Petrol-Diesel Price: भारतीय तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील तेला किमती लक्षात घेऊन दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दर जाहीर करत असतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, इंट्री टॅक्स आणि प्रत्येक राज्यातील वेगवेगळा टॅक्स त्यात जमा करून त्याचा दर ठरवला जातो. या पद्धतीमुळेच प्रत्येक राज्यात किंवा शहरात पेट्रोल-डिझेलचे वेगवेगळे दर पाहायला मिळतात.
भारतात पेट्रोल-डिझेलचे किरकोळ दर कसे ठरतात?
पेट्रोल आणि डिझेलचे दर भारतातील ऑईल मार्केटिंग कंपन्या (Oil Marketing Company-OMC) ठरवतात. जागतिक तेल बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर आधारित भारतातील तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचे निरीक्षण करून त्यानुसार दर ठरवत असतात. केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर टॅक्स आकरतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सरकार ठरवत नाही. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या पब्लिक सेक्टरमधील कंपन्या तेल मार्केटिंग कंपन्या आहेत.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे का असतात?
पेट्रोल आणि डिझेल हे गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे जीएसटीच्या कक्षेत येत नाही. पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारच्यावतीने एक्साईड ड्युटी आणि राज्य सरकारकडून व्हॅट (VAT) आकारला जातो. प्रत्येक राज्याचा व्हॅटचा दर वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये तफावत दिसून येते.
भारतात डिझेलच्या किमतीपेक्षा पेट्रोलची किंमत का वेगळी आहे?
इतर देशांप्रमाणे भारतातही डिझेलची किंमत पेट्रोलच्या किमतीपेक्षा कमी आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांचे टॅक्स स्ट्रक्चर वेगवेगळे असल्यामुळे भारतात नेहमी डिझेलच्या किमतीपेक्षा पेट्रोलच्या किमती जास्त असतात. डिझेलचा उपयोग शेतकऱ्यांव्यतिरिक्त ट्रक आणि बसचालक अधिक करतात.