पैसा गुंतवायचं म्हटल्यावर, जिथे जास्त व्याज मिळेल अशाच ठिकाणी पैसा गुंतवण्यात येतो. सध्या सर्वच बॅंकेत फिक्स्ड डिपाॅझिटवर (FD) चांगला व्याजदर देण्यात येत आहे. त्यात युनिटी स्मॉल फायनान्स बँक आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक यांचे नाव आघाडीवर आहे. या बॅंकांनी दिलेल्या उच्च व्याजदराचा फायदा प्रत्येक नागरिक घेवू शकणार आहे. युनिटी आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स या दोन्ही बॅंकात एफडीवर तुम्हाला 9 टक्क्यांहून जास्त व्याजदर मिळणार आहे. या बँकांद्वारे ऑफर केलेले एफडी रेट हे इतर कुठल्याही सरकारी योजना किंवा बॅंकामध्ये देण्यात येणाऱ्या व्याजापेक्षा अधिक आहे.
टॅक्स वाचवायचा?
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ते आता सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केलेल्या फिक्स्ड डिपाॅझिटसाठी 4% ते 9.10% पर्यंत व्याज देणार आहेत. तर याच कालावधीवर ज्येष्ठ नागरिकांना 4.5% ते 9.60% व्याजदर मिळणार आहेत. पाच वर्षासाठी टॅक्स सेव्हर फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये पैसे टाकत असल्यास सामान्य ग्राहकांना 9.10% तर ज्येष्ठ नागरिकांना 9.60% व्याजदर मिळणार आहेत. हे रेट 5 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.
मिळेल 9.50% व्याजदर!
युनिटी स्मॉल फायनान्स बॅंकेने त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जून 2023 पासून 1001 दिवसांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केलेल्या फिक्स्ड डिपाॅझिटसाठी (FD) ते जेष्ठ नागरिकांना 9.50% तर सामान्य ग्राहकांना 9 % व्याज देणार आहेत. तसेच, 201 दिवसांसाठी जेष्ठांना 9.25 % तर सामान्य ग्राहकांना 8.75 % व्याज मिळणार आहे. आकेडवारी बघितल्यास, जेष्ठ नागरिक आणि सामान्य ग्राहकांच्या रेटमध्ये जास्त तफावत दिसत नाही. परंतु, जास्त व्याजदर जेष्ठ नागरिकांना या बॅंकेद्वारे दिला जात आहे. या दोन्ही बॅंकांचे व्याजदर चांगले आहेत. तुम्ही पैसे दीर्घकाळासाठी गुंतवत असल्यास तुमचा फायदाच आहे.