Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Karizma XMR 210 Launch: 3.8 सेकंदात 60 चा स्पीड गाठणार! हिरोची Karizma XMR 210 लाँच, किंमत जाणून घ्या

Karizma XMR 210 Launch

Image Source : www.zeenews.india.com/www.filmfare.com

हिरो मोटो कॉर्पने प्रिमियम श्रेणीतील स्पोर्ट बाइक Karizma XMR 210 आज लाँच केली. या स्पोर्ट बाइकमध्ये अनेक आकर्षक फिचर्स देण्यात आले आहेत. किंमत आणि फिचर्स जाणून घ्या.

Karizma XMR 210 Launch: हिरो मोटोकॉर्पने आपल्या प्रिमियम श्रेणीतील करिझ्मा या स्पोर्ट्स दुचाकीचे नवे मॉडेल दिमाखदार कार्यक्रमात लाँच केले. करिझ्मा XMR 210 असे नव्या मॉडेलचे नाव आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनने या गाडीचे दिल्लीत अनावरण केले. यावेळी कंपनीचे सीइओ निरंजन गुप्ता उपस्थित होते. 

Karizma XMR 210 ची किंमत किती?

करिझ्मा ही गाडी तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. तीन रंगांमध्ये ही गाडी उपलब्ध असेल. या गाडीची लाँच नंतर एक्स शोरूम ऑफर प्राइज 1,72,900 रुपये ठेवण्यात आली आहे. लाँच ऑफर संपल्यानंतर दुचाकी दोन लाख रुपयापर्यंत मिळू शकते. न्यू करिझ्मा मॅट फंटम ब्लॅक, टर्बो रेड आणि आयकॉनिक यलो रंगात उपलब्ध असेल.  

कोणत्या गाड्यांना देणार टक्कर?

करिझ्मा 210 ही स्पोर्ट दुचाकी सुझुकी जिक्सर SF 250, यमाहा R15, बजाज पल्सर 200 या गाड्यांशी स्पर्धा करेल. 

3.8 सेकंदात गाठेल 60 चा स्पीड 

या गाडीला 210 सीसी चे सिंगल सिलिंडर लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 25php पावर आणि 20Nm टॉर्क जनरेट करते. दुचाकी 3.8 सेकंदात 60 चा स्पीड गाठेल, असा दावा कंपनीने केला आहे. 

सहा गिअर आणि ऑन बोर्ड डायग्नॉस्टिक डिव्हाईससोबत ही गाडी येते. (Karizma XMR 210 Launch) डिजिटल मिटर, एलईडी लाइट, ड्युअल चॅनल एबीएस, इंजिन किल स्वीच, स्लीप अँड असिस्ट क्लच हे फिचर्स सुद्धा देण्यात आले आहेत. 

12 हजार किलोमीटरनंतर ऑइल बदला 

इंजिनमध्ये DOHC टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. त्यामुळे इंजिनची क्षमता आणखी वाढेल. याचा आणखी एक फायदा म्हणजे 12,000 हजार किलोमीटरनंतर इंजिन ऑइल बदलावे लागेल, असा दावा कंपनीने केला आहे. स्लीप अँड असिस्ट क्लचमुळे गाडी घसरण्याची शक्यता कमी होईल, तसेच पुढील चाक लॉक करता येईल, असे कंपनीने म्हटले आहे. 

फिचर लोडेड करिझ्मा 

या गाडीमध्ये अनेक नवीन फिचर्स देण्यात आली आहेत. प्रोजेक्टर एलईडी लाइट, LCD स्पीडोमीटरमध्ये 39 पेक्षा जास्त सुविधा आहेत. Karizma XMR 210 price) तुम्ही मोबाइल कनेक्ट करू शकता. फोन कॉल, मेसेज अलर्ट, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, बॅटरी हेल्थ, रेंज, गिअर पोजिशन इंडिकेटर, लो फ्युअल इंडिकेटर, ट्रिप मीटर यासह इतरही अनेक फिचर्स आहेत. मागील बाजूला H आकारात एलईडी लाइट असून त्यामुळे गाडीचा लूक स्पोर्टी आणि अधिक आकर्षक दिसतो.