Homebuyer's Guide Pune: आयटी हब आणि ऑटो क्लस्टर असलेले पुणे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. मागील काही वर्षांपासून पुणे शहराचा विस्तार चहूबाजूंनी वाढत आहे. परराज्यातील नागरिकांचाही ओढा पुणे शहराकडे आहे. सोबतच इतर जिल्ह्यातील नागरिक पुणे शहरात येण्याचे प्रमाण वाढत आहे. सहाजिकच पायाभूत सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. घरांची मागणी वाढत असून कोरोनानंतर सदनिकांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पाहूया पुणे शहरातील रिअल इस्टेट क्षेत्राची सद्यस्थिती काय आहे?
या लेखात मागील सहा महिन्यात पुण्यातील स्थावर मालमत्तेची स्थिती कशी राहिली ते पाहूया.
मागील सहा महिन्यात पुणे शहरात सुमारे 47,735 युनिट्स म्हणजेच घरांची विक्री झाली. या एकूण व्यवहारांची किंमत 23,540 कोटी इतकी होती. सध्या पुणे शहरातील नव्या आणि जुन्या मालमत्तेचा सरासरी दर 8,812 स्केअर फूट इतका आहे. मागील सहा महिन्यात प्रति स्केअर फूट दर सरासरी 43 रुपयांनी वाढला आहे.
घर घेण्यासाठी सर्वात जास्त पसंतीची ठिकाणे कोणती?
आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरात सध्या 100 गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. यातील 3,070 युनिट्सची मागील सहा महिन्यात विक्री झाली. हिंजवडी भागात जागेचा सरासरी भाव 9,611 स्केअर फूट इतका आहे. हे दर 98 रुपयांनी सहा महिन्यात वाढले आहेत.
रावेत भागात प्रति स्केअर फूट सरासरी दर 7,990 रुपये असून मागील सहा महिन्यात 182 रुपये प्रति स्केअर फूट भाव वाढला आहे. रावेत भागात 178 प्रकल्प सुरू आहेत.
ठिकाण | प्रकल्प संख्या | दर प्रति स्केअर फूट (सरासरी) |
हिंजेवाडी | 100 | 9611 |
रावेत | 178 | 7,990 |
ताथवडे | 76 | 9,257 |
वाकड | 221 | 10,381 |
वाघोली | 143 | 8,562 |
मोशी | 157 | 7,117 |
पुणावळे | 59 | 8,139 |
चऱ्होली बु. | 76 | 7,444 |
चिखली | 147 | 6,861 |
मांजरी खुर्द | 9 | 10,642 |
सोर्स - www.squareyards.com
नवी मुंबई-पुणे महामार्गामुळे वाकड परिसराची डिमांड मागील काही वर्षांपासून वाढली आहे. सध्या वाकड भागात 221 प्रकल्प सुरू आहेत. वाकड भागात प्रति स्केअर फूट दर 10,381 रुपये इतका आहे. मागील सहा महिन्यात हे दर सुमारे 400 रुपयांनी वाढले आहेत. वाघोली भागात 143 प्रकल्प सुरू असून साडेआठ हजार रुपये प्रति स्केअर फूट दर आहेत. मोशी भागात सध्या सुमारे 7,117 रुपये प्रति स्के.फूट जागेचा भाव आहे. पुणावळे, चऱ्होली बुद्रुक, चिखली मांजरी खुर्द या भागातही घरांची मागणी सर्वाधिक आहे. वर उल्लेख केलेल्या भागांमध्ये घरांची सर्वाधिक विक्री झाली आहे.
सर्वात जास्त दर असणारी ठिकाणे कोणती?
हिंजवडी, वाकड, ताथवडे, रावेत, बाणेर, वाघोली, पुणावळे, मुंढवा, बावधन आणि मोशी या ठिकाणी ग्राहक घर घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्यास तयार आहेत. सोबतच कोहिनूर ग्रूप, कुमार प्रॉपर्टीज,अशदीन डेव्हलपर्स, Magnetite Developers, गोयल गंगा डेव्हलपर्स, विलास जावडेकर डेव्हलपर्स, प्राइड कन्सट्रक्शन या बांधकाम व्यवसायिकांनी मागील एक वर्षात सर्वाधिक घरे विकली.
टीप - बातमीमध्ये वापरलेली आकडेवारी स्केअरयार्ड डॉट कॉम या संकेतस्थळावरुन घेतली आहे. मागील सहा महिन्यातील रिअल इस्टेट मागणीतील बदल दर्शवण्यात आला आहे.