाइल OTP व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला राज्य निवडावं लागेल. ज्या ठिकाणचे रहिवासी असाल ते राज्य यातून निवडावं लागेल.
- राज्य निवडल्यानंतर, तुम्हाला कॅटेगरी निवडावी लागेल. ज्या कॅटेगरीतून तुम्हाला तुमचं नाव तपासायचं आहे, ती कॅटेगरी तुम्ही निवडावी. काही राज्ये फक्त शिधापत्रिका क्रमांकावरून तपासण्याची सुविधा देतात, तर काही राज्ये नाव किंवा कुटुंब क्रमांकाच्या माध्यमातून यादी पाहण्याची सुविधा देतात. काही राज्यांमध्ये, मोबाइल नंबर, रेशन कार्ड आणि आपलं नाव शोधण्याचे पर्याय देण्यात आलेले आहेत. तुम्ही तुमच्या राज्यात दिलेल्या पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडावा.
- या प्रक्रियेनुसार सर्च केल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यास तुम्ही पात्र आहात की नाही, हे समजेल. जर तुमचं नाव आयुष्मान भारत योजनेच्या यादीत समाविष्ट नसेल, तर सर्च रिझल्टच्या बॉक्समध्ये No Result Found अशाप्रकारचं नोटिफिकेशन येईल.
- शोधण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, तुम्ही तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात सर्व आवश्यक कागदपत्रं देऊन आयुष्मान भारत योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की नाही, हे तपासू शकता.
- तुम्ही पात्र असाल तर अशाप्रकारे रजिस्ट्रेशन करावं. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला त्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. नोंदणीसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अटल सेवा केंद्र किंवा जनसेवा केंद्रावर जावं लागणार आहे. तुमच्या सर्व मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपीज सबमिट कराव्या लागतील.
- यानंतर त्या झेरॉक्स कॉपींची मूळ कागदपत्रांमधून लोकसेवा केंद्राकडून पडताळणी करावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन क्रमांक दिला जाईल.
- रजिस्ट्रेशनच्या 10 ते 15 दिवसांनंतर तुम्हाला जनसेवा केंद्राकडून गोल्डन कार्ड मिळेल. त्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.