Bike Scooter Price Hike: आता टू-व्हीलर बाईक किंवा स्कूटर खरेदी करणे अधिक महाग होणार आहे. दुचाकी उत्पादक Hero MotoCorp ने म्हटले आहे की, ते त्यांच्या दुचाकींच्या किमतीत (Bike Scooter Price Hike) वाढ करणार आहेत. या आठवड्यापासून Hero MotoCorp कंपनीच्या दुचाकी वाढीव किमतीसह बाजारात उपलब्ध होऊ शकतात. नवीन किंमतीसह, हिरो पॅशन प्रो बाईक 1,700 रुपयांनी महाग होईल. त्याचप्रमाणे इतर वाहनांच्या किमतीतही वाढ होणार आहे.
Table of contents [Show]
1.5 टक्क्यांनी किंमती वाढणार
हिरो मोटोकॉर्पने शुक्रवारी सांगितले की, इनपुट खर्च वाढण्यासह अनेक कारणांमुळे ते 3 जुलैपासून त्यांच्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमती सुमारे 1.5 टक्क्यांनी वाढवतील. याआधी एप्रिल 2023 मध्ये देखील कंपनीने किंमती सुमारे 2 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. नवीन किंमती वाहनाच्या मॉडेल आणि मार्केटनुसार बदलतील, अशी माहिती Hero MotoCorp कंपनी तर्फे देण्यात आली आहे.
ग्राहकांवर परिणाम होणार
Hero MotoCorp ने सांगितले की, मोटारसायकल आणि स्कूटरच्या किमतीतील वाढ ही कंपनी वेळोवेळी केलेल्या किंमतींच्या बदलांचा (Review of prices) एक भाग आहे, जसे की किंमतीचे स्थान, इनपुट खर्च आणि व्यावसायिक अत्यावश्यकता यासारख्या विविध घटकांचा विचार करून किंमती वाढविण्यात आल्या आहेत. Hero MotoCorp पुढे म्हणाले की, ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी ते इनोवेटिव फाइनेंशियल प्रोग्राम सुरू ठेवतील.
सणांमध्ये वाहनांची विक्री वाढण्याची अपेक्षा
Hero MotoCorp ने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, देशातील बहुतांश भागात मान्सून सुरू होण्याची आणि एकूणच आर्थिक निर्देशकांमध्ये वाढ होण्याची चांगली चिन्हे दिसत आहेत. त्याचबरोबर आगामी सणासुदीचा हंगाम लक्षात घेता वाहनांची विक्री वाढण्याची अपेक्षा आहे.
3 जुलै पासून महागणार किंमती
नवीन किमती लागू झाल्यानंतर बाईक किती महाग होईल? असा प्रश्न ग्राहकांना पडणे स्वाभाविक आहे. जर एखाद्या ग्राहकाने Hero MotoCorp ची Passion Pro बाईक खरेदी केली, तर त्याला ही बाईक सुमारे 1795 रुपयांनी महाग पडेल. कारण ज्या Passion Pro बाईकची एकूण किंमत सध्या 89,755 रुपये असेल, त्या बाइकची किंमत 3 जुलै पासून 91,550 रुपये होईल.