Honda e-scooter: होंडा ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची दुचाकी निर्मिती कंपनी आहे. होंडा अॅक्टिवा आणि शाईन या गाड्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी असते. होंडा कंपनीची पहिली इलेक्ट्रिक गाडी पुढील वर्षी मार्चपर्यंत लाँच केली जाईल, असे कंपनीचे एमडी आणि सीइओ(MD and CEO) अतसुशी अगोटा यांनी म्हटले आहे. होंडा अॅक्टिवा एचस्मार्ट गाडी लाँच करताना त्यांनी इलेक्ट्रिक गाडी बनवणार असल्याची माहिती दिली. इलेक्ट्रिक दुचाकी निर्मितीमध्ये कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली असून अनेक इलेक्ट्रिक स्कूटी भारतीय रस्त्यांवर दिसू लागल्या आहेत. या स्पर्धेत आता होंडा उतरणार आहे.
दुचाकी विक्रीमध्ये सुधारणा( Two-Wheller sale increasing in India)
कोरोना काळात भारतामध्ये दुचाकी विक्री कमी झाली होती. मात्र, आता दुचाकी विक्री पुन्हा वाढत असल्याचेही ओगाटा यांनी म्हटले. पुढील वर्षी दुचाकींची उच्चांकी विक्री होईल, अशी आशा अगोटा यांनी व्यक्त केली. होंडा कंपनीच्या एक तृतीयांश दुचाकींची विक्री ग्रामीण भागामध्ये होते. 2019 साली भारतामध्ये एकूण 2 कोटींपेक्षा जास्त दुचाकींची विक्री झाली होती. मात्र, त्यानंतर मागणी रोडावली होती.
कच्च्या माल आणि निर्मिती खर्च वाढल्याने गाड्यांच्या किंमतीही वाढल्या आहेत. तसेच पेट्रोल डिझेलचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे दुचाकींची विक्री कमी झाली आहे. अनेक दुचाकी निर्मिती कंपन्या इ स्कूटर निर्मितीच्या मागे लागले आहेत. ग्राहकांकडूनही इलेक्ट्रिक स्कूटींना पसंती मिळत आहे.
www.bikesrepublic.com
अॅक्टिव्हा स्कूटीचा बाजारातील हिस्सा 56% आहे. अॅक्टिवाची आणखी विक्री वाढण्यासाठी कंपनी एंट्री लेवल मॉडेलही पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आणणार आहे. तसेच पुढील वर्षी मार्चपर्यंत इलेक्ट्रिक अॅक्टिवा स्कूटी आणि इतर मॉडेल्स भारतीय बाजारात लाँच करण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक दुचाकी निर्मितीचे आम्ही दीर्घकालीन नियोजन करत असल्याचेही अगोटा म्हणाले.
अॅक्टिवा इलेक्ट्रिक मॉडेल (Activa new E model)
भारतीय नागरिकांच्या गरजा पाहून इ स्कूटर बाजारात आणली जाईल. ही इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या नव्या तंत्रज्ञानावर आधारित असेल. अॅक्टिव्हा स्कूटीमध्ये सध्या जे पेट्रोल डिझेल कंम्बशन इंजिन वापरले जाते त्याचे रुपांतर इ स्कूटरमध्ये केले जाणार नाही. त्यासाठी वेगळे तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल, असे अगोटा म्हणाले. सुरुवातीला जे मॉडेल आणले जाईल त्याला फिक्स बॅटरी असेल मात्र, त्यानंतरच्या मॉडेल्समध्ये बॅटरी बदला येण्याची सुविधा देण्यात येईल, असेही ते म्हणाले.