Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Box Office Collection: चित्रपटाची एकूण कमाई नक्की कशी मोजतात? फ्लॉप की हिट कोण ठरवते? जाणून घ्या

Movie Box Office Collection

Image Source : https://www.businesstoday.in/

काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला शाहरुख खानचा जवान चित्रपटाच बॉक्स ऑफिसवर दररोज कमाईचे नवीन विक्रम करत आहे. चित्रपटाची ही कमाई नक्की कशी मोजली जाते, तुम्हाला माहितीये का? याबाबत जाणून घ्या.

गेल्याकाही दिवसात शाहरुख खानच्या जवान चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात हा चित्रपट कमाईचे नवनवीन रेकॉर्ड करताना दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर तब्बल 1100 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा गल्ला जमवला आहे. याआधी आलेल्या शाहरूखच्या पठाण चित्रपटाने देखील विक्रमी कमाई केली होती.

मात्र, चित्रपटाने नक्की किती कमाई केली हे कसे ठरते, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? चित्रपट हिट झाला की फ्लॉप हे आकडेवारीवरून ठरवले जाते. मात्र, हे आकडे नेमके येतात कुठून हे जाणून घेऊयात. 

सर्वाधिक कमाई करणारे टॉप-10 चित्रपट

क्रमांक

चित्रपट

जगभरातील कमाई ( कोटी रुपये)

1  

दंगल (2016)  

2070.3  

2  

बाहुबली 2 द कॉन्क्लूजन(2017)  

1788.06  

3  

आरआरआर (2022)  

1230  

4  

केजीएफ चॅप्टर 2 (2022)  

1215  

5  

पठाण (2023)  

1055  

6  

जवान (2023)  

1055  

7  

बंजरंगी भाईजान (2015)  

922.03  

8  

सिक्रेट सुपरस्टार (2017)  

912.75  

9  

पीके (2014)  

792  

10  

2.0 (2018)  

744.78  

सोर्स - Sacnilk.com  

कशी मोजली जाते चित्रपटाची कमाई?

चित्रपटचा आशय कितीही चांगला असला तरीही त्याचे यश हे बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून ठरत असते. चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला की फ्लॉप हे आकडेवारीवरून ठरवले जाते. त्यामुळे कोणत्याही चित्रपटासाठी नंबर गेम महत्त्वाचा असतो. 

चित्रपटाची आकडेवारी कशी ठरते, त्याआधी चित्रपट थिएटरपर्यंत कसा पोहचतो व यात कोण सहभागी असते हे जाणून घेणे गरजेचे आहे. या प्रोसेसमध्ये प्रामुख्याने प्रोड्यूसर, डिस्ट्रीब्यूटर आणि आणि थिएटर मालकांचा समावेश असतो. 

प्रोड्यूसर हा चित्रपटाचा सर्व खर्च स्वतः उचलत असतो. म्हणजेच चित्रपटाच्या निर्मितीपासून ते अभिनेत्याच्या फीपर्यंत सर्व काही खर्च हा प्रोड्यूसरच्या खिश्यातून होतो. एकदा चित्रपटाची निर्मिती झाली की थिएटरपर्यंत पोहचवण्याचे काम हे डिस्ट्रीब्यूटर करत असतात. थोडक्यात प्रोड्यूसर आणि थिएटर मालकाच्यामधे मध्यस्थ म्हणून ड्रिस्ट्रीब्यूटरची भूमिका असते. 

शेवटी थिएटर मालकांची भूमिका येते. डिस्ट्रीब्यूटर आणि थिएटर मालकांमध्ये एकप्रकारचा करार झालेला असतो. कराराच्या आधारावर डिस्ट्रीब्यूटरला थिएटर एकप्रकारे भाड्याने दिले जाते. 

एकदा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर एकूण कमाईची आकडेवारी मोजली जाते. ही आकडेवारी डिस्ट्रीब्यूटरद्वारे डेली कलेक्शन रिपोर्ट नावाने जारी केली जाते. प्रत्येक क्षेत्रानुसार चित्रपटाने दररोज किती कमाई केली जाते, याची माहिती या रिपोर्टमध्ये असते. डिस्ट्रीब्यूटरद्वारे जारी करण्यात आलेली हीच आकडेवारी अधिकृत समजून जाहीर केली जाते.

मात्र, या एकूण कमाईमध्ये प्रोड्यूसर, डिस्ट्रीब्यूटर आणि आणि थिएटर मालकांची वेगवेगळी हिस्सेदारी देखील असते. तसेच, सरकारद्वारे मनोरंजन कर देखील आकारला जातो. एकूण कमाईतून कर वजा केल्यानंतर एकूण नेट कलेक्शनची आकडेवारी समोर येते. चित्रपटाने आठवड्याला केलेल्या कमाईच्या आधारावर प्रोड्यूसर, डिस्ट्रीब्यूटर आणि आणि थिएटर हिस्सेदारी ठरते. यातील प्रत्येकाचा वाटा हा 25 टक्क्यांपासून ते 50 टक्क्यांपर्यंत असतो. डिस्ट्रीब्यूटरची बॉक्स ऑफिससोबतच म्यूझिक राइट्स, सेटेलाइट्स राइट्समधून देखील कमाई होते. 

बॉक्स ऑफिस कलेक्शन जाहीर करणे उत्तम मार्केटिंग स्ट्रॅटजी 

एखाद्या चित्रपटाने किती कमाई केली हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे असते. अनेकदा चित्रपट रिलीज होण्याआधीच किती कमाई करू शकतो, याचे अंदाज देखील बांधले जातात. मात्र, हा सर्व मार्केटिंग स्ट्रॅटजीचा भाग असतो. सध्या अनेक चित्रपट वादात अडकतात. अनेक चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची देखील मागणी केली जाते. अशात आकडेवारीमुळे प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी आकर्षित केले जाते. जास्त कमाई याचा अर्थ चांगला चित्रपट असा आपल्याकडे समज आहे. आकडेवारीमुळे चित्रपट सतत चर्चेत तर राहतोच व बॉक्स ऑफिसवर अजून कमाई देखील करतो.