Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Personal loan on Google Pay : जाणून घ्या, 'गुगल-पे'वर पर्सनल लोनसाठी कसा करायचा अर्ज

Personal loan on Google Pay : जाणून घ्या, 'गुगल-पे'वर पर्सनल लोनसाठी कसा करायचा अर्ज

Image Source : www.pay.google.com

सुरक्षितपणे पैशाची ऑनलाईन देवान-घेवान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या Google Pay या अॅपवर तुम्हाला आता अगदी सहज पर्सनल लोन (Personal Loan) मिळवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जर तुम्हाला कर्जाची गरज असेल तर यापुढे बँकेत जायची गरज नाही. तुम्ही गुगल-पे या अॅपच्या माध्यमातून देखील कर्जासाठी अर्ज करू शकता आणि कर्जास पात्र ठरल्यास कर्जही मिळवू शकणार आहात.

डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा सुरू झाल्यानंतर फोन-पे, पेटीएम याप्रमाणे गुगल-पे (Google-Pay) चा व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. सुरक्षित व्यवहारासह गुगल-पे कडून ग्राहकांना विविध सुविधा  आणि ऑफरही देण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे  Google Pay वर आणखी एक सुविधा सुरू झाली आहे. ती म्हणजे वैयक्तिक कर्जाची (Personal Loan), होय! आता तुम्हाला गुगल पे- अॅपच्या माध्यमातूनच वैयक्तिक कर्ज काढता येणार आहे. आज आपण गुगल पेवर वैयक्तिक कर्जासाठी कशा प्रकारे अर्ज (Application For Personal Loan) करायचा याबाबतची माहिती जाणून घेऊ..

गुगल पेच्या माध्यमातून कर्जाची सोय-

सुरक्षितपणे पैशाची ऑनलाईन देवान-घेवान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या Google Pay या अॅपवर तुम्हाला आता अगदी  सहज पर्सनल लोन (Personal Loan) मिळवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जर तुम्हाला कर्जाची गरज असेल तर यापुढे बँकेत जायची गरज नाही. तुम्ही गुगल-पे या अॅपच्या माध्यमातून देखील कर्जासाठी अर्ज करू शकता आणि कर्जास पात्र ठरल्यास कर्जही मिळवू शकणार आहात.

विविध वित्तीय संस्थाकडून मिळेल कर्ज-

Google Pay वर तुम्हाला विविध वित्तीय संस्थाकडून कर्जाची सोय उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे कर्जासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी तुम्ही ज्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणार आहात. त्यांचे नियम आणि व्याजदर याबाबतची माहिती आवश्य घ्या. गुगल पेवर फेडरल बँक, IDFC बँक यासह, DMI फायनान्स या वित्तीय संस्थांकडून पर्सनल लोन दिले जाते.

किती मिळू शकते कर्ज?

गुगल पे च्या माध्यमातून अर्जदारास 10000 पासून 1 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते. तसेच या कर्जासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 15% वार्षिक व्याजदराने कर्ज मिळू शकते या कर्जासाठी तुम्हाला 36 महिन्याची परतफेडीसाठी मुदत मिळू शकते. तुमच्या कर्जाचे हप्ते तुमच्या बँक खात्यातून महिन्याला कट केले जातात. दरम्यान, कर्ज घेण्यापूर्वी अर्जदाराचे पॅन, आधार कार्ड, तसेच तुमच्या बँकेचा तपशील याबाबतची माहिती भरावी लागते. त्यानंतर संबंधित बँकेकडून पडताळणी झाल्यानंतर  तुम्ही कर्जास पात्र असाल तरच तुम्हाला कर्ज रक्कम प्राप्त होते.

Google Pay वर वैयक्तिक कर्जासाठी पुढील स्टेपनुसार तुम्ही अर्ज करू शकता.

  • प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमधील Google Pay ॲप ओपन करा
  • त्यानंतर तुम्ही Google Pay स्क्रीनवरील Money या पर्यायवर क्लिक करा
  • या ठिकाणी तुम्हाला कर्ज (Loan) या 'टॅब'वर क्लिक करायचे आहे.
  • तुम्हाला कर्जाच्या वेगवेगळ्या ऑफर्स या ठिकाणी उपलब्ध होतील.
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या आवश्यकते नुसार योग्य कर्जाची निवड करा
  • त्यानंतर तुम्ही ॲपवर कर्जाशी संबंधित माहिती भरा
  • यामध्ये तुम्हाला नाव, पॅन, आधार, कर्जाची किंमत, तुमचा पत्ता इत्यादी माहिती भरायची आहे.
  • पूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ओटीपी (OTP) येईल
  • पेजवरील संबंधित रकाण्यामध्ये OTP टाकल्यानंतर बँकेकडून तुमच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल.
  • त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा Google Pay ॲपवरील कर्जाच्या पेजवर या.
  • या ठिकाणी तुम्हाला तुमचे मंजूर होणारे कर्ज, व्याजदर, ईएमआय, या संबंधीचे तपशील मिळतील.
  • यानंतर तुम्ही सर्व निमय पडताळणी करून कर्ज घ्यायचे किंवा नाही, हे निश्चित करून पुढील परवानगी देऊ शकता.
  • या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँकेकडून तुमच्या खात्यामध्ये कर्जाची रक्कम ट्रान्सफर केली जाईल.