Housing sales in Top Cites: पुणे-मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये घर खरेदी सरासरी 22 टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षाच्या आकडेवारीशी तुलना करता या वर्षी रिअल इस्टेट क्षेत्र तेजीत आहे. गृहखरेदीबाबतची जानेवारी-मार्च तिमाहीतील आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार पुणे, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद शहरात गृहखरेदी वाढली आहे. तर दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता शहरात नव्या प्रकल्पांची संख्या वाढली मात्र, खरेदी थंडावलेली आहे. दरम्यान, पुणे आणि मुंबई शहरात गृहखरेदी अनुक्रमे 39 आणि 16% वाढली आहे.
PropTiger.com या कंपनीने देशातील प्रमुख आठ शहरांतील गृहखरेदीचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात जानेवारी-मार्च महिन्यातील गृहविक्रीच्या आकडेवारीचा समावेश करण्यात आला आहे. मागील वर्षातील जानेवारी-मार्च आकडेवारीशी ताज्या आकडेवारीची तुलना करण्यात आली आहे.
रेपो रेटला ब्रेक दिल्याने आणखी वाढीची अपेक्षा (Housing sales in top Indian cities)
रिझर्व्ह बँकेने मागील वर्षापासून सहावेळा रेपो रेट वाढवला असला तरी ग्राहकांनी अस्थिर परिस्थितीत घर खरेदीलाच पसंती दिली आहे. काल (गुरुवार) झालेल्या पतधोरण बैठकीत दरवाढीला ब्रेक लावल्याने रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांचा भाव वधारला आहे. व्याजदर वाढ थांबवल्याने आता नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत रिअल इस्टेट क्षेत्र चांगली वाढ नोंदवले असे दिसत आहे. दरम्यान, वर उल्लेख केलेल्या आठ शहरात नव्या गृहप्रकल्पांची निर्मिती 86 टक्क्यांनी वाढली आहे. घरांची मागणी वाढल्याने विकासकांनी मोठ्या प्रमाणात नवे प्रकल्प ग्राहकांसाठी आणले आहेत.
नव्या गृह प्रकल्पांची संख्या वाढली (New housing project launch)
गृहकर्जाचे दर वाढत असतानाही नागरिकांनी घर विकत घेण्यास पसंती दर्शवली आहे. भांडवली बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याने तसेच जागतिक मंदीचे संकटही समोर असताना रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीला सुरक्षित समजले जात आहे. मागणी वाढत असल्याने जानेवारी ते मार्चमध्ये नवीन गृहप्रकल्पांची संख्याही वाढली आहे. जानेवारी-मार्च 2022 मध्ये या प्रमुख आठ शहरांमध्ये 70,630 घरे विकली होती. हा आकडा चालू वर्षी (जानेवारी-मार्च 2023) मध्ये 85,850 हजारांवर पोहचला.
गृहखरेदी वाढलेली शहरे
हैदराबाद 55%
मुंबई 39%
पुणे 16%
अहमदाबाद 31%
व्याजदर वाढलेले असतानाही विक्री तेजीत (Real estate sales growth)
प्रमुख आठ शहरात नुकत्याच संपलेल्या तिमाहीत 147 लाख 780 घरे नव्याने लाँच झाली. ही आकडेवारी मागील वर्षी 79,530 एवढी होती. "घरांची विक्री आणि नवे प्रकल्प दोन्हींची वाढ चांगली आहे. बँकांकडून व्याजदर वाढ होत असतानाही रिअल इस्टेट क्षेत्रातील तेजी नोंद घेण्यासारखी आहे. जागतिक परिस्थितीही आव्हानात्मक आहे. 2023 च्या पहिल्या तीन महिन्यातील आकडेवारी चांगली प्रगती दाखवत आहे, असे PropTiger.com चे विकास वाधवान यांनी म्हटले.