Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Second hand car sale: तुमची जुनी कार स्वस्तात विकू नका! योग्य किंमत मिळवण्यासाठी 'या' गोष्टींकडे लक्ष द्या

How Second-Hand Cars are Valued

Image Source : www.express.co.uk

मागील काही वर्षांपासून सेकंड हँड कार मार्केट वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहेत. दर दिवस बाजारात नवनवीन मॉडेल येत असून जुनी कार विकून नवी कार घेण्याकडेही अनेकांचा कल आहे. मात्र, जुन्या कारला चांगली किंमत मिळत नाही. चांगल्या स्थितीतील कारही स्वस्तात कार विकायची वेळ येते. त्यामुळे खालील टिप्स फॉलो करुन गाडीची चांगली किंमत मिळवण्याचा प्रयत्न करा.

Second hand car sale: मागील काही वर्षांपासून सेकंड हँड कार मार्केट वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहेत. दर दिवस बाजारात नवनवीन मॉडेल येत असून जुनी कार विकून नवी कार घेण्याकडेही अनेकांचा कल आहे. मात्र, जुन्या कारला चांगली किंमत मिळत नाही, स्वस्तात कार विकायची वेळ येते. त्यामुळे आर्थिक नुकसानही होते. अनेकजण त्यामुळे कार विकण्याचा निर्णय पुढे ढकलतात. मात्र, कार तुमची कार विकण्यापूर्वी खालील गोष्टींकडे तुम्ही ध्यान द्यायला हवे.

कार विकण्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. तुमच्या ओळखीच्या लोकांना थेट कार विकण्याशिवाय तुम्ही लोकल डिलरला कार विकू शकता. तसेच ऑनलाइन पोर्टलची  मदतही घेऊ शकता. अधिकृत डिलरकडेच गाडी विकण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. त्यातून तुमची फसवणूक टळू शकते. तुमची कार विक्री झाल्यानंतर बेकायदेशीर गोष्टींसाठी वापर होऊ नये असे वाटत असेल तर अधिकृत डिलरकडे जा. कारण त्यांच्याद्वारे गाडी खरेदी विक्री (How Second-Hand Cars are Valued) करताना कागदपत्रांची तपासणी केली जाते. 

गाडी विकताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात त्या पाहू. ज्यावर गाडीची किंमत ठरते.

गाडीचे मूल्य (Second hand car valuation)

तज्ज्ञांच्या मते जास्त जुन्या गाडीला चांगली किंमत मिळत नाही. 3 ते 5 वर्ष जुन्या गाडीला चांगली किंमत मिळू शकते. भारतामध्ये विक्री होणाऱ्या जुन्या गाड्यांचे सरासरी वय 5 ते 7 वर्ष आहे. त्यापेक्षा जास्त जुनी गाडी असेल तर मेंटनन्स खर्च वाढतो. त्यामुळे गाडी विकताना चांगली किंमत मिळत नाही, हे लक्षात असू द्या.

गाडीचे मूल्य ठरवण्यासाठी अनेक पोर्टलकडे ऑनलाइन कॅलक्युलेटर्स असतात. गाडीचे वय हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक वर्षी गाडीचा घसारा होत असतो. म्हणजेच मूल्य कमी होत असते. प्रत्येक वर्षी 10 ते 25% पर्यंत किंमतीत घसारा होऊ शकतो. मात्र, फक्त गाडीचे वय हा एकच मुद्दा नाही. जेवढे गाडीचे वय कमी असेल तेवढी चांगली किंमत मिळू शकते. त्याऊलट जास्त जुनी गाडी चांगल्या स्थितीतही असेल तरी किंमत कमी मिळते.

गाडीचे मॉडेल, व्हेरियंट, किलोमीटर रनिंग, कंडिशन, रजिस्ट्रेशन वर्ष, किती जणांनी आधी कार वापरली यावर गाडीची किंमत ठरते. ज्या गाड्यांची मॉडेल्स डिमांडमध्ये असतात, त्यांनाही चांगली किंमत मिळते. मारुती सुझुकी, ह्युंदाई I10 या गाड्यांना चांगली रिसेल व्हॅल्यू असते. रंगाचा विचार करता पांढऱ्या रंगाच्या गाडीला जास्त किंमत मिळण्याची शक्यता असते. गाडीची मालकी आधी एकापेक्षा जास्त जणांकडे असेल तर त्यामुळे गाडी विकताना किंमत कमी मिळते.

गाडीची कमी रनिंग झाली असेल म्हणजेच झीज कमी झाली असे समजले जाते. तसेच ज्या गाडीचा आधी कधीही अपघात झाला नाही, अशा गाड्यांना चांगली किंमत मिळते. गाडी किती किलोमीटर चालवली यावर 10% किंमत ठरू शकते. तसेच गाडीचा रंग, टायर, इंजिन या बाबीवरुन 7 ते 8% किंमत अवलंबून असते.

कार विक्री करण्याच्यावेळी विमा रिन्यू केलेला नसेल तर गाडीला कमी किंमत मिळू शकते. इन्शुअर्ड कारला चांगली किंमत मिळते. अनेक जण फक्त गाडी विकायची म्हणून विमा पुन्हा काढत नाहीत. विमा संरक्षण असताना कार विकताना फायदा होऊ शकतो.

गाडी कायम अधिकृत सर्विस सेंटरमधूनच सर्व्हिसिंग करून घ्या. अनधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये गाडीची सर्व्हिसिंग नीट होण्याची शक्यता कमी असते. ऑइल फिल्टर, एअर फिल्टर, इंजिन ऑइल, गिअर ऑइल, एअर कंडिशनर फिल्टर अधिकृत सेंटर्सकडून योग्य पद्धतीने बदलले जातात. त्याचा परिणाम दीर्घ काळात गाडीच्या परफॉर्मन्सवर पडू शकतो. तसेच गाडी विकण्याआधी गाडीवरील स्क्रॅच आणि डेन्ट नीट करून घ्यावेत.

गाडीची कागदपत्रे

गाडी विकताना सर्व कागदपत्रे नीट जवळ ठेवावीत. गाडीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, विमा, प्रदूषण सर्टिफिकेट (PUC), सर्व्हिसिंग रेकॉर्ड, फायनान्शिअल कॉन्ट्रॅक्ट आणि ओनर्स मॅन्युअल बरोबर ठेवावे.