Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Basic Savings BDS Account: सामान्य खात्यापेक्षा किती वेगळं आहे एसबीआयचं 'हे' अकाउंट? काय वैशिष्ट्य?

SBI Basic Savings BDS Account: सामान्य खात्यापेक्षा किती वेगळं आहे एसबीआयचं 'हे' अकाउंट? काय वैशिष्ट्य?

SBI Basic Savings BDS Account: कोणत्याही बँकेत तुमचं बचत खातं असेल तर त्याचे नियमही तुम्हाला ठाऊक असतीलच. अशा खात्यांमध्ये तुम्हाला किमान शिल्लक रक्कम राखणं गरजेचं असतं. तसं न झाल्यास बँक तुम्हाला दंड आकारते. मात्र आम्ही आता तुम्हाला ज्या अकाउंटविषयी माहिती देणार आहोत, ते जरा वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण अकाउंट आहे.

एसबीआयचं हे वैशिष्ट्यपूर्ण अकाउंट आहे बेसिक सेव्हिंग बँक स्मॉल डिपॉझिट खातं (Basic Savings Bank Deposit Small Account). हे खातं सामान्य बचत खात्यापेक्षा वेगळं आहे. बचत खात्यातल्या (Saving account) किमान रकमेबाबत सर्व बँकांचे स्वतःचे वेगवेगळे असे नियम आहेत. मात्र एसबीआयच्या बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट स्मॉल अकाउंटमध्ये अशी किमान शिल्लक ठेवण्याची सक्ती नाही. म्हणजेच तुम्हाला गरज असेल त्यावेळी तुम्ही बँकेतून सर्व पैसे काढू शकता. त्या बदल्यात बँक तुमच्याकडून कोणताही दंड आकारणार नाही. या वैशिष्ट्यामुळेच या खात्याला शून्य शिल्लक खातं देखील म्हणतात.

कोण उघडू शकतं खातं?

एसबीआयची मूलभूत बचत बँक ठेव खाते सुविधा सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती हे खातं उघडू शकतं. त्यासाठी संबंधित व्यक्तीकडे वैध केवायसी (KYC) कागदपत्रे असणं गरजेचं असतं. हे खातं खास समाजातल्या गरीब वर्गासाठी आहे. या माध्यमातून त्यांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकेल, असा यामागचा उद्देश आहे. खातं उघडतानाही पैसे जमा करणं यात बंधनकारक नाही.

खात्याची वैशिष्ट्ये काय?

  • ज्या प्रकारे तुम्ही संयुक्त खाते म्हणून सामान्य बचत खातं उघडता, त्याचप्रमाणं तुम्हाला ही सुविधा एसबीआयच्या बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट खात्यात दिली जाते.
  • यामध्ये खातेदाराला बँक पासबुक, बेसिक रुपे एटीएम-कम-डेबिट कार्ड, मोबाइल आणि इंटरनेट बँकिंगची सुविधाही दिली जाते. मोफत चेकबुक मात्र यात दिलं जात नाही.
  • शून्य शिल्लक खातं उघडल्यानंतर, तुम्ही सामान्य बचत खात्याप्रमाणे आधार कार्डच्या मदतीनं पैसे काढू शकता. तसंच ट्रान्सफरदेखील करू शकता. याशिवाय यूपीआय अ‍ॅपच्या मदतीनं पैसे काढण्याची किंवा हस्तांतरित करण्याची सुविधाही यात मिळते. 
  • यामध्ये एनईएफटी, आरटीजीएस (NEFT/RTGS) यासारख्या इलेक्ट्रॉनिक चॅनेलद्वारे रोख व्यवहारांवर कोणतंही शुल्क भरावं लागत नाही. तसंच जर तुम्ही बंद खातं सुरू केले तर त्यासाठी कोणतंही शुल्क भरण्याची गरज असणार नाही. तुम्ही तुमचं शून्य शिल्लक खातं बंद केलं तर त्यासाठीदेखील कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही.

काय आहेत अटी?

  • जर एखाद्या ग्राहकाकडे बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट खातं असेल, तर तो इतर कोणतंही बचत बँक खातं ठेवू शकत नाही. याशिवाय, जर एखाद्या ग्राहकाचं आधीच बचत बँक खाते असेल तर मूलभूत बचत बँक खातं उघडल्यापासून 30 दिवसांच्या आत जुनं खातं बंद करावं लागणार आहे.
  • शून्य शिल्लक खातेधारक कोणत्याही एका आर्थिक वर्षात एकूण फक्त 1 लाख रुपये जमा करू शकतात. जर त्यांनी या रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा केली, तर त्यांना संपूर्ण केवायसी कागदपत्रे जमा करून हे खातं सामान्य बचत खात्यात रूपांतरित करावं लागणार आहे. 
  • शून्य-शिल्लक खात्यात तुमच्या मासिक व्यवहार क्रमांकाची मर्यादा आहे. दिलेल्या परवानगीच्या संख्येपेक्षा तुम्ही जर का जास्त पैसे काढले, तर बँक तुमचं शून्य-शिल्लक खातं नियमित बचत खात्यात रूपांतरित करते.
  • शून्य शिल्लक खात्यामध्ये, तुम्हाला नियमित बचत खात्याप्रमाणं मुदत ठेव (FD), आरडीमध्ये (RD) गुंतवणूक सुरू करण्याचे पर्याय मिळत नाहीत. डीमॅट खातं उघडण्याचा पर्यायही यात देण्यात आलेला नाही.