हिरो कंपनीने स्टाईलिश आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी असलेली Xoom स्कूटी नुकतीच लाँच (Hero Xoom 110 launch India) केली आहे. ही स्कूटी 110cc ची असून स्पोर्टी स्कूटी सेगमेंटमध्ये आहे. कोरोनानंतर सर्वकाही सुरळीत झाल्याने स्कूटींची मागणी वाढत आहे. भारतात 110cc च्या स्कूटीची मागणी वाढत आहे. (Hero Xoom 110 cc scooter launch) त्यामुळे कंपनीने परवडणाऱ्या किंमतीत नवीन फिचर्ससह झूम स्कूटी लाँच केली आहे.
हिरो झूम स्कूटीची किंमत किती आहे? (Hero Xoom 110 cc scooter price)
68 हजार 599 ते 76 हजार 699 रुपयांच्या रेंजमध्ये हिरो कंपनीने झूम स्कूटी लाँच केली आहे. भारतातील एकूण स्कूटी मार्केटमधील 60% गाड्या 110cc च्या आहेत. ह्या श्रेणीतील गाड्यांची मागणी वाढत असून ग्राहकांच्या अपेक्षाही यातून पूर्ण होत आहेत, असे हिरो कंपनीने गाडी लाँच करताना म्हटले. मागील तीन वर्षांपासून स्पोर्टी सेगमेंटमधील स्कूटींची विक्री वाढत असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. 1 फेब्रुवारीपासून म्हणजे उद्यापासून xoom स्कूटीसाठी बुकिंग सुरू होणार आहे.
हिरो Xoom 110 व्हेरियंट (Hero Xoom 110 variants)
xoom स्कूटी व्हेरियंट | एक्स शोरुम किंमत दिल्ली |
Xoom LX | 68,599 |
Xoom VX | 71,799 |
Xoom ZX | 76,699 |
हीरो झूममध्ये काय आहेत फिचर्स? (Hero Xoom 110 Features)
या गाडीला फुल डिजिटल स्पिडोमीटर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसोबत देण्यात आले आहे. यामध्ये कॉलर आयडी आणि SMS अपडेटही चालकाला मिळणार आहेत. तसेच फोन बॅटरी लेव्हल आणि फ्युअल इंडिकेटर डिजिटल स्क्रिनवर दिसतील. मोबाईल चार्जिंगची सुविधा, बुट लाइट आणि साइड स्टँड इंजिन कट ऑफही देण्यात आले आहे. हिरो झूम स्कूटरमध्ये BS-VI कम्ल्पायंट 110cc चे इंजिन आहे. याचा पिक टॉर्क 8.05 BHP आणि 7,250 RPM आहे. तर दुसऱ्या मॉडेलचा पिक टॉर्क 8.7 Nm असून 5,750 RPM एवढा आहे.
नवीन झूम स्कूटी पाच रंगात उपलब्ध आहे. (Hero Xoom Colour options) यामध्ये पोलस्टार ब्लू, ब्लॅक, मॅट अॅबरॅक्स ऑरेंज, सिलव्हर आणि लाल असे पाच आकर्षक रंग आहेत.
www.flipkart.com
स्कूटीची डिमांड वाढली( Hero MotoCorp sports scooter)
भारतातील 65% जनतेचे सरासरी वय 35 टक्क्यांच्या खाली तर तर 50% जनेतेचे सरासरी वय 25 आहे. त्यामुळे या वयोगटातील ग्राहकांना काय पाहिजे हे कंपनीच्या कायम केंद्रस्थानी आहे. त्यानुसारच गाड्यांमध्ये फिचर्स देण्यात येत आहेत, असे कंपनीचे चीफ ग्रोथ ऑफिसर रणजित सिंह यांनी झूम स्कूटीच्या लाँचवेळी (Hero Xoom 110 sports scooter) म्हटले. शाळा कॉलेज आणि ऑफिसेस सुरळीत चालू झाल्याने स्कूटीची मागणीही वाढली असल्याचे सिंह यांनी नमूद केले.