2022 मधील जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत देशातील 8 मुख्य शहरांत घराच्या किंमतीत 5% ने वाढ झाली आहे. सप्टेंबर 2021च्या डिसेंबर महिन्यात जी रक्कम 6,300-6,500 रुपये प्रति वर्ग फूट इतकी होती. या वर्षीच्या आकडेवारीनुसार 8 शहरामध्ये हीच किंमत 6,600-6,800 इतकी झाली आहे.
प्रायमरी हाउसिंग मार्केट क्षेत्रातील किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. सिमेंट आणि अन्य मुख्य कच्च्या मालाची किंमत वाढल्यामुळे घरांची किंमत वाढली आहे. मोठ्या इमारतींचे बांधकाम करतांना लागणाऱ्या साहित्याची किंमत वाढल्यामुळे घरांच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये घरांची रक्कम किती आहे?
शहर | किती % ने वाढली | 2022 |
अहमदाबाद | 5 % | 3,600-3,800रुपये प्रति वर्ग फूट |
बंगलोर | 6 % | 5,900-6,100 रुपये प्रति वर्ग फूट |
चेन्नई | 2 % | 5,500-5,700 रुपये प्रति वर्ग फूट |
दिल्ली | 5 % | 4,700-4,900 रुपये प्रति वर्ग फूट |
हैद्राबाद | 4 % | 6,100-6,300 रुपये प्रति वर्ग फूट |
कलकत्ता | 3 % | 4,400-4,600 रुपये प्रति वर्ग फूट |
मुंबई | 3 % | 9,900-10,100 रुपये प्रति वर्ग फूट |
पुणे | 7 % | 5,500-5,700 रुपये प्रति वर्ग फूट |
येणाऱ्या काळात घरांच्या किमतीत होणार अजून वाढ?
प्रायमरी हाऊसिंग मार्केट क्षेत्रातील रक्कमेत साधारण वाढ झाली आहे. मे महिन्यानंतर कर्जाच्या व्याजदरात 2 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे घरांची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेने यावर्षी घरांच्या सामग्रीची किंमत जास्त झाल्यामुळे घरांची रक्कम अधिक प्रमाणात वाढत आहे.