Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aadhar Card Changes: आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख आणि पत्ता किती वेळा बदलता येते? जाणून घ्या

Aadhar Card Changes

Image Source : www.news18.com

आधार कार्ड जारी करणारी संस्था युआयडीएआय (UIDAI) आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, जेंडर इत्यादी अपडेट करण्याची सुविधा देते. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की तुम्ही प्रत्येक माहिती पुन्हा पुन्हा अपडेट करू शकत नाही.

Name, date of birth and address be changed in Aadhaar card: अनेक वेळा आधार बनवताना अनेक माहिती चुकीची टाकली जाते किंवा ती अपूर्ण राहते. त्यामुळे नंतर आधार कार्ड वापरताना अडचणी येतात. आधार कार्डमधील सर्व माहिती अचूक आणि अपडेटेड असणे खूप आवश्यक आहे. आधार कार्ड जारी करणारी संस्था युआयडीएआय (UIDAI) आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, जेंडर इत्यादी अपडेट करण्याची सुविधा देते. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की तुम्ही प्रत्येक माहिती पुन्हा पुन्हा अपडेट करू शकत नाही. आधार कार्ड इतर कागदपत्रांपेक्षा वेगळे आहे कारण त्यात नागरिकांची बायोमेट्रिक माहिती असते. त्यामुळे तुमच्या आधारमध्येही काही माहिती चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आली असेल, तर ती त्वरित दुरुस्त करा. आणि अर्थातच, सर्व तपशील देखील बारकाईने तपासा जेणेकरून सर्व चुका एकाच वेळी सुधारता येतील.

जन्मतारीख एक वेळा बदलली जाऊ शकते

आधार कार्डमध्ये चुकीची जन्मतारीख टाकल्यास ती एकदाच अपडेट केली जाऊ शकते (Date Of Birth Update in Aadhar card). त्यानंतर त्यात बदल करण्यासाठी प्रोसेस फॉलो करावी लागेल.

जेंडर एक वेळा बदलता येईल

अनेकदा आधार कार्ड बनवताना जेंडर चुकीचे टाकले जाते. युआयडीएआय (UIDAI) च्या नियमांनुसार ते बदलले जाऊ शकते. तुम्हाला आधार कार्डमध्ये जेंडर अपडेट करण्याची फक्त एक संधी मिळते.

दोन वेळा नाव बदलू शकता

आधार कार्डमधील नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चूक असेल किंवा महिलांना लग्नानंतर आडनाव बदलायचे असेल तर त्या बदल करू शकतात. ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये नाव बदलले जाऊ शकते. तुम्ही आधार कार्डमध्ये नाव अपडेट फक्त दोनदा करू शकता.

ही माहिती कधीही बदला

घराचा पत्ता, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, फोटो, फिंगर प्रिंट आणि रेटिना स्कॅन ही माहिती आधारमध्ये अनेकवेळा अपडेट करू शकता. यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.

मर्यादेपलीकडे बदल कसे करावे?

युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला भेट देऊन आधार कार्डवरील नाव, जेंडर किंवा जन्मतारीख अपग्रेड करण्यासाठी एका विशिष्ट मर्यादेपलीकडे बदल करणे शक्य आहे. त्यासाठी खालील पायऱ्यांचा अवलंब करावा लागेल.

अपवादात्मक परिस्थितीत या पायऱ्या फॉलो करा

  • स्टेप 1: वापरकर्त्याने त्यांचे नाव, जन्मतारीख किंवा लिंग अद्यतनित करण्यासाठी आधार नोंदणी केंद्राला भेट देणे आवश्यक आहे.
  • स्टेप 2: आधार डिटेल्स अपडेट करण्याच्या संख्येपेक्षा जास्त वेळेची मर्यादा ओलांडल्यास नंतर नावनोंदणी केंद्रावर ईमेल पोस्ट किंवा युआयडीएआयच्या प्रादेशिक कार्यालयाद्वारे विनंती करणे आवश्यक आहे.
  • स्टेप 3: व्यक्तीने युआरएन स्लिपची संलग्न प्रत, आधार तपशील आणि संबंधित पुराव्यासह बदलांसाठी अशा विनंतीचे कारण देणे आवश्यक आहे.
  • स्टेप 4: help@uidai.gov.in वर ईमेल टाकावा लागेल.
  • स्टेप 5: एखाद्या व्यक्तीला जोपर्यंत सांगितले जात नाही तोपर्यंत युआयडीएआय कार्यालयाला भेट द्यावी लागत नाही.
  • स्टेप 6: प्रादेशिक कार्यालय त्यांच्याकडून विशिष्ट व्यक्तीबद्दल अतिरिक्त माहिती मिळविण्यासाठी तपासणी करेल.
  • स्टेप 7: प्रादेशिक कार्यालयाकडून पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, विनंतीवर प्रक्रिया आणि पुनर्प्रक्रिया करण्यासाठी विनंती पाठवली जाईल.

बदल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट
  • बँक स्टेटमेंट
  • पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट/पासबुक
  • रेशन कार्ड 
  • मतदार ओळखपत्र
  • ड्रायव्हिंग लायसन्स 
  • सरकारी फोटो आयडी
  • पीएसयू द्वारे जारी केलेले सर्व्हिस फोटो आयडी
  • 3 महिन्यांच्या कालावधीचं वीज बिल
  • 3 महिन्यांच्या कालावधीचं पाणी बिल
  • टेलिफोन लँडलाइन बिल 3 महिन्यांचं
  • मालमत्ता कराची पावती 12 महिन्यांपेक्षा जास्त नाही

Source: https://bit.ly/3J4eiuV  

https://bit.ly/3T0dn3c