भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींबद्दल बोलायचे झाले तर एकच नाव तोंडावर येते आणि ते म्हणजे मुकेश अंबानी यांचे. मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक (Mukesh Ambani) आहेत, ज्यांच्या संपत्तीचा अंदाज लावणे फार कठीण आहे. मुकेश अंबानी हे अतिशय लग्जरी लाईफ जगतात हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले व एक मुलगी, सून, नातू असा परिवार आहे. (Mukesh Ambani Family)
अंबानी यांचे संपूर्ण कुटुंब अतिशय लग्जरी लाईफ (Ambani’s Lifestyle) जगतं. अँटिलिया नावाच्या भारतातील सर्वात महागड्या घरात अंबानी राहतात. या घरात 600 कर्मचारी काम करतात असे सांगण्यात येते. अंबानी कुटुंब स्वतःवर खूप खर्च करते. पण तुम्ही कधी विचार केला आहे की त्यांच्या घरी पाहुणे आले तर त्यांच्यावर किती खर्च होतो? आज आपण अंबानी कुटुंबिय पाहुण्यांचे स्वागत कसे करतात? ते जाणून घेऊया.
पाहुण्यांना देतात हे पाणी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी यांच्या घरी जेव्हाही पाहुणे येतात तेव्हा त्यांचे राजासारखे स्वागत केले जाते. सर्वप्रथम पाहुण्याला Acqua di Cristallo Tributo a Modigliani ची पाण्याची बाटली दिली जाते. या पाण्याच्या बाटलीची किंमत हजारात नाही तर लाखात आहे. या पाण्याच्या 750 मिली बाटलीची किंमत भारतीय रुपयात 44 लाख रुपये आहे.
विशेष भांड्यातून चहा दिला जातो
पाण्याची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, परदेशातून आयात केलेल्या नोरिटेक भांड्यांमध्ये पाहुण्यांना चहा दिला जातो. या भांड्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे. चहा नाश्त्याची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर पाहुण्यांना त्यांचे आवडते शाही जेवण दिले जाते. मुकेश अंबानींच्या घरी अनेक शेफ काम करतात जे एकापेक्षा जास्त पदार्थ बनवतात. अंबानी आपल्या पाहुण्यांवर किती खर्च करतात? हे सांगता येत नाही. पण यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की अंबानींच्या घरी पाहुणे गेल्यावर किती खर्च होत असेल ते.
Become the first to comment