सहारा इंडिया परिवारच्या सहकारी संस्थांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी आज 'सहारा रिफंड पोर्टल'(Sahara Refund Portal) लाँच केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून जवळपास 10 कोटी लोकांचे अडकलेले पैसे परत केले जाणार आहेत. सुरुवातीला 4 कोटी गुंतवणूकदारांना हे पैसे परत दिले जाणार आहेत. सहाराच्या गुंतवणूक दारांना कशा प्रकारे पैसे परत मिळवता येणार आहेत, त्यासाठीची प्रक्रिया काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
सहारा रिफंड पोर्टल- (Sahara Refund Portal)
सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केल्यानंतर ज्या गुंतवणूक दारांच्या योजनेची मूदत पूर्ण झाली आहे, अशा गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालयाकडून सहारा रिफंड पोर्टल ( https://mocrefund.crcs.gov.in/ ) सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. गुंतवणूकदारांना या पोर्टलद्वारे अर्ज केल्यापासून 45 दिवसांत त्यांचे पैसे परत मिळतील. हे पैसे थेट खात्यात हस्तांतरित केले जातील. पोर्टलद्वारे केवळ सहाराच्या 4 सहकारी संस्थांचे गुंतवणूकदार अर्ज करू शकतात. सुरुवातीच्या टप्प्यात 5000 कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे.
या 4 सहकारी संस्थांचे गुंतवणूकदार अर्ज करू शकतील
- सहारा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड लखनौ
- सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड भोपाळ
- हमारा इंडिया क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड कोलकाता
- स्टार्स मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हैदराबाद
कोण आहेत पात्र?
ज्या गुंतवणूकदाराने 22 मार्च 2022 पूर्वी वर नमूद केलेल्या पहिल्या तीन संस्थांपैकी कोणत्याही संस्थेत पैसे जमा केले आहेत, ते गुंतणूकदार परतावा मिळण्यास पात्र आहे. तसेच दिनांक 29 मार्च 2023 पूर्वी, स्टार्स मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हैदराबाद मध्ये ज्यांनी गुंतवणूक केली आहे ते देखील पैसे परत मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.
तूर्तास 10,000 रूपयांपर्यंतचा मिळेल परतावा
सहारा रिफंड पोर्टल सुरु केल्यानंतर पहिल्या टप्प्यात गुंतवणूक दारांना फक्त 10,000 रुपयांपर्यंतचा परतावा दिला जाणार आहे. समजा एखाद्याने 20,000 रुपये गुंतवणूक केली असली तरीही फक्त 10,000 रुपये त्याच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील. सहारा इंडियाचे जवळपास 1.07 कोटी असे गुंतवणूकदार आहेत ज्यांची गुंतवणूक फक्त 10,000 रुपयांपर्यंत आहे.
5,000 कोटींचे वाटप
पहिल्या टप्प्यात एकूण 4 कोटी गुंतवणूकदारांना पैसे परत दिले जाणार आहेत. यासाठी सरकारने 5,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाकडे अधिक निधी जारी करण्याची विनंती केली जाईल. त्यानंतरच ज्यांची रक्कम 10,000 पेक्षा जास्त आहे अशा इतर ठेवीदारांचा एकूण परतावा दिला जाणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे.
अर्ज कसा करायचा?
?सर्वप्रथम तुम्हाला https://mocrefund.crcs.gov.in/ पोर्टलवर जावे लागेल.
?त्यानंतर सहारा रिफंड पोर्टल उघडेल,
?त्यानंतर ठेवीदार नोंदणीवर क्लिक करा; यासाठी आधार क्रमांक आणि त्याला लिंक केलेला मोबाइल क्रमांक टाका.
?त्यानंतर Send OTP वर क्लिक करा; मोबाईल आलेला OTP पोर्टलच्या पेजवर टाका
?ओटीपी टाकल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल.
?नोंदणी पूर्ण झाल्यावर, गुंतवणूकदार लॉगिन वर क्लिक करा
?त्यानंतर तुम्हाला पुन्हा आधार आणि मोबाईल नंबर टाकून OTP करण्याचा पर्याय मिळेल.
?तुम्ही अटी व शर्ती वाचताच 'मी सहमत आहे' वर क्लिक करा.
?तुमचे संपूर्ण तपशील जसे की बँकेचे नाव, जन्मतारीख (DOB) दिसेल.
?त्यानंतर तुम्ही डिपॉझिट प्रमाणपत्राच्या प्रतीसह दावा विनंती फॉर्म भरा.(claim request form)
?सोसायटीचे नाव, सदस्य संख्या, जमा केलेली रक्कम याची तपशीलवार माहिती भरा.
?जर कर्ज घेतले असेल किंवा पेमेंट मिळाले असेल तर हे देखील नमूद करावे लागेल.
?दाव्याची रक्कम 50 हजारांपेक्षा जास्त असल्यास पॅनकार्डचा तपशीलही द्यावा लागेल.
?तुम्हाला तुमच्या रकमेचा क्लेम एकदाच करावा लागेल
?त्यामुळे एकाच वेळी सर्व ठेव तपशील योग्यरित्या भरा.
?तुमच्या अर्जाच्या पडताळणीनंतर,क्लेम फॉर्म डाउनलोड करा
?अर्ज डाउनलोड केल्यानंतर तुमचा नवीन फोटो चिकटवा आणि त्यावर सही करा.
?सही केलेला फॉर्म पुन्हा पोर्टलवर अपलोड करून सबमिट करा.
?तुमचा क्लेम यशस्वीपणे सबमीट झाल्यावर तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक संदेश पाठविला जाईल.