Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Water Purifier On Rent: वॉटर प्युरिफायर घ्या तेही भाड्याने; महिन्याचे भाडे किती? जाणून घ्या

Water Purifier On Rent

Image Source : https://www.kent.co.in

वॉटर प्युरिफायर तुम्ही भाड्यानेही घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला मासिक भाडे भरावे लागेल. अनेक आघाडीच्या कंपन्या फिल्टर भाड्याने देतात. दुरूस्ती, देखभालीचा कोणताही खर्च न करता तुम्हाला शुद्ध पाणी प्यायला मिळेल. तात्पुरत्या काळासाठी जर तुम्हाला फिल्टर हवे असेल तर तुम्ही रेंटवर घेऊ शकता. सविस्तर माहिती वाचा.

Water Purifier On Rent: शुद्ध पाणी प्यायल्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. तसेच दीर्घकाळात तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. कारण, पालिकेकडून आलेले पाणी किंवा बोअरवेल, नळाचे पाणी थेट प्यायलाने आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आजकाल घरगुती वॉटर फिल्टर बसवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, तुम्ही फिल्टर भाड्यानेही घेऊ शकता. वापर झाल्यानंतर तुम्हाला फिल्टर माघारी करता येईल. 

फिल्टर जर तुम्ही विकत घेतले असेल तर त्याचा दर तीन किंवा सहा महिन्यांनी देखभाल खर्च करावा लागतो. घरात जास्त सदस्य असतील तर RO हा महागडा फिल्टर वारंवार बदलण्याची वेळ येऊ शकते. 

तसेच जर तुम्ही रेंटवर एखाद्या शहरात काही वर्ष किंवा महिन्यांसाठी राहणार असाल तर भाड्याने फिल्टर घेऊ शकता. त्याची दुरूस्ती करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त त्यासाठी मासिक भाडे द्यावे लागेल. 

आघाडीच्या कंपन्यांकडून घ्या भाड्याने वॉटर फिल्टर

युरेका फोर्ब्ज, लिवप्युअर, डीपी या सारख्या कंपन्या भाड्याने वॉटर प्युरिफायर देतात. कंपन्यांचे तीन, सहा, नऊ, 1 वर्ष असे सबस्क्रिप्शनचे विविध प्लॅन्स आहेत. तुमची दरमहा पाण्याची गरज किती त्यानुसार तुम्ही योग्य तो प्लॉन निवडू शकता. 

युरेका फोर्ब्ज वॉटर प्युरिफायर रेंट प्लॅन 

युरेका फोर्ब्स कंपनीचे अॅक्वागार्ड हे वॉटर प्युरिफायर भाड्याने मिळते. कंपनीच्या वेबसाइटवर विविध सबस्क्रिप्शन प्लॅन्स उपल्बध आहेत. तुम्ही थेट वेबसाइटवरून रेंटवर प्युरिफायर बुक करू शकता. किंवा अधिक माहिती हवी असल्यास हेल्पलाइनवर कॉल करू शकता. कॉलवर तुम्हाला मासिक भाडे आणि इतर शुल्क नियम यांची माहिती मिळेल. 

युरेका फोर्ब्ज कंपनीच्या चार सबस्क्रिप्शन प्लॉनद्वारे तुम्ही प्युरिफायर भाड्याने घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 1400 रुपयांचे रिफंडेबल डिपॉझिट जमा करावे लागेल. तसेच वॉटर प्युरिफायर इन्स्टॉल करण्यासाठी किंवा बिघाड झाल्यास दुरूस्तीसाठी पैसे देण्याची गरज नाही. सर्व देखभाल, दुरूस्ती कंपनीद्वारे केली जाईल. 

water-purifier.png

एक महिन्याचे भाडे 699 रुपये आहे. यात तुम्हाला RO+UV+कॉपर फिल्टर असलेला प्युरिफायर भाड्याने मिळेल. तीन महिन्यांसाठी 2,037 रुपये भाडे द्यावे लागेल. सहा महिन्यांसाठी 3,894 आणि एक वर्षासाठी 7,188 रुपयांमध्ये भाड्याने मिळेल. 

यामध्ये तुम्ही पाण्याची अनलिमिटेड वापर करू शकता. डिलिव्हरी मेंटनन्ससाठी काहीही खर्च करावा लागणार नाही. दरम्यान, ही सुविधा काही ठराविक शहरांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीकडून येत्या काळात सेवा वाढवण्यात येणार आहे. 

लिवप्युअर वॉटर प्युरिफायर ऑन रेंट 

लिवप्युअर कंपनीकडून वॉटर प्युरिफायर भाड्याने देण्याचे दोन प्लान आहे. मर्यादित पाण्याचा वापर आणि अमर्यादित पाण्याचा वापर यानुसार भाडे घेतले जाते. 125 लिटर मासिक पाण्याच्या वापरासाठी 349 रुपये आकारले जातात. तर 1 वर्षासाठी 4188 रुपये भाडे आहे. सहा महिन्यांसाठी 2394 रुपये भाडे आहे. 

water-purifier-2.png

अमर्यादित पाणी वापराच्या प्लॅनची निवड केल्यास वार्षिक 5998 रुपये भाडे आकारले जाईल. 1499 रुपये रिफंडेबल डिपॉजिट घेतले जाईल. तसेच घरी येऊन प्युरिफायर मोफत बसवून दिले जाईल. कॉपर वॉटर प्युरिफायरसाठी जास्त भाडे आहे. कंपनीच्या वेबसाइटवर सविस्तर माहिती वाचायला मिळेल. 

नियम अटी बारकाईने वाचा 

यासोबतच इतर अनेक संकेतस्थळे आहेत ज्यावर तुम्हाला रेंटवर प्युरिफायर मिळेल. जस्ट डायलशी संपर्क करूनही स्थानिक प्युरिफायर रेंटवर देणाऱ्या शॉपची माहिती मिळेल. तसेच इतर कंपन्यांची ऑनलाइन संकेतस्थळे आहेत. ज्यावर जाऊन तुम्ही प्युरिफायर भाड्याने घेऊ शकता. विविध कंपन्यांशी तुलना करून आणि नियम, अटी बारकाईने वाचून वॉटर प्युरिफायर भाड्याने घेण्याचा निर्णय घ्या.