Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gen Zs Cost of Living: यंगस्टर्सला चिंता वाढत्या खर्चाची! पार्ट टाइम नोकरीतून खर्च भागवण्याचा प्रयत्न

cost of living

जगभरात कोरोनानंतर महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुटुंबाचा मासिक खर्च वाढल्याने बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैसे शिल्लक राहत नाहीत. राहणीमानावरील वाढता खर्च हा यंगस्टर्ससाठी चिंतेचा विषय असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. पर्यावरण बदल आणि बेरोजगार राहण्याची चिंताही जगभरातील तरुणांना सतावत आहे.

Gen Zs Cost of Living: जगभरात कोरोनानंतर महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुटुंबाचा मासिक खर्च वाढल्याने बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैसे शिल्लक राहत नाहीत. राहणीमानावरील वाढता खर्च हा यंगस्टर्ससाठी चिंतेचा विषय असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. पर्यावरण बदल आणि बेरोजगारीची चिंताही जगभरातील तरुणांना सतावत आहे. खर्च वाढल्याने पूर्णवेळ नोकरीसोबतच पार्ट टाइम काम करण्यावर अनेक तरुणांचा भर आहे.

यंगस्टर्स आणि त्यांची लाइफस्टाइल हा विषय देखील चर्चेचा आहे. महागडे मोबाइल, ब्रँडेड कपडे गॅझेस्ट्स, बूट, चपला, परफ्युम्स ते एंटरटेनमेंट ही लिस्ट संपणार नाही. प्रत्येक सहा महिन्यांनी काहीतरी नवीन ट्रेंड आणि स्टाइल यावरही यंगस्टर्सचे जास्त पैसे खर्च होत आहेत. राहणीमानाचा खर्च वाढत असल्याने यंगस्टर्स आता फुल टाइम कामासोबत पार्टटाइम जॉबही करत आहेत. त्यातच महागाईने तरुणांचा खिसा रिकामा होत आहे.

डेलॉइट या संस्थेने Gen Z and Millennial वर आधारित एक सर्वेक्षण केले आहे. यामध्ये यंगस्टर्स कशा पद्धतीने पैसे खर्च करतात याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. जगभरातील सुमारे 22 हजार 800 यंगस्टर्सला प्रश्न विचारण्यात आले. सर्वप्रथम जेन झी म्हणजे कोण ते जाणून घेऊया. 1990 नंतर आणि 2010 सालामध्ये ज्यांचा जन्म झालाय त्यांना Z जनरेशन म्हटले जाते. तर 1980 ते 1990 सालादरम्यान जन्मलेल्यांना मिलेनियल्स म्हटले जाते. 

डेलॉइट या आघाडीच्या रिसर्च संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, 50 टक्के यंगस्टर्स त्यांची लाइफस्टाइल मेंटेंन करण्यासाठी पूर्णवेळ कामासोबतच काहीतरी पार्टटाइम काम करत आहेत. सर्व्हेक्षणात 50% तरुणांनी जास्त पैसे कमावण्यासाठी पार्ट टाइम काम करत असल्याचे सांगितले. तसेच खर्च जास्त असल्याने पे चेक टू पे चेक म्हणजेच पगाराची वाट पाहत यंगस्टर्स जगत आहेत.

यंगस्टर्सचे मोठे निर्णय वेटिंग लिस्टवर 

यंगस्टर्सचा खर्च वाढल्याने ते इतर मोठे निर्णय टाळत आहेत. जसे की, नोकरी लागल्यानंतर घर घेण्याचा निर्णय, लग्न या गोष्टी मिलेनियल्स वेटिंगवर ठेवत आहेत. जेन झी अद्यापही या निर्णयांपासून दूर आहे. भारतासोबतच अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि आशियाई देशातील तरुणांचाही या सर्व्हेत समावेश आहे. त्यामुळे जगभरात यंग जनरेशन एका नव्या बदलाला सामोरे जात असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीच्या जनरेशनमध्ये जास्त पैसे खर्च केले जात नव्हते. भारतातील सुमारे 1 हजार यंगस्टर्सचा या सर्व्हेक्षणात सहभागी झाले होते. 

वर्क लाइफ बॅलन्स  

मेलिनियल्स आणि जेन झी कामाला अती महत्त्व देतात. तसेच वर्क लाइफ बॅलन्स साधण्यामध्ये त्याची दमछाक होत आहे. जी कंपनी वर्क लाइफ बॅलन्सला महत्त्व देते तसेच रिमोट आणि हायब्रिड काम करण्याची संधी देते त्या कंपनीला पसंती यंगस्टर्सकडून मिळत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. दरम्यान, सुमारे 50% यंगस्टर्सवर कामाचा अतिरिक्त ताण असल्याचेही अभ्यासातून पुढे आले आहे.