Yewle Amrittulya Tea: काही दिवसांपूर्वी फॅमिली ट्रीपसाठी शेगावी जाणून आलो. तेथे घडलेला प्रसंग… आमच्या आजीला दिवसभरात 4 कप म्हणजेच चार 4 वेळा चहा लागतो. सकाळी उठल्याबरोबर ती म्हणाली, तुमचं आवरलं असेल तर मला चहा मिळेल का? त्यावर दादा म्हणाला अगं आजी, शेगावी आल्यानंतर येथील कचोरी आणि अमृततुल्य चहा घेतल्याशिवाय शेगावीची वारी पूर्ण होत नाही. चल तुला अमृततुल्य चहा आणि शेगावची कचोरी दोन्ही आज माझ्याकडून.
हे एकूण आई आणि मला सुद्धा उत्सुकता लागली. सकाळच्या वेळी अनेकांच्या तोंडातून अमृततुल्य चहाचे नाव ऐकले. आणि जेव्हा तो चहा घेतला आणि डोळ्याने तेथील सर्व उत्साह, प्रशंसा बघितली तेव्हा कळलं की काय आहे अमृततुल्य.
येवले अमृततुल्य हे नाव अनेकांच्या परिचयाचे आहे. हे नाव एकूण चहा प्रेमीच्या तोंडाला पाणी सुटेल इतकी प्रचिती या नावाची आहे. येवले बंधूंनी 2018 येवले अमृततुल्यची स्थापना केली. 2017 मध्ये, पुण्यात येवले बंधूंनी भारती विद्यापीठाजवळ एका मित्राचा फूड जॉइंट ओपन केला. पुणेकरांनी याला भरभरून प्रेम दिलं. त्यानंतर हा ब्रँड संपूर्ण भारतात लोकप्रिय होऊ लागला. विदर्भात सुद्धा याच्या अनेक शाखा आहेत.
Table of contents [Show]
- दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू केले येवले अमृततुल्य..
- अमृतशी तुलना करता येण्याजोगे म्हणजे अमृततुल्य…..
- भारतातील चहा व्यवसायाची व्याप्ती
- येवले अमृततुल्य फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे का?
- तुम्ही येवले अमृततुल्य फ्रँचायझी कशी सुरू करू शकता?
- येवले अमृततुल्य फ्रँचायझीची शाखा घेण्यासाठी लागणारा खर्च?
- फर्मची नोंदणी करण्यासाठी काय करावे?
- येवले चहा फ्रँचायझी कशी मिळवायची ?
दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू केले येवले अमृततुल्य..
येवले बंधूंनी त्यांचे दिवंगत वडील श्री दशरथ भैरू येवले यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा विचार केला असतांना येवले अमृततुल्य या संकल्पनेचा उगम झाला. त्यांच्या कुटुंबाचा वारसा म्हणून, "गणेश अमृततुल्य" या नावाने त्यांचे चहाचे स्टॉल होते. त्यांना मिळालेला वारसा म्हणजे त्यांच्या वडिलांची व्यवसायातील दोन तत्वे कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा. अनेक संशोधने, प्रयोग आणि अयशस्वी झाल्यानंतर येवले बंधूंना येवले अमृततुल्यची कल्पना सुचली.
9 फेब्रुवारी 2018 ला त्यांनी पहिली येवले अमृततुल्यची शाखा उघडली. त्यात त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला. आणि आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जवळ जवळ 290 फ्रेंचाईजी पर्यंत पोहोचले आहेत. आणि येवले अमृततुल्यचा टर्नओव्हर 40 कोटीपर्यंत पोहचला आहे.
अमृतशी तुलना करता येण्याजोगे म्हणजे अमृततुल्य…..
अमृततुल्य शब्दाचा शब्दकोश अर्थ "अमृत" असा आहे. अमृत हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ "अमरत्व" आहे आणि तुल्य म्हणजे "तुलनायोग्य" असा होतो. परिणामी, अमृततुल्य म्हणजे "अमृतशी तुलना करता येण्याजोगे" म्हणजेच गोड.
