राज्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच दर्जेदार महामार्गाचे जाळे देखील विस्तारत आहे. या महामार्गावर ठिकठिकाणी टोलची आकारणी केली जाते. टोलची आकरणी करत असताना वाहनधारकांचा जास्त वेळ जाऊ नये आणि टोल कलेक्शनमध्ये सुसुत्रता यावी म्हणून फास्टॅग (FasTag) ही 'इलेक्ट्रॉनिक्स टोल गोळा करण्याची प्रणाली' विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन धारकांचा टोल आता ऑनलाईन पे केला जातो. दरम्यान, काहीवेळा तांत्रिक अडथळ्यांमुळे आपल्या FasTag खात्यातून किती पैसे कट झाले आणि किती रक्कम शिल्लक आहे हे आपणास समजू शकत नाही. आज आपण FasTag खात्यातील शिल्लक रक्कम कशी तपासायची हे जाणून घेऊयात...
FASTag हा वाहनाच्या समोरच्या काचेवर लावण्यात येतो.वाहन टोलगेटवर आल्यानंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने Fastag स्कॅन केले जाते आणि तुमचे टोलचे शुल्क कपात केले जाते. आता हे शुल्क कपात झाल्यानंतर तुम्ही तुमच्या फास्ट टॅग खात्यामधील शिल्लक रक्कम पुढील प्रमाणे चेक करू शकता.
MyFASTag अॅपच्या माध्यमातून
तुमच्या वाहनाच्या नंबरच्या माध्यमातून देखील तुम्ही FASTag खात्यातील बँलन्स चेक करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या मोबाइल फोनच्या अॅप स्टोअर मधून MyFASTag अॅप डाउनलोड करा. त्यानंतर तुमची फास्ट टॅग खात्याशी संबंधित डिटेल्स टाकून अॅपमध्ये लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर, तुमचा वाहन नंबर टाकल्यानंतर तुमच्या वाहन क्रमांकाशी लिंक केलेल्या FASTag खात्यातील शिल्लक तपासू शकता.
FASTag मिस्ड कॉल सुविधा-
MyFASTag अॅप उपलब्ध न झाल्यास FASTag बॅलन्स चेक करण्याची दुसरी सोपी पद्धत म्हणजे टोल फ्री क्रमांकावर कॉल करने. यासाठी तुम्हाला NHAI च्या टोल-फ्री नंबर 1300 कॉल करायचा आहे. किंवा +91-8884333331 या क्रमांकावर मिस कॉल करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एसएमएसच्या माध्यमातून सर्व माहिती उपलब्ध होईल. ही सेवा 24x7 उपलब्ध आहे. मात्र यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक FASTag खात्याशी ळिंक करण्यात आलेला असावा.
ऑनलाईन लॉगिन करून
तुम्ही तुमच्या FASTag आयडी ज्या बँक खात्याशी लिंक केला आहे. त्या बँकेच्या वेबसाईटवर जाऊन देखील तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकता. यासह तुम्हाला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) या अधिकृत वेबसाइटवर देखील FASTag चा बँलन्स तपासता येऊ शकतो. यासाठी तुम्हाला संबंधित संकेतस्थळावर जाऊन तुमच्या वाहनाचा क्रमांक किंवा NETC fastag ID क्रमांक टाकायचा आहे.
एसएमएसद्वारे FASTag शिल्लक तपासा
तुम्ही FASTag खाते उघडत असताना तुमचा मोबाईल क्रमांक त्या संबंधित बँक आणि Fastag खात्याशी लिंक केलेला असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामधून कट झालेले पैस आणि शिल्लक रक्कम दोन्हीचा तपशील प्राप्त होतो.