Extreme 160R 4V Premium: हिरो मोटोकॉर्प भारतातली दुचाकी बनवणारी एक प्रमुख कंपनी आहे. प्रीमियम सेगमेंटवर अधिक भर देत ही कंपनी यावर्षी विविध बाईक लाँच करणार असल्याची माहिती कंपनीने याआधीच दिली होती. याचअंतर्गत या आठवड्यात कंपनीने नवीन Extreme 160R 4V प्रीमियम बाइक लाँच केल्या आहेत. कंपनीच्या नवीन Xtreme 160R 4V प्रीमियम बाईकची किंमत 1 लाख 27 हजार रुपयांपासून सुरु होते आहे.
काय आहे किंमत?
कंपनीने Xtreme 160R 4V प्रीमियम बाईकचे तीन प्रकार लॉन्च केले आहेत. या तिन्ही प्रकारांची किंमतही वेगवेगळी आहे. स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 1,27,300 रुपये आहे. कनेक्टेड 2.0 व्हेरिएंटची किंमत 1,32,800 रुपये आहे. तर प्रो व्हेरियंटसाठी, ग्राहकांना सुमारे 1,36,500 रुपये द्यावे लागतील. या किमती एक्स-शोरूम नुसार देण्यात आलेल्या आहेत.
वैशिष्ट्ये काय?
कंपनीने Xtreme 160R 4V प्रीमियम बाइक मध्ये 163 cc सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. जे एअर कूल्ड आणि चार व्हॉल्व्ह ऑईल कूल्डसह उपलब्ध आहे. बाईकच्या इंजिनमध्ये 16.6 हॉर्सपॉवर आणि 14.6 Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे.
2023 Xtreme 160R च्या इतर डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 37 mm च्या USD ची सुविधा देण्यात आली आहे. वाहन चालवताना धक्के कमी लागावेत यासाठी अॅडजस्टेबल 7 स्टेप, अॅडजस्टेबल शोवा मोनोशॉक देण्यात आले आहेत. या बाइकच्या एकूण सीटची उंची 795 मिमी आहे. तर वजन सुमारे 144 किलो आहे. बाईकची हाताळणी आणि स्टीयरिंग आरामदायक आहे. यामध्ये 276 mm फ्रंट पेटल डिस्क आणि 220 mm रियर पेटल डिस्क देण्यात आली आहे. Hero Connect 2.0 च्या मदतीने, रिमोट इमोबिलायझेशन, इन-अॅप नेव्हिगेशन आणि जिओ-फेन्स दिल्या गेले आहेत.
प्रत्येक तिमाहीत नवीन प्रॉडक्ट
हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) या आर्थिक वर्षात हार्ले डेव्हिडसनच्या (Harley-Davidson) सहकार्यानं बाजारात आपली पहिली प्रीमियम बाइक सादर करणार असल्याची माहिती होती. हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) आपला बाजारातला हिस्सा अधिक मजबूत करण्यास इच्छुक आहे. कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या प्रत्येक तिमाहीत नवं प्रॉडक्ट म्हणजेच बाइक्स मार्केटमध्ये आणण्याच्या प्लॅनमध्ये आहे. हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
यानंतर भारतात जुलै महिन्यात Suzuki e-Burgman, TVS Apache RTR 310, Husqvarna Norden 901, Ducati Diavel V4 या बाइक्स लाँच होण्याची शक्यता आहे.