Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Honda कंपनीची 'ही' नवीन Scooter भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि नवीन फीचर्स

Honda Dio Scooter

Image Source : www.autofun.ph

Honda Dio Scooter : Honda Motorcycle and Scooter ने भारतात आपले स्कूटर मॉडेल Honda Dio Scooter 2023 लॉन्च केले आहे. कंपनीच्या या मॉडेलची बऱ्याच दिवसांपासून ग्राहक वाट बघत होते. या मॉडेलची किंमत जवळपास 70211 रुपये आहे. या नवीन मॉडेलसह कंपनीने आपल्या ग्राहकांना होंडा स्मार्ट की सिस्टम दिली आहे.

Honda Motorcycle and Scooter ने भारतात आपले स्कूटर मॉडेल Honda Dio Scooter  2023 लॉन्च केले आहे. कंपनीच्या या मॉडेलची बऱ्याच दिवसांपासून ग्राहक वाट बघत होते. या मॉडेलची किंमत जवळपास 70211 रुपये आहे. या नवीन मॉडेलसह कंपनीने आपल्या ग्राहकांना होंडा स्मार्ट की सिस्टम दिली आहे. कंपनीच्या या मॉडेलचे इंजिन आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Honda Dio नवनवीन फीचर्स 

सर्वात आधी Honda Dio चे कलर ऑप्शन बद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने होंडा डिओचे स्टँडर्ड मॉडेल मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, जॅझी ब्लू मेटॅलिक आणि स्पोर्ट्स रेड सारखे कलर दिले आहेत. डिलक्स प्रकारामध्ये, कंपनीने मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, मॅट संगरिया रेड मेटॅलिक आणि डॅझल यलो मेटॅलिक उपलब्ध करून दिले आहेत. स्मार्ट व्हेरियंटसाठी, मॅट डार्क ब्लू मेटॅलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक आणि मॅट संगरिया रेड मेटॅलिक सारखे कलर ऑप्शन ग्राहकांसमोर ठेवण्यात आले आहेत.

इंजिन आणि लॉक मोड फीचर्स

Honda Dioच्या  इंजिन क्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास, यात 110cc PGM-FI eSP इंजिन देण्यात आले आहे. इंजिन देखील ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसह जोडलेले आहे. इंजिनमध्ये 9.03Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. इंधन क्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास, ते सुमारे 18 लिटर स्टोरेज स्पेस देते. याशिवाय Fuel साठी डबल लिड ओपन सिस्टिम देण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे या नवीन प्रकारात कंपनीने लॉक मोड दिला आहे, जो फाइव्ह इन वन फंक्शन म्हणून काम करतो. फाईव्ह इन वन फंक्शन्समध्ये सीट ओपन, इग्निशन ऑन, इग्निशन ऑफ, लॉक हँडल, फ्युएल लिड ओपन यांचा समावेश होतो. या सर्वांशिवाय, या मॉडेलमध्ये एलईडी पोझिशन लॅम्प, नवीन डिओ लोगो, अलॉय व्हील, फ्रंट रिब्स, स्प्लिट ग्रॅब रेल, टेल लॅम्प, कॉम्बी ब्रेक सिस्टम, 3 स्टेप अॅडजस्टेबल रिअर सस्पेंशन, कंपनीकडून इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच अशा अनेक सुविधा दिलेल्या आहेत.

होंडाच्या या स्कूटरची किंमत किती असणार?

होंडा डिओ तीन मॉडेल्ससह लॉन्च करण्यात आली आहे. ते तीन मॉडेल्स स्टँडर्ड, डिलक्स आणि स्मार्ट आहे. या तिघांची किंमत वेगवेगळी आहे. स्टँडर्ड मॉडेलची किंमत 70,221 रुपये, डीलक्स मॉडेलची किंमत 74,212 रुपये आणि स्मार्ट मॉडेलची किंमत 77,712 रुपये आहे. याशिवाय 10 वर्षांचे वॉरंटी पॅकेजही देण्यात आले आहे.

source : hindi.economictimes.com