Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Taxi Driver: जाणून घ्या महिन्याला किती कमाई करू शकता?

taxi driver salary india

Image Source : https://www.freepik.com/

ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या राइड शेअरिंग कंपन्यांनी भारतीय बाजारात एंट्री केल्यानंतर भारतातील टॅक्सी सेवेमध्ये मोठा बदल देखील पाहायला मिळत आहे.

गेल्याकाही वर्षात भारतातील टॅक्सी सेवेमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. खासकरून, ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या राइड शेअरिंग कंपन्यांनी भारतीय बाजारात एंट्री केल्यानंतर पारंपारिक टॅक्सी सेवाला मोठा फटका बसला आहे. या कंपन्यांना पारंपारिक टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षाचालकांकडून विरोध होत असला तरी याचा वापर मोठ्याप्रमाणात होतोय.

ओला, उबरच्या माध्यमातून कारचालकांना कमाईचे नवीन माध्यम देखील मिळाले आहे. अनेक वाहनचालक आज टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करताना महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहे. या कामातून होणाऱ्या आकर्षक कमाईमुळे अनेकजण टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करण्याला प्राधान्य देत आहेत. 

टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करताना महिन्याला किती कमाई होऊ शकते, पारंपारिक मीटर टॅक्सी चालवावी की ओला, उबरच्या माध्यमातून काम करावे ? अशा विविध प्रश्नांची उत्तरे या लेखातून जाणून घेऊयात.

टॅक्सी ड्रायव्हर – योग्य करिअर निवड?

भारतात इतर नोकऱ्यांच्या तुलनेत टॅक्सी ड्रायव्हरच्या कामाला दुय्यमतेने पाहिले जाते. मात्र, जोपर्यंत योग्य काम करताना तुम्हाला चांगला पगार मिळत असेल व त्या पैशातून स्वतःचा खर्च भागवणे शक्य असल्यास, कोणतीही नोकरी अथवा काम हे निश्चितच चांगले आहे.

तुम्ही स्वतःची कार रेंटल सर्व्हिस देखील सुरू करू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला मोठी गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला 2-3 गाड्या खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर या गाड्या प्रवाशांना भाड्याने देऊ शकता. यातून महिन्याला नियमित कमाई सुरू होईल. 

पारंपारिक मीटर टॅक्सी vs ओला, उबर 

ओला, उबरचा वापर वाढला आहे. प्रामुख्याने मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये नोकरदार वर्गाकडून राइड शेअरिंग अ‍ॅपच्या माध्यातून मोठ्या प्रमाणात कॅब बुकिंग केले आहे. मात्र, आजही अनेक ठिकाणी पारंपारिक मीटर टॅक्सी व ऑटोरिक्षा सेवा तग धरून आहेत. 

तुम्ही तुमच्या सोयीनुसार पारंपारिक मीटर टॅक्सी चालवायची की ओला, उबरच्या माध्यमातून काम करायचे हे ठरवू शकता. राइडशेअरिंग अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवासी थेट तुमच्यापर्यंत पोहचतात. त्यामुळे यातून कमाईची शक्यताही अधिक असते. तसेच, ग्राहक देखील ओला, उबरच्या सेवेला प्राधान्य देत असल्याने तुमच्या कारची या ठिकाणी नोंदणी करणे फायद्याचे ठरेल. 

तुम्ही पारंपारिक मीटर टॅक्सी चालवूनही कमाई करू शकता. मात्र, इतर पारंपारिक टॅक्सी चालकांसोबतच ओला, उबरच्या स्पर्धेचा देखील सामना करावा लागू शकतो.

मुंबई, पुणे आणि बंगळुरूमध्ये सर्वाधिक कमाई - 

मुंबई, पुणे आणि बंगळुरू सारख्या शहरांमध्ये टॅक्सी चालवणाऱ्या वाहनचालकांची कमाई सर्वाधिक आहे. महानगरांमध्ये नोकरदार वर्गांची संख्या मोठी असल्याने टॅक्सी सेवेचा जास्त वापर केला जातो. या शहरांमध्ये राइडशेअरिंगच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात कॅबचे बुकिंग केले जाते. तर दुसरीकडे छोट्या शहरांमध्ये आजही पारंपारिक ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे शहरांनुसार टॅक्सी चालकांच्या कमाईमध्ये देखील फरक पाहायला मिळतो. याशिवाय, पर्यटन क्षेत्रात राहत असल्यास शनिवार-रविवारच्या दिवशी टॅक्सीची जास्त मागणी असते. त्यामुळे विकेंडला वाहनचालकांची जास्त कमाई होते.

टॅक्सी ड्रायव्हर्सची महिन्याची कमाई हजारो रुपये

तुम्ही जर टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करण्याचा विचार करत असाल तर हा नक्कीच चांगला निर्णय आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे या कामातून तुम्ही महिन्याला 30 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

पारंपारिक मीटर टॅक्सी व ऑटो रिक्षा चालक महिन्याला 30 ते 40 हजार रुपये कमाई करतात. तर ओला, उबरच्या माध्यमातून काम करणारे वाहनचालक महिन्याला 35 हजार ते 70 हजार रुपयांची कमाई करतात. शहरानुसार व कामाच्या तासानुसार कमाईमध्ये देखील फरक पडतो. 

याशिवाय, टॅक्सी ड्रायव्हर्स म्हणून काम करताना आरोग्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक सातत्याने वाहन चालवल्याने मान, पाठदुखीचा त्रास होतो.

गुंतवणूक व खर्चाकडेही द्या लक्ष 

स्वतःची टॅक्सी सेवा सुरू करण्याआधी गुंतवणूक व खर्चाकडे लक्ष देणे देखील गरजेचे आहे. तुम्हाला गाडी खरेदी करण्यासाठी 3 ते 7 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. समजा, तुमच्याकडे आधीपासूनच गाडी असल्यास दरमहिन्याला इंधन व मेंटेन्सचाठी जवळपास 10 ते 20 हजार रुपये खर्च करावा लागतील.