भारतातील चहा व्यवसायाची व्याप्ती
चीननंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा चहा उत्पादक देश मानला जातो. संशोधनानुसार, चहा उद्योग 2026 पर्यंत 4.2% च्या CAGR (कम्पाउंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट) ने वाढण्याची अपेक्षा आहे. भारतात वार्षिक 1.40 दशलक्ष टन चहाचे उत्पादन अपेक्षित आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एकूण उत्पादित TEA पैकी सुमारे 80% भारतात घरगुती वापर केला जातो. एका प्रौढ व्यक्तीचा चहाचा सरासरी दैनिक वापर दररोज 2-3 कप असतो.
येवले अमृततुल्य फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे का?
येवले अमृततुल्यच्या देशभरात सुमारे 280 शाखा आहेत, त्यापैकी बहुतांश शाखा महाराष्ट्रात आहेत. चहामुळे थकवा जातो, असा अनेकांचा समज आहे त्यामुळे चहाची मागणी लवकर कमी होईल असे वाटत नाही, त्यामुळे गुंतवणूक करणे हा एक उत्तम व्यवसाय आहे. ही शाखा शहरात आणि ग्रामीण भागत कुठेही उघडू शकता.
तुम्ही येवले अमृततुल्य फ्रँचायझी कशी सुरू करू शकता?
तुम्हाला येवले अमृततुल्य चहाची शाखा ओपन करायची असेल तर त्याविषयी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर मिळेल.
येवले अमृततुल्य फ्रँचायझीची शाखा घेण्यासाठी लागणारा खर्च?
तुम्ही जर येवले अमृततुल्य फ्रँचायझीची शाखा घेण्याचा विचार करत असाल तर फ्रेंचायझीची शाखा घेण्यासाठी तुम्हाला सुमारे 13,00,000 खर्च येऊ शकतो.
प्लंबिंग वर्क, सिव्हिल वर्क, हार्डवेअर आणि एसीपी पॅनेलबोर्ड 4 लाख रुपये. स्टील काउंटर, रेफ्रिजरेटर, कूलर, दूध उकळण्याचे यंत्र, दुधाचा जग आणि गॅस पाइपलाइन 4 लाख 10 हजार रुपये. स्वयंपाकघरातील साहित्य 70 हजार रुपये. विपणन आणि इतर संबंधित खर्च 1 लाख 50 हजार रुपये. आउटलेट खर्च 1 लाख रुपये. सॉफ्टवेअर, बिलिंग टॅब, सीसीटीव्ही, एलईडी, वाय-फाय कनेक्शन यासारख्या आयटी पायाभूत सुविधासाठी 92 हजार 700 रुपये. इतर खर्च 67800 रुपये.
फर्मची नोंदणी करण्यासाठी काय करावे?
फर्मची नोंदणी करण्यासाठी तुम्ही येवले टी हाऊस व्यवसाय एकतर मालकी किंवा भागीदारी फर्म सुरू करू शकता. जर तुम्ही येवले टी हाऊसचा व्यवसाय एक व्यक्ती कंपनी म्हणून सुरू करत असाल तर तुम्हाला तुमची कंपनी मालकी म्हणून नोंदणी करावी लागेल. जीएसटी क्रमांक, कर ओळख क्रमांक आणि विमा प्रमाणपत्र आवश्यक आहे. येवले अमृततुल्य फ्रँचायझी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री कॅटेगरी अंतर्गत आहेत. म्हणून त्यासाठी FSSAI परवाना आवश्यक आहे.
येवले चहा फ्रँचायझी कशी मिळवायची ?
तुम्ही मुख्य कार्यालयाला भेट देऊन येवले अमृततुल्य फ्रँचायझी मिळवू शकता किंवा या व्यवसायाच्या सुवर्णसंधीसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. जर तुम्ही येवले चहा फ्रँचायझीसाठी शॉर्टलिस्ट झालात तर येवले फ्रँचायझर तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी कॉल करतील.