Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Quick Heal: कॅलक्यूलेटर दुरुस्तीपासून ते कोट्यावधींची आयटी सिक्योरिटी कंपनी उभारणाऱ्या मराठी उद्योजकाचा प्रवास

Quick Heal

Image Source : https://en.wikipedia.org/wiki/Quick_Heal#/media/File:Quick-Heal-Logo.png

छोट्याशा दुरुस्तीच्या दुकानापासून ते भारतातील सर्वात मोठी सायबर सिक्योरिटी कंपनी उभारण्यापर्यंतचा कैलास काटकर यांचा प्रवास विलक्षण आहे. Quick Heal ने 2016 साली आयपीओ देखील आणला होता.

कैलास काटकर. हे नाव वाचल्यावर कदाचित या मराठी उद्योगपतीची अनेकांना ओळख पटणार नाही. पण कैलास काटकर हे जवळपास 2 हजार कोटी रुपये बाजार मुल्य असलेल्या कंपनीचे संस्थापक आहे. ही कंपनी आहे क्विक हील टेक्नोलॉजी. 

आज बहुतांशजण कॉम्प्युटरमध्ये सुरक्षेसाठी क्विक अँटी व्हायरसचा वापर केला जातो. एका मराठी माणसाने एवढी मोठी सायबर सिक्योरिटी पुरवणारी कंपनी उभारली हे खूप कमी जणांना माहितीये. छोट्याशा दुरुस्तीच्या दुकानापासून ते भारतातील सर्वात मोठी सायबर सिक्योरिटी कंपनी उभारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास विलक्षण आहे.

400 रुपयात केली कामाला सुरुवात

कैलास यांचा जन्म 1966. मुळचे साताऱ्याचे असलेले कैलास यांचे कर्मभूमी मात्र पुणे आहे. त्यांचे वडील फिलिप्स इंडियामध्ये मशीन सेटर होते, तर आई गृहिणी. त्यांनी दहावीनंतर शाळा अर्ध्यातूनच सोडली. पुढे 1985 ला रिपेअरिंग शॉपमध्ये कामाला सुरुवात केली. येथे कॅलक्युलेटर, रेडिओ दुरुस्त करण्याच्या कामाचे त्यांना 400 रुपये मिळत असे.

पुढे पैसे जमवून त्यांने स्वतःचा दुरुस्तीचे दुकान सुरू केले. या कामातून पैसे जमा करून स्वतःचा कॉम्प्युटर देखील खरेदी केला. या कॉम्प्युटरचा वापर ते बिलिंगसाठी करायचे. त्यानंतर 1993 साली CAT कॉम्प्युटर सर्व्हिसेज कंपनी स्थापन करून कॉम्प्युटर मेंटनेसचे काम करू लागले. कॉम्प्युटर दुरुस्तीचे काम करतानाच त्यांना अँटी व्हायरस प्रोग्रामची कल्पना सुचली. 

1995 ला कंपनीची सुरुवात

कैलास यांनी त्यांचा भाऊ संजयसोबत मिळून अँटी-व्हायरस प्रोग्रामवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली. यातूनच त्यांनी क्विक हिल हे DOS अँटी व्हायरसचे पहिले प्रोडक्ट लाँच केले. या प्रोडक्टचे ते 700 रुपयात विक्री करत असे. मात्र, सुरुवातीच्या वर्षात कंपनीचे कार्यक्षेत्र पुण्यापुरतेच मर्यादित होते. 

ग्राहक प्रोडक्टमध्ये रस दाखवत नसल्यास 1999 मध्ये व्यवसाय देखील बंद करावा लागला. मात्र, कैलास यांनी हार मानली नाही. 2002 साली पुन्हा नव्या जोमाने ते या व्यवसायात उतरले. यावेळी पुण्याचे बाहेर देखील हाय पाय पसरले व हार्डवेअर वेंडर्सच्या माध्यमातून आपले प्रोडक्ट ग्राहकांपर्यंत पोहचवण्यास सुरुवात केली. पुढे 2007 साली कंपनीचे नाव बदलून Quick Heal Technologies Pvt. Ltd. करण्यात आले. 

2016 साली आणला आयपीओ

कंपनीच्या प्रोडक्ट्सला ग्राहकांची पसंती मिळत असल्याने गुंतवणूकदार देखील यात मोठी गुंतवणूक करत होते. अखेर 2016 साली क्विक हिलने शेअर बाजारात आयपीओ आणला. नोव्हेंबर 2023 पर्यंत कंपनीचे बाजार मुल्य हे 1800 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. 

चांद्रयान-3 मोहिमेत महत्त्वाची भूमिका

तुमच्या स्मार्टफोनपासून ते चांद्रयान-3 पर्यंत... सायबर सिक्योरिटीच्याबाबतीत क्विक हीलने स्वतःची छाप उमटवली आहे. कंपनी इस्त्रोसाठी देखील काम करते. क्विक हील आणि SEQRITE हे सायबर सिक्योरिटी पार्टनर आहे. चांद्रयान-3 मोहिमेत कंपनीने सायबर सिक्योरिटीबाबत महत्त्वाची भूमिका बजावली.

आज याच कंपनीचे अँटी व्हायरस सॉफ्टवेअर प्रत्येकाच्या कॉम्प्युटरमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे कैलास आणि क्विक हीलला भारताचे अँटी-व्हायरस किंग म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.