Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sovereign Gold Bond Scheme: ऑनलाईन खरेदी करायची आहे? या बॅंकांच्या वेबसाईटवर आहे सुविधा

Sovereign Gold Bond Scheme

सोने स्वस्तात खरेदी करायचे असल्यास, साॅवरेन गोल्ड बाॅण्ड योजनेद्वारे तुम्ही खरेदी करु शकणार आहात. साॅवरेन गोल्ड बाॅण्ड्सची विक्री 11 सप्टेंबरपासून सुरू झाली असून ग्राहकांना 15 सप्टेंबरपर्यंत बाॅण्ड खरेदी करता येणार आहे. तुम्हाला जर हे बाॅण्ड कुठे खरेदी करायचे आहेत असा प्रश्न पडला असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सोन्याचा 5,923 रुपये प्रति ग्रॅम दर निश्चित केला आहे. तसेच, तुम्ही ऑनलाईन खरेदी केल्यास, यावर तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपये सवलत मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला 1 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी 5,873 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच, साॅवरेन गोल्ड बाॅण्ड्सची विक्री 11 सप्टेंबरपासून सुरू झाली असून ग्राहकांना 15 सप्टेंबरपर्यंत बाॅण्ड खरेदी करता येणार आहे. 

बाॅण्ड नेटबॅंकिंगद्वारे खरेदी करता येणार

हे बाॅण्ड खरेदी करण्यासाठी ग्राहक ऑनलाईन नेटबॅंकिंगद्वारे SBI, HDFC Bank, PNB, Canara Bank आणि ICICI Bank आदींवरुन खरेदी करु शकणार आहेत. याशिवाय गुंतवणुकदारांना कमर्शियल बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजमधून गोल्ड बाॅण्ड खरेदी करता येणार आहेत.  

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) SGB मध्ये गुंतवणूक करण्यासाठी स्टेप्स

  • SBI च्या नेट बँकिंग खात्यात लॉग इन करा.
  • eServices वर क्लिक करा आणि 'Sovereign Gold Bond'वर जा.
  • terms and conditions निवडा आणि 'proceed' वर क्लिक करा.
  • रजिस्ट्रेशन फॉर्म भरा. ही वन-टाईम नोंदणी असणार आहे.
  • सबमिट'वर क्लिक करा.
  • खरेदी फॉर्ममध्ये सबस्क्रिप्शन क्वांटिटी आणि नॉमिनी डिटेल्स टाका.
  • आता 'सबमिट' वर क्लिक करा.

अशाच पद्धतीने तुम्ही अन्य बॅंकाच्या वेबसाईटवर जाऊन, नेटबॅंकिंग खात्यात लाॅग इन करुन, गोल्ड खरेदी करु शकणार आहात. यासाठी तुमच्याजवळ नेटबॅंकिंगशी संबधित गोष्टी असणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही काही मिनिटांत गोल्ड बाॅण्ड खरेदी करु शकणार आहात.

गोल्ड बाॅण्ड खरेदी करण्याचे फायदे

गोल्ड बाॅण्डमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे SBI ने सांगितले आहे. त्यानुसार, साॅवरेन गोल्ड बाॅण्डमध्ये गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित आणि गॅरंटीड रिटर्न आहे. याशिवाय तुम्हाला 2.5 टक्के वार्षिक दराने सहामाही रिटर्न मिळते. तसेच, तुम्हाला गोल्ड सांभाळण्याचे टेन्शनही राहत नाही. 

गोल्ड विकताना कॅपिटल गेन टॅक्स देण्याचीही गरज नाही. तसेच, तुम्हाला कर्ज घ्यायचे असल्यास, हे बाॅण्ड तुम्ही गहाणही ठेवू शकणार आहात. सर्वांत महत्वाचा फायदा म्हणजे, बाॅण्ड खरेदी करताना तुम्हाला जीएसटी आणि मेंकिंग चार्ज देण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही  साॅवरेन गोल्ड बाॅण्डमध्ये गुंतवणूक केल्यास फायद्यात राहणार आहात.