Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mission Impossible BO Collection: हॉलिवूड चित्रपट 'मिशन इम्पॉसिबल'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा,जाणून घ्या बजेट आणि कमाई

Mission Impossible - Dead Reckoning Part One BO Collection

Mission Impossible BO Collection: सध्या भारतातील बॉक्स ऑफिसवर बॉलीवूड, टॉलीवूड आणि मराठी चित्रपटांसोबत हॉलीवुड चित्रपट देखील चांगली कमाई करताना पाहायला मिळत आहेत. सध्या सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर एकाच चित्रपटाची चर्चा पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. तो चित्रपट म्हणजे 'मिशन इम्पॉसिबल- डेड रेकनिंग पार्ट वन'. या चित्रपटाचे बजेट आणि कमाई जाणून घेऊयात.

भारतीय लोक सध्या वेगवेगळ्या आशयाचे चित्रपट पाहण्याला प्राधान्य देत आहेत. सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलीवूड, टॉलीवूड, मराठी सिनेमा आणि हॉलीवुडमधील चित्रपट देखील पाहायला मिळत आहेत. भारतात हॉलीवुड चित्रपटांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. हा वर्ग सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहण्याला प्राधान्य देतो. आजपर्यंत बॅटमॅन बिगिनिंग (Batman Beginning), ब्यूटिफुल माईंड (Beautiful Mind), द डार्क नाईट (The Dark Knight) यासारख्या अनेक हॉलीवुड चित्रपटांना भारतीयांनी डोक्यावर उचलून धरले होते. 

सध्या भारतात बॉक्स ऑफिसवर टॉम क्रूझचा प्रसिद्ध हॉलिवूड ॲक्शन स्पाय फ्रेंचाइजी चित्रपट 'मिशन इम्पॉसिबल- डेड रेकनिंग पार्ट वन' (Mission Impossible - Dead Reckoning Part One) 12 जुलै 2023 रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला जगभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद पाहायला मिळत आहे. भारतातही हा चित्रपट उत्कृष्टरित्या बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिसून येतोय. सध्या सोशल मीडियावर टॉम क्रूझच्या याच चित्रपटाची चर्चा ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 8 दिवस झाले आहेत. या चित्रपटाने चक्क 8 दिवसात भारतातील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आज आपण मिशन इम्पॉसिबल- डेड रेकनिंग पार्ट वनच्या बजेट बद्दल आणि 8 दिवसातील कमाईबद्दल माहिती जाणून घेऊयात.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भारतातील बॉक्स ऑफिसवरील कमाई जाणून घ्या

सॅकनिल्क एंटरटेनमेंटने दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाने 8 दिवसात जवळपास 80 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या बुधवारी म्हणजेच 19 जुलै 2023 रोजी या चित्रपटाने तब्बल 4 कोटींची कमाई केली आहे. एकूण 8 दिवसात या चित्रपटाने 76.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

बुधवारी म्हणजेच 19 जुलै 2023 रोजी चित्रपटगृहात ऑक्युपेन्सी 11.75% इतकी होती. प्रेक्षकांची सर्वाधिक गर्दी नाईट शोला पाहायला मिळाली. नाईट शोला प्रेक्षकांनी 16.83% उपस्थिती दर्शवली. तर सकाळच्या शोसाठी 8.74%, दुपारच्या शोसाठी 8.87% आणि संध्याकाळच्या शोसाठी 12.55% गर्दी पाहायला मिळाली.

चित्रपटाचे बजेट जाणून घ्या

टॉम क्रूझच्या मिशन इम्पॉसिबल डेड रेशनिंग पार्ट वनमध्ये टॉम क्रूझ, विंग रॅम्स, रेबेका फर्ग्युसन, व्हेनेसा किर्बी, इसाई मोरालेस, हेन्नी झेर्णी, मारिएला या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

हा चित्रपट 2400 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने संपूर्ण जगभरात 2050 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट येत्या काही दिवसात आणखी उल्लेखनीय कमाई करेल, असे बोलले जात आहे.

Source: navbharattimes.indiatimes.com