Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan Foreclosure: होम लोन फेडलं पण बँकेकडून ही महत्त्वाची कागदपत्रे घ्यायला विसरु नका!

CLOSING YOUR HOME LOAN?

Home Loan Foreclosure: घरासाठी कर्ज घेताना जशी कागदपत्रांची जुळवाजुळव करतो. तशीच घराचे कर्ज फेडल्यानंतर ती बँक आणि संबंधित यंत्रणांकडून पुन्हा मिळवणे गरजेचे आहे. बँकेकडून घराची मूळ कागदपत्रे परत घेताना बँकेकडून त्याची लिस्ट ऑफ डॉक्युमेंट मागून घेणे आवश्यक आहे. तसेच ही कागदपत्रे योग्य स्थितीत आहेत का? हे सुद्धा चेक करून घ्यायला पाहिजे.

Home Loan Foreclosure: स्वत:चे घर विकत घेणं हा जितका आनंदाचा क्षण आहे; तितकाच आनंदाचा आणि सुटकेचा क्षण म्हणजे घरासाठी घेतलेले कर्ज संपण्याचा असतो. घरावरील कर्ज संपले आणि हातात लोन फोरक्लोजचे सर्टिफिकेट पडले की एक मोठे ओझे उतरल्यासारखे वाटते. पण फक्त लोन फोरक्लोजरचे सर्टिफिकेट घेऊन शांत राहू नका. नाहीतर तुमच्यावर मनस्ताप करण्याची वेळ येईल.

घरासाठी कर्ज घेताना लागणारी कागदपत्रे जमा करताना आपण जितके तत्पर असतो. तितकेच तत्पर घराचे कर्ज संपल्यानंतर ती प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यासाठी असणे गरजेचे आहे. कारण त्यावेळी घराच्या कर्जाचे हप्ते संपले याहून दुसरा आनंद आपल्यासाठी नसतो आणि त्या आनंदाच्या भरात आपण काही गोष्टी काळजीपूर्वक पाहत नाहीत. परिणामी त्याचा आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो.

घराचे कर्ज संपले की, त्याची प्रक्रिया रितसर पूर्ण करणे गरजेचे आहे. नाहीतर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो. घराचे कर्ज संपले आणि ते वेळेत व विनाविलंबासह पूर्ण केले असेल, तर तसा रेकॉर्ड तयार करणे तितकेच गरजेचे आहे. म्हणजेच ही बाब क्रेडिट स्कोअरमध्ये दिसून आली पाहिजे आणि यासाठी ग्राहक म्हणून आपण दक्ष असणे गरजेचे आहे. कर्ज फेडल्यानंतर अशा कोणत्या गोष्ट आहेत. ज्या आपण काळजीपूर्वक केल्या पाहिजेत. जसे की, बँकेकडून काही कागदपत्रे घ्यायलाच हवी. या सर्वांची माहिती आपण समजून घेणार आहोत.

सर्वप्रथम सर्व मूळ कागदपत्रे बँकेकडून परत मिळवा (Original Document of Property)

घरासाठी कर्ज घेताना जी काही मूळ कागदपत्रे तुम्ही बँकेकडे जमा केली होती. ती सर्व कागदपत्रे बँकेकडून मागून घ्या. यामध्ये सेल डीड, टायटल डीड, लोन अॅग्रीमेंट, चैन ऑफ डॉक्युमेंट, पॉवर ऑफ अटॉर्नी आदी कागदपत्रांचा समावेश असतो. ही कागदपत्रे योग्य स्थितीत आहेत का? याच्या सेटमधून काही पाने गहाळ नाहीत ना, याची खात्री करून घ्या. बँकेला ओरिजनल कागदपत्रे देताना त्याचा एक झेरॉक्स सेट आपल्याकडे असतो. त्यानुसार सर्व कागद आहेत की नाही. हे तपासून घ्या.

बँकेकडून नो ड्यूज सर्टिफिकेट मागून घ्या (No Dues Certificate)

कर्जाची रक्कम पूर्णपणे फेडली की, बँकेकडून नो ड्यूज सर्टिफिकेट (No Dues Certificate-NDC)हे सर्वांत महत्त्वाचे सर्टिफिकेट लगेच मिळवून घ्या. या नो ड्यूज सर्टिफिकेटमध्ये नमूद केलेले असते की, संबंधित कर्जदाराचे कुठलेही ड्यूज म्हणजे शिल्लक काही नाही आणि कर्जदाराने आमच्याकडे तारण म्हणून ठेवलेल्या प्रॉपर्टीवर आता आमचा अधिकार नाही. तसेच यामध्ये कर्जाशी संबंधित सर्व माहिती नमूद केलेली असते. जसे की, प्रॉपर्टीचा पत्ता, कर्जदाराचे नाव, लोन अकाउंट नंबर, कर्जाची मूळ रक्कम, कर्जाचा हप्ता सुरू झाल्याचा आणि बंद झाल्याची तारीख अशी सर्व माहिती त्यात दिलेली असते.

प्रॉपर्टीवरील तारण हक्क काढून घ्या (Lien of Property)

जेव्हा आपण बँकेकडून कर्ज घेतो. तेव्हा बँक तारण म्हणून कर्जदाराकडून प्रॉपर्टीची कागदपत्रे गहाण म्हणून ठेवली जातात आणि त्या प्रॉपर्टीवर तारण म्हणून अशी नोंद केली जाते. कर्ज फेडल्यानंतर ती नोंद बँकेच्या कागदपत्रामधून काढून टाकणे गरजेचे आहे.

भार प्रमाणपत्र अपडेट करा (Non-Encumbrance Certificate)

भार प्रमाणपत्रामध्ये संबधित मालमत्तेवर कितीवेळा कर्ज घेतले गेले किंवा त्याची विक्री कितीवेळा आणि कोणाला केली गेली याची माहिती दिलेली असते. ही माहिती कर्ज फेडल्यानंतर अपडेट करणे गरजेचे आहे. या सर्टिफिकेटमध्ये कर्जासाठी घेतलेल्या रकमेची आणि ते फेडलेल्या व्यवहाराचे तपशील असतात.

क्रेडिट स्कोअर अपडेट करून घ्या (Update Credit Score)

कर्ज घेताना जसे क्रेडिट स्कोअर चांगला राहील याची काळजी घेतो. त्याप्रमाणे कर्ज संपल्यानंतर क्रेडिट स्कोअर अपडेट करणे गरजेचे आहे. कारण योग्य वेळेत कर्ज फेडणे हे सुद्धा क्रेडिट स्कोअरसाठी चांगले असते. त्यामुळे त्याबाबत केलेल्या व्यवहारांची नोंद क्रेडिट स्कोअरमध्ये अपडेट करावी लागते.

अशाप्रकारे तुम्ही घरासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर बँकेकडून आणि कर्जाशी संबंधित विभागांकडून आवश्यक कागदपत्रांची मागणी करू शकता.