Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hero Moto Corp करणार कमबॅक, डझनभर बाइक्स आणि स्कुटर्स लाँच करणार

Hero Moto Corp Company Re-Entry

Image Source : www.heromotocorp.com

Hero Moto Corp Company Re-Entry : स्पेंडर आणि डॉन यासारख्या मोटरसायकलने भारतीय मार्केट व्यापणारी देशातील सर्वात मोठी दूचाकी कंपनी Hero Moto Corp परत एकदा आपल्या वैशिष्ट्यांसह मार्केटमध्ये उतरत आहे. Hero Moto Corp या आर्थिक वर्षात विविध प्रकारच्या बाइक्स आणि स्कुटर्स लाँच करणार आहे.

Hero Moto Corp कंपनीच्या स्प्लेंडर आणि डॉन यासारख्या बाइक्स भारतातील मार्केटमध्ये दिर्घकाळ आहेत.आता अमेरिकन बाईक निर्माता कंपनी Harley-Davidson च्या सहकार्याने Hero Moto Corp पहिल्यांदा काही बाइक्स आणि स्कूटर मार्केटमध्ये आणणार आहे. कंपनी विविध वैशिष्ट्यांसह सुमारे डझनभर मोटारसायकल आणि स्कुटर्स लाँच करण्याचे नियोजन हिरो मोटो कॉर्पने केले आहे.

Karizma मार्केटमध्ये पुन्हा अवतरणार  

हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल यांनी गेल्या महिन्यात बेंगळुरू येथे झालेल्या कंपनीच्या नॅशनल डीलर कॉन्फरन्स (NDC)मध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. आजच्या तरुणाईसाठी नवीन वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेली Karizma परत मार्केटमध्ये आणण्याची हीच योग्य वेळ आहे, असे ते म्हणाले होते. त्यामुळे Karizma Bike कधी रिलॉंच करणार याकडे तरुणाईची उत्सुकता वाढली आहे. 

नवीन बाइकमध्ये 400 सीसीचे इंजिन

अमेरिकन बाईक निर्माता कंपनी Harley-Davidson सोबत तयार करण्यात येत असलेल्या नवीन बाईकमध्ये  400 सीसीचे इंजिन असेल. हिरो कंपनी या आर्थिक वर्षात हिरोच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ मॉडेल लाँच करणार आहे. प्रत्येक तिमाहीत नवीन उत्पादने लाँच होणार असल्याची माहिती हिरो मोटोकॉर्पचे सीईओ आणि मुख्य वित्तीय अधिकारी निरंजन गुप्ता यांनी दिली.

दोन कंपन्यांबरोबर केली भागीदारी

आर्थिक वर्ष 23 मध्ये Hero MotoCorp च्या विक्रीच्या 90% पेक्षाजास्त sub-125 cc मोटरसायकलचा समावेश आहे. आता कंपनीने प्रीमियम सेगमेंटमध्ये आपली उपस्थिती वाढवण्यासाठी हार्ले डेव्हिडसन आणि कॅलिफोर्निया स्थित झिरो मोटरसायकलसोबत भागीदारी केली आहे.

अमेरिकन कंपनी हार्ले-डेव्हिडसनने 2020 मध्ये भारतातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर Hero MotoCorp ने हार्ले-डेव्हिडसनची मोटारसायकल, पार्ट्स,अॅक्सेसरीज आणि मालाचे भारतात वितरण केले. Hero Moto Corp  कंपनीने Karizma XMR व्यतिरिक्त Xtreme 160R 4V मोटरसायकल, नवीन ग्लॅमर आणि XOOM 125cc स्कूटरसह डीलर कॉन्फरन्समध्ये आगामी उत्पादनांची श्रेणी प्रदर्शित केली